Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > चपात्या करताना गव्हाच्या पिठात 'हा' पदार्थ घाला आणि महिनाभरात कमी करा ५ किलो वजन

चपात्या करताना गव्हाच्या पिठात 'हा' पदार्थ घाला आणि महिनाभरात कमी करा ५ किलो वजन

Weight Loss Tips: वाढलेलं वजन कमी करण्यासाठी हा एक उपाय करून पाहा...(just add this 1 ingredient in aata for making chapati)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 17:37 IST2025-02-12T11:27:19+5:302025-02-12T17:37:04+5:30

Weight Loss Tips: वाढलेलं वजन कमी करण्यासाठी हा एक उपाय करून पाहा...(just add this 1 ingredient in aata for making chapati)

just add this 1 ingredient in aata for making chapati for fast weight loss, how to loose 8 to 10 kg of weight in just 1 month  | चपात्या करताना गव्हाच्या पिठात 'हा' पदार्थ घाला आणि महिनाभरात कमी करा ५ किलो वजन

चपात्या करताना गव्हाच्या पिठात 'हा' पदार्थ घाला आणि महिनाभरात कमी करा ५ किलो वजन

Highlightsया पोळ्या खाताना त्यांच्यासोबत भरपूर प्रमाणात सलाड खा. शिवाय प्रोटीन्स मिळण्यासाठी पनीर, टोफू असे पदार्थ खा.

वाढलेलं वजन कमी कसं करायचं हा प्रश्न अनेकांना छळतो आहे. काही लोकांना वाढलेलं वजन कमी करण्यासाठी ना व्यायाम करायला वेळ मिळतो ना त्यांच्याकडून डाएट करून मोजून मापून खाल्लं जातं. त्यामुळे वजन कमी कसं करावं हे कळत नाही. तुमच्याही बाबतीत हेच होत असेल तर आता हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय करायला अतिशय सोपा असून त्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या नेहमीच्या चपात्या करण्याच्या गव्हाच्या पिठामध्ये म्हणजेच कणकेमध्ये आणखी एक पदार्थ घालायचा आहे (add this 1 ingredient in aata for making chapati for fast weight loss). तो पदार्थ  नेमका कोणता आणि त्यामुळे शरीरावर कसा परिणाम होतो ते पाहूया..(how to loose 8 to 10 kg of weight in just 1 month?)

 

वजन कमी करायचं तर 'या' पद्धतीने पोळ्या खा...

वजन कमी करायचं असेल तर कणकेमध्ये कोणते पीठ घालून त्याच्या पोळ्या खाव्या आणि पोळ्यांचे प्रमाण कसे असावे याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ डाॅक्टरांनी drkavitakhanna या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

जयपुरी कॉटन डबलबेड बेडशीट फक्त ४९९ रुपयांत, धमाकेदार ऑफर-करा स्वस्तात मस्त खरेदी 

यामध्ये डॉक्टर सांगत आहेत की पोळ्या करताना सगळं गव्हाचं पीठ घेऊ नका. तर त्याच्या जोडीला बेसन म्हणजेच हरबरा डाळीचं पीठसुद्धा घ्या. गव्हाचं पीठ आणि बेसन हे सारख्या प्रमाणात एका भांड्यात एकत्र करा आणि त्याच्या पोळ्या करून खा.

 

या पोळ्या खाताना त्यांच्यासोबत भरपूर प्रमाणात सलाड खा. शिवाय प्रोटीन्स मिळण्यासाठी पनीर, टोफू असे पदार्थ खा.

व्यायाम न करताही फिगर मेंटेन ठेवायची? ५ सवयी स्वत:ला लावून घ्या, नेहमीच दिसाल चवळीची शेंग

सकाळी दोन पोळ्या, दुपारी एक पोळी आणि रात्री १ पोळी या प्रमाणात ही पोळी खावी. नाश्त्याला १ पोळी आणि दुपारच्या जेवणात २ पोळ्या असा बदलही तुम्ही यामध्ये करू शकता. 

अशा पद्धतीने जर १ महिना आहार घेतला तर तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, कॅल्शियम, फायबर आणि लोह मिळेल. यामुळे पचनक्रिया, चयापचय क्रिया योग्य होऊन वजन कमी होण्यास मदत होईल असं डॉक्टर सांगत आहेत. 


 

Web Title: just add this 1 ingredient in aata for making chapati for fast weight loss, how to loose 8 to 10 kg of weight in just 1 month 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.