कॉमेडीच्या दुनियेत धुमाकूळ घातल्यानंतर आता कपिल शर्मा त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत आला आहे. कपिल शर्मा केवळ आपल्या भन्नाट विनोदांमुळेच नाही, तर त्यांच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळेच सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहे. उत्तम फिटनेस म्हटलं की, महागड्या जिम आणि बेचव, स्वतःला न आवडणारं कडकडीत डाएट असंच चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहातं...परंतु कॉमेडियन कपिल शर्माने यातलं काहीच न करता अगदी घरच्याघरीच साधेसोपे नियम पाळून चक्क आपलं वजन कमी केलं आहे. विशेष म्हणजे, कपिलने तासंतास जिममध्ये घाम गाळून किंवा महागडं, फॅन्सी डाएट असं काहीच न करता साध्या लाईफस्टाईल बदलांच्या मदतीने वजन कमी केलं आहे, त्यामुळे कपिलने हे अगदी सहज अवघ्या काही महिन्यांतच नेमकं कसं केलं असा प्रश्न अनेकांना पडतो(Kapil Sharma weight loss journey and diet plan).
सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये प्रत्येकालाच जिमला जाणं शक्य होत नाही. अशावेळी कपिल शर्माने वापरलेल्या सोप्या आणि फायदेशीर पद्धती नक्कीच आपल्याला देखील उपयुक्त (how Kapil Sharma lost 11 kg in 63 days) ठरू शकतात. योग्य आहार, डेली रुटीनमध्ये केलेले छोटे बदल आणि सातत्य याच्या जोरावर त्याने स्वतःला फिट ठेवलं आणि हेच तुमच्यासाठीही सहज शक्य आहे...जिमची पायरीही न चढता कपिलने (fitness coach shares 21-21-21 rule for fat loss) स्वतःला इतकं फिट कसं बनवलं? वाढलेलं वजन कमी करण्यासाठी त्याने नेमका कोणता 'देसी' फॉर्म्युला वापरला? कपिलचा 'नो - जिम वेट लॉस प्लान' म्हणजे नेमकं काय ते पाहूयात...
१. योग्य आहार आणि खाण्यापिण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे...
कपिल शर्माचे फिटनेस कोच योगेश भाटेजा हे तसे अनेक सेलिब्रिटींचे कोच राहिले आहेत. या यादीत फराह खान आणि सोनू सूद यांचाही समावेश आहे. भारतीय घरांमध्ये अनेकदा आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्रेड, बटर, चहा, समोसा, ढोकळा किंवा पराठा खातात. बाहेर गेल्यावर जे काही सहज उपलब्ध होईल, ते विचार न करता आपण खातोच. परंतु कपिल शर्माचे फिटनेस कोच योगेश भाटेजा सांगतात की, फिटनेसची सुरुवात तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण स्वतः आपला आहार आणि लाईफस्टाईलबाबत जागरूक व्हायला सुरुवात करतो. आपल्या आहारामध्ये पाण्याच प्रमाण, श्वसनाची पद्धत आणि डेली रुटीनमध्ये काही छोटे - मोठे बदल केल्यानंतरच हळूहळू फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन होते.
कपिलचा 'नो - जिम वेट लॉस प्लान' म्हणजे नेमकं काय...
कपिल शर्माची फिटनेस जर्नी शेअर करताना फिटनेस कोच योगेश भाटेजांनी सांगितले की, 'इंटेन्स वर्कआउट' करण्याऐवजी त्यांनी स्लो सुरुवात केली आणि '२१-२१-२१' रुलला फॉलो केले.
१. पहिले २१ दिवस : मूव्हमेंट :- फिट राहण्याच्या या सुरुवातीच्या स्टेजमध्ये सर्वात आधी बॉडी मूव्हमेंट आणि स्ट्रेचिंगवर लक्ष केंद्रित केले. योगेशच्या मते, कोणताही हेवी व्यायाम न करता सुरुवातीला सर्व स्नायूंना हळूहळू ॲक्टिव्हेट केले. त्यांनी सांगितले की, जशी आधी शाळेत पीटी (PT) करून घेतली जात असे, अगदी तसाच व्यायाम पहिल्या २१ दिवसांत करावा. यासोबत कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त डाएट कंट्रोलची गरज नसते.
२. पुढील २१ दिवस : डाएटमध्ये बदल :- २१ दिवस सतत स्ट्रेचिंगसारखा हलका व्यायाम केल्यानंतर, पुढचे २१ दिवस हळूहळू खाण्याच्या - पिण्याच्या सवयींमध्ये थोडे बदल करा. मात्र, यासाठी खूप जास्त डायटिंग करण्याची गरज नाही. आपल्या डाएटमध्ये थोडा बदल करा. कार्ब्स आणि कॅलरी कमी करणे गरजेचे नाही, फक्त थोडा बदल आवश्यक आहे.
३. पुढील २१ दिवस : वाईट सवयींवर नियंत्रण ठेवा :- फिटनेस कोच सांगतात की, पुढच्या आणि शेवटच्या २१ दिवसांत तुम्हाला तुमच्या अशा सवयींवर नियंत्रण ठेवण्याची गरज असते, ज्यांच्यावर तुम्ही पूर्णपणे अवलंबून आहात. जसे की धूम्रपान (Smoking), मद्यपान (Alcohol), कॅफीनचे अधिक प्रमाण. कोणताही दबाव न आणता हळूहळू या सवयींमध्ये बदल घडवून आणायचा आहे. या नियमाचे पालन केल्यानंतर ४२ दिवसांतच बदल दिसून येऊ लागतो.
