Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > मखाने की चणे-जास्त प्रोटीन कशात असतं? काय खाल्ल्यानं भराभर वजन कमी होतं, पाहा

मखाने की चणे-जास्त प्रोटीन कशात असतं? काय खाल्ल्यानं भराभर वजन कमी होतं, पाहा

Makhana Vs Roasted Chana : वजन कमी करण्यासाठी चणे खावेत की मखाने समजून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:12 IST2026-03-05T13:11:28+5:302026-03-05T13:12:30+5:30

Makhana Vs Roasted Chana : वजन कमी करण्यासाठी चणे खावेत की मखाने समजून घेऊ.

Makhana Vs Roasted Chana : Makhana Vs Roasted Chana Nutritional Value and Best Weight Loss | मखाने की चणे-जास्त प्रोटीन कशात असतं? काय खाल्ल्यानं भराभर वजन कमी होतं, पाहा

मखाने की चणे-जास्त प्रोटीन कशात असतं? काय खाल्ल्यानं भराभर वजन कमी होतं, पाहा

वजन कमी करण्यासाठी लोक अशा बऱ्याच पदार्थांचा आहारात समावेश कतात ज्यात कमी कॅलरीज आणि हाय फायबर असते आणि  भरपूर प्रोटीन असते. वजन कमी करण्यासाठी लोक चिप्स, चिवडा, बिस्किट्स असे पदार्थ न खाता मखाणे किंवा भाजलेले चणे खातात (Makhana Vs Roasted Chana). अशावेळी वजन भराभर कमी करण्यासाठी मधल्यावेळेत चणे खावेत की मखाने असा प्रश्न अनेकांना पडतो. वजन कमी करण्यासाठी चणे खावेत की मखाने समजून घेऊ. (Makhana Vs Roasted Chana Nutritional Value and Best Weight Loss)

मखाणे की भाजलेले चणे 

मखान्यांमध्ये कमी प्रोटीन आणि जास्त एंटीऑक्सिडेंट्स असतात. यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जिंक असते. याऊलट भाजलेल्या चण्यांमुळे फक्त पोट भरत नाही तर डायजेटिव्ह सिस्टीम चांगली राहण्यासही मदत होते. 

मखाने आणि भाजलेल्या चण्यांमधील न्युट्रिशनल व्हॅल्यू

 जर्नल ऑफ फूड सायंस एंट टेक्नोलॉजीच्या रिपोर्टनुसार चणे भाजल्यानं त्यातील प्रोटीन्स पचण्याची क्षमता वाढते आणि एंटी न्युट्रिशनल फॅक्टरर्स कमी होतात.  इंडियन काऊंसिल ऑफ मेडीकल रिसर्च आणि नॅशनल इस्टिट्यूट ऑफ न्युट्रिशनच्या डायटरी गाईडलाईन्सनुसार १०० ग्रॅम मखान्यांमध्ये ३५० कॅलरीज, ११ ते १२ ग्रॅम प्रोटीन, ७ ग्रॅम फायबर्स असतात आणि ०.५ ते १ ग्रॅम फॅट्स असतात. तर १०० ग्रॅम चण्यांमध्ये ३६० कॅलरीज, १९ ते २० ग्रॅम प्रोटीन्स, १२ ग्रॅम फायबर्स असतात तर फॅट्स  ५ ते ६ ग्रॅम असतात.

वजन कमी करण्यासाठी काय उत्तम ठरतं?

वजन कमी करण्यासाठी भाजलेले चणे आणि मखाने हे दोन्ही उत्तम पर्याय आहे. या दोन्हींचे एकत्र सेवनही करू शकता. दोन्ही स्नॅक्स हेल्दी आणि खास आहेत जे शरीराला आतून मजबूत बनवतात. पण तुम्ही किती प्रमाणात तुमच्या भुकेवर अवलंबून आहे.

अमेरिकन जर्नल ऑफ मेडीकल न्युट्रिशननुसार भाजलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन्स भरपूर असतात. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं.  जर  तुम्हाला हलका आहार हवा असेल तर तुम्ही असे स्नॅक्स खाऊ शकता ज्यामुळे  दीर्घकाळ पोट भरलेलं राहील. या दोन्ही पदार्थांचे फायदे पाहता चणे किंवा मखाने खाल्ल्यानं बराचवेळ पोट भरलेलं राहतं एनर्जेटीक वाटतं.

Web Title : मखाना या चना: वजन घटाने के लिए किसमें ज्यादा प्रोटीन है?

Web Summary : वजन घटाने के लिए मखाना और भुना चना दोनों ही स्वस्थ विकल्प हैं। चना में अधिक प्रोटीन और फाइबर होता है, जिससे पेट लंबे समय तक भरा रहता है। दोनों ऊर्जा और पोषक तत्व प्रदान करते हैं, जो भूख के स्तर पर निर्भर करते हैं।

Web Title : Makhana or Chana: Which has more protein for weight loss?

Web Summary : For weight loss, makhana and roasted chana are healthy snacks. Chana has more protein and fiber, keeping you full longer. Both provide energy and nutrients, making them good choices depending on hunger levels.