नवरात्रीच्या (Navratri 2025) दिवसांत बऱ्याच महिला ९ दिवसांचे उपवास करतात. उपवास करून शरीर डिटॉक्स करण्याचा प्रयत्न केला जातो (foods to eat during Navratri). तर काहीजण पोटाला आराम म्हणून उपवास करतात काहीजण श्रद्धेच्या भावनेन फलाहार घेतात. उपवासाच्या दिवसांत मांसाहारी पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळले जाते. काहीजण आलं-लसूण यांसारखे पदार्थही खात नाहीत. फक्त सात्विक अन्नाचे सेवन करतात. करिना कपूरच्या आहारतज्ज्ञ यांनी महिलांना खास सल्ला दिला आहे. (Nutritionist Rujuta Diwekar says 4 foods to eat during Navratri For Good Health)
करीना कपूर यांच्या सेलिब्रेटी न्युट्रिशनिस्ट ऋजूता दिवेकर सांगतात की नवरात्रीच्या दिवसांत उपवास आणि डिटॉक्सचा काळ असतो. नवरात्रीचा उपवास फक्त शरीराच्या डिटॉक्ससाठीच नाही तर पचनक्रिया,ताण-तणावमुक्तीसाठी बराच फायदेशीर ठरतो.
२२ सप्टेंबरला शेअर करण्यात आलेल्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये ऋजूता दिवेकर यांनी सांगितले की महिलांसाठी हे उपवास फायदेशीर आहेत. त्यांनी यात ४ पदार्थांचा आहारात समावेश करण्यास सांगितले आहे. पुरूषही या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.ज्यामुळे शरीर एनर्जेटीक राहील.
१) राजगिरा
ऋजूता सांगतात की नवरात्रीच्या उपवासात तुम्ही राजगिरा खायला हवा. राजगिऱ्याचे लाडू,चिक्की,थालीपीठ, भाकरी या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता. यातून तुम्हाला आयर्न मिळेल. जर तुम्ही आयर्न रिच फूड खाल्ले तर केस चांगले राहतात आणि हिमोग्लोबिन लेव्हल चांगली राहते. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
२ मिनिटांत भरपूर पीठ मळण्याची पाहा १ सोपी ट्रिक, चपात्याही होती मऊ-फुगतील टम्म
२) काजू
नवरात्रीच्या दिवसांत काजू खाल्ल्यानं तुम्हाला मॅग्नेशियम मिळेल. जर रात्री तुमच्या पायांमध्ये वेदना होत असतील, पोटात गॅस होत असेल तर काजू खाऊन तुम्ही हे त्रास कमी करू शकता. काजूमधील मॅग्नेशियम नसांना शांत करण्यास मदत करते.
३) केळी
नवरात्रीच्या दिवसांत तुम्ही केळीचे सेवन करायला हवेत. केळ्यात व्हिटामीन बी-६ असते ज्यामुळे मूड चांगला राहण्यास मदत होते. ज्यांना पिरीड्सच्या आधी ब्रेस्टमध्ये वेदना होतात त्यांनी केळी खायला हवे. यात प्री बायोटिक्स असतात ज्यामुळे तब्येत चांगली राहते.
नवरात्रात पटकन करा मऊसूत,लुसलुशीत उपवासाच्या इडल्या;पाहा इडलीची सोपी रेसिपी
४) शेंगा
ऋजूता सांगतात की चणे,चवळी, राजमा यांसारखे पदार्थ भिजवून नंतर मोड आणून खाल्ल्यस त्यातून अमिनो एसिड्स आणि प्रोटीन्स मिळतात ज्यामुळे हाडं मजबूत राहतात आणि मेंदू शांत राहण्यासही मदत होते.