Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > भूक न मारता वजन कमी करा, ‘हे’ वेटलॉस सॅलेड खा! फायबर भरपूर- वजन होईल झरझर कमी...

भूक न मारता वजन कमी करा, ‘हे’ वेटलॉस सॅलेड खा! फायबर भरपूर- वजन होईल झरझर कमी...

Magical Weight loss Salad : Low Calorie High Fiber Salad For Weight Loss : Impactful Salad Recipe for Weight Loss : Healthy & Tasty Weight loss Salad : घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात वेटलॉस सॅलॅड कसं करायचं ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2025 17:14 IST2025-02-15T12:47:21+5:302025-02-15T17:14:57+5:30

Magical Weight loss Salad : Low Calorie High Fiber Salad For Weight Loss : Impactful Salad Recipe for Weight Loss : Healthy & Tasty Weight loss Salad : घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात वेटलॉस सॅलॅड कसं करायचं ते पाहा...

Low Calorie High Fiber Salad For Weight Loss Impactful Salad Recipe for Weight Loss Healthy & Tasty Weight loss Salad | भूक न मारता वजन कमी करा, ‘हे’ वेटलॉस सॅलेड खा! फायबर भरपूर- वजन होईल झरझर कमी...

भूक न मारता वजन कमी करा, ‘हे’ वेटलॉस सॅलेड खा! फायबर भरपूर- वजन होईल झरझर कमी...

सतत वाढत जाणारे वजन कमी करणे म्हणजे सगळ्यांत अवघड कामच असते. वाढणारे वजन कमी करण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय किंवा प्रयोग करुन बघतो. या उपायांमध्ये सर्वात ( Impactful Salad Recipe for Weight Loss) कॉमन आणि सगळेच करुन पाहतात असा उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे किंवा डाएटमध्ये वेटलॉस करणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे. वजन कमी करायचं म्हटलं की आपण फळं आणि भाजीपाला यांसारख्या पदार्थांचा आहारात प्रामुख्याने समावेश करतोच(Healthy & Tasty Weight loss Salad).

फळं खाण्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांच्या सॅलॅडचा आहारात समावेश करतो. गाजर, काकडी, बीट, टोमॅटो, कांदा वापरून तयार केलेलं सॅलॅड तर आपण खातोच. परंतु वजन कमी करण्यासाठी (Magical Weight loss Salad) आपण एका खास वेगळ्या प्रकारच्या वेटलॉस सॅलॅडचा आपल्या आहारात समावेश करु शकतो. हे पौष्टिक आणि हेल्दी सॅलॅड खाल्ल्याने आपले पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते, त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आपण हे वेटलॉस सॅलॅड पटकन तयार करु शकतो. अशा या खास वेटलॉससाठी मदत करणाऱ्या, पौष्टिक आणि हेल्दी सॅलॅडची झटपट रेसिपी पाहूयात(Low Calorie High Fiber Salad For Weight Loss).
   
साहित्य :- 

१. दही - १ कप 
२. कोबी - १ कप 
३. गाजर - १ कप 
४. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून 
५. लसूण पाकळ्या - १० ते १२ पाकळ्या
६. काळीमिरी पूड - १ टेबलस्पून 
७. साजूक तूप - १ टेबसलस्पून 
८. मीठ - चवीनुसार

'छावा' साठी विकी कौशलने केले प्रोटीन रिच डाएट, पाहा त्यानं नेमकं काय काय खाल्ल...


कोमट पाण्यात मिसळा चमचाभर सोनेरी पदार्थ, वजन - पोट होईल झरझर कमी - दिसाल फिट...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी घट्ट आणि दाटसर दही एका बारीक जाळीच्या गाळणीत काढून त्यातील जास्तीचे पाणी निथळून जाऊ द्यावे. पाणी निथळून गेल्याने दह्याला अधिक दाटसरपणा येऊन घट्ट दही मिळेल. 
२. कोबी आणि गाजर स्वच्छ धुवून त्यावरची सालं काढून लांब, पातळ उभे चिरुन घ्यावे. 
३. आता एक मोठा बाऊल घेऊन त्यात कापून घेतलेले कोबी, गाजर घ्यावेत. त्यावर काळीमिरी पूड भुरभुरवून घालावी. मग बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी. 
४. आता या सगळ्या मिश्रणात दही घालावे तसेच चवीनुसार मीठ देखील घालावे. 

वर्कआऊट केल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ ७ पदार्थ, मेहनत जाते वाया-तब्येतही बिघडते...

५. सगळ्यात शेवटी एका पॅनमध्ये साजूक तूप घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. लसूण परतून त्याचा रंग थोडा हलकासा सोनेरी होऊ द्यावा. 
६. आता ज्या बाऊलमध्ये सगळे जिन्नस घेतले आहेत त्या बाऊलमध्ये हा खमंग तडका ओतून सॅलॅडला तुपाची फोडणी द्यावी. 
७. सगळ्यात शेवटी सगळे जिन्नस चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. सॅलॅड खाण्यासाठी तयार आहे. 

आपण वजन कमी करण्यासाठी असे सॅलॅड जेवणासोबत किंवा सकाळचा ब्रेकफास्ट म्ह्णून देखील खाऊ शकता.

Web Title: Low Calorie High Fiber Salad For Weight Loss Impactful Salad Recipe for Weight Loss Healthy & Tasty Weight loss Salad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.