Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > मुखवासातील 'हा' खास पदार्थ करतो सरसर वजन कमी! पोटाची ढेरी -बेढब मांड्या होतील सुडौल...

मुखवासातील 'हा' खास पदार्थ करतो सरसर वजन कमी! पोटाची ढेरी -बेढब मांड्या होतील सुडौल...

Does Fennel Water Help In Weight Loss : Here’s Why Fennel Seeds (Saunf) Help Lose Weight And Burn Body Fat : Fennel Seeds Water For Weight Loss : Fennel Seeds Can Help In Weight Loss : Lose Weight With Fennel Seeds Benefits and How To Consume : जेवण झाल्यावर मुखवास तर आपण खातोच, पण मुखवासातील एक पदार्थ आहे वेटलॉससाठी खास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 12:05 IST2025-05-13T15:49:33+5:302025-05-14T12:05:23+5:30

Does Fennel Water Help In Weight Loss : Here’s Why Fennel Seeds (Saunf) Help Lose Weight And Burn Body Fat : Fennel Seeds Water For Weight Loss : Fennel Seeds Can Help In Weight Loss : Lose Weight With Fennel Seeds Benefits and How To Consume : जेवण झाल्यावर मुखवास तर आपण खातोच, पण मुखवासातील एक पदार्थ आहे वेटलॉससाठी खास...

Lose Weight With Fennel Seeds Benefits and How To Consume Fennel Seeds Can Help In Weight Loss Fennel Seeds Water For Weight Loss | मुखवासातील 'हा' खास पदार्थ करतो सरसर वजन कमी! पोटाची ढेरी -बेढब मांड्या होतील सुडौल...

मुखवासातील 'हा' खास पदार्थ करतो सरसर वजन कमी! पोटाची ढेरी -बेढब मांड्या होतील सुडौल...

दिवसेंदिवस वाढत जाणारे वजन ही अनेकांसाठी खूप मोठी समस्या आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज व डाएट तर फॉलो करतोच, सोबतच अनेक लहान - मोठे उपाय (Here’s Why Fennel Seeds (Saunf) Help Lose Weight And Burn Body Fat) देखील करुन पाहतोच. वजन कमी करण्यासाठी (Fennel Seeds Water For Weight Loss) आपल्यापैकी बरेचजण वेगवेगळ्या बियांचे पाणी देखील (Fennel Seeds Can Help In Weight Loss) पितात. काहीजण मेथी दाणे, चिया सीड्स तर काहीजण जिरे, सब्जा यांसारख्या वेगवेगळ्या बिया पाण्यांत रात्रभर  भिजवून त्याचे पाणी पितात. यांसारख्या इतर बियांसोबतच वजन कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी पिणे देखील तितकेच फायदेशीर मानले जाते(Lose Weight With Fennel Seeds Benefits and How To Consume).

बडीशेप ही भारतीय स्वयंपाकघरातील एक सामान्य पण औषधी गुणधर्म असलेली मसाल्याची वस्तू आहे. त्यापासून तयार केलेले पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते, पचनक्रिया सुधारते आणि भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, म्हणूनच बडीशेपचे पाणी वेटलॉस करण्यासाठी उपयुक्त ठरते. वजन कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी कसे तयार करायचे आणि वेटलॉस करण्यासाठी त्याचा खरंच फायदा होतो का ते पाहूयात. Divya Gandhi's Diet & Nutrition Clinic च्या डाएटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट दिव्या गांधी यांनी only my health ला दिलेल्या मुलाखतीत, वजन कमी करण्यासाठी बडीशेप कशी फायदेशीर ठरते याबद्दल अधिक माहिती दिली आहे. 

बडीशेपचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते का ? 

बडीशेपचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. फार कमी वेळात झटपट वजन कमी करण्यासाठी हा एक योग्य पर्याय ठरु शकतो. या संदर्भात,  डाएटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट सांगतात, "वजन कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाऊ शकते. जे लोक नियमितपणे बडीशेपचे पाणी पितात त्यांचा चयापचय दर संतुलित असतो. असे लोक जे काही खातात ते सहज पचते आणि या लोकांना जास्त भूक लागत नाही. जेव्हा भूक नियंत्रणात असते, तेव्हा अशा व्यक्ती कारणाशिवाय जास्त खाणे टाळतात. तज्ज्ञ पुढे सांगतात, "जेव्हा तुम्ही नियमितपणे बडीशेपचे पाणी पिता तेव्हा शरीरातील विषारी पदार्थ देखील शरीरा बाहेर पडतात. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते."

जपानी लोक या ८ सवयींमुळे राहतात कायम सडपातळ! काय आहे त्यांचा फिटनेस फंडा, पाहा...

वजन कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी कसे मदत करते ?

१. पचन सुधारते :- ज्या लोकांना पचनाचे विकार असतात त्यांना इतर अनेक आरोग्य समस्यांनाही तोंड द्यावे लागते. पचन समस्यायामुळे पोटफुगी आणि गॅस सारख्या समस्या देखील उद्भवतात, ज्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नियमितपणे बडीशेपचे पाणी प्यायले तर पचनसंस्था सुधारते, सूज कमी होते आणि वजन कमी होण्यास सुरुवात होते. 

२. भूकेवर नियंत्रण राहते :- बडीशेपचे पाणी प्यायल्याने भूक कमी लागते. खरंतर, जेव्हा आपण बडीशेपचे पाणी पितो तेव्हा आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही. अशाप्रकारे, वारंवार भूक न लागल्याने आपण सारखं वरचेवर काही खात नाही. परिणामी, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर...

खरबूज की कलिंगड? वजन कमी करायचं तर उन्हाळ्यात यापैकी कोणतं फळ खाणं जास्त फायद्याचं...

३. शरीर डिटॉक्स करते :- बडीशेपमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि डिटॉक्स गुणधर्म शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात. त्यामुळे शरीर शुद्ध होते व त्वचा उजळते.

४. फॅट बर्निंग होते :- बडीशेप भूक नियंत्रणात ठेवते व शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. यामध्ये फायबर्स असतात जे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटू देतात आणि अनावश्यक खाणं टाळलं जातं. तसेच बडीशेप शरीरातील मेटॅबॉलिझम वाढवते, ज्यामुळे फॅट बर्निंग प्रक्रियेची गती वाढवण्यासाठी बडीशेपचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. 

वेटलॉससाठी बडीशेपचे पाणी कधी आणि कसे प्यावे ?

वजन कमी करण्यासाठी, दररोज १ ते २ चमचे बडीशेप एक ग्लास कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी गाळून दुसऱ्या दिवशी सकाळी प्या. ही प्रक्रिया काही दिवस सतत करा. काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या वजनात फरक जाणवू लागेल.

Web Title: Lose Weight With Fennel Seeds Benefits and How To Consume Fennel Seeds Can Help In Weight Loss Fennel Seeds Water For Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.