Join us

कमी खाल्लं-भरपूर व्यायाम केला तरी वजन घटत नाही? हे १ कारण ठरतंय मुख्य अडथळा-पाहा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 19:57 IST

Obesity Cause hormone : आपल्या शरीरात वेगवेगळे हार्मोन्स असतात. त्यातील एक म्हणजे Leptin हार्मोन. हे हार्मोन शरीरातील चरबीपासून तयार होतात.

Obesity Cause hormone : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही लोकांची नेहमीच तक्रार असते की, ते वजन कमी (Weight Loss ) करण्यासाठी खूपकाही करत आहेत, पण त्यांचं वजन कमी होत नाहीये. डाएट, एक्सरसाईज, योगा सगळं करूनही वजन जराही जागचं हलत नाहीये. तर मुळात याची वेगवेगळी कारण असू शकतात. यासाठी एक खास हार्मोन जबाबदार असतं. ज्याबाबत आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे.

आपल्या शरीरात वेगवेगळे हार्मोन्स असतात. त्यातील एक म्हणजे Leptin हार्मोन. हे हार्मोन शरीरातील चरबीपासून तयार होतात. अशात हे हार्मोन वजन कमी करण्यात कशाप्रकारे अडथळा ठरतं हे समजून घेऊयात.

काय आहे लेप्टिन?

क्लीवलॅंड क्लीनिकनुसार, लेप्टिन एक असं हार्मोन आहे जे शरीरातील चरबीपासून तयार होतं. याचं काम आपल्या शरीराचं वजन जास्त काळ नियंत्रित ठेवणं असतं. हे हार्मोन आपल्या मेंदुला संकेत देतं की, भूक लागली आहे की नाही. शरीरात जेवढी जास्त चरबी असेल, ते लेप्टिन हार्मोन्सचं प्रमाणाही तेवढं जास्त असतं. जर चरबी कमी असेल तर लेप्टिनही कमी असतात.

कसं काम करतं लेप्टिन?

लेप्टिन भूकेला कंट्रोल करतात आणि मेंदुला सांगतात की, आता पोट भरलं आहे खाणं बंद करा. हे हार्मोन आपल्या मेंदुच्या एका भागावर प्रभाव टाकतात. यानं रोजच्या भूकेवर प्रभाव पडत नाही. उलट हे जास्त वेळ खाणं आणि एनर्जी खर्चाचं बॅलन्स सांभाळण्याचं काम करतात. जेव्हा कुणी वजन कमी करण्याचा प्रयत्न करतं आणि लठ्ठपणा कमी होऊ लागतो, तेव्हा लेप्टिनही कमी होतात. त्यामुळे शरीराला वाटतं की, आता खाणं गरजेचं आहे. त्यामुळे व्यक्तीला आणखी जास्त भूक लागते.

लेप्टिन कंट्रोलमध्ये कसे ठेवाल?

लेप्टिन आपल्या शरीरातील चरबीपासून तयार होतात. अशात जेव्हा शरीरात जेवढी जास्त चरबी असेल, तेवढे जास्त लेप्टिन तयार होतील. जेवढी चरबी कमी होईल, तेवढे लेप्टिन हार्मोन कमी होतील.

लेप्टिन जास्त झाले तर काय होतं?

ज्यांचं वजन जास्त असतं, त्या लोकांची लेप्टिन लेव्हलही जास्त असते. पण गरजेचं नाही की, मेंदू त्याला बरोबर ओळखेल. या स्थितीला लेप्टिन रेजिस्टेंस म्हणतात. असं तेव्हा होतं जेव्हा मेंदुला भूक गेल्याचा संकेत मिळू शकत नाही. यामुळेच व्यक्ती ओव्हरईटिंग करते.

जास्त लेप्टिनमुळे होणाऱ्या समस्या

जर शरीरात लेप्टिन हार्मोन्स जास्त वाढत असतील तर काही समस्या होता. त्यात डिप्रेशन, पुन्हा पुन्हा भूक लागणे, मानसिक आजार, फॅटी लिव्हर, रॅब्सन-मेंडनहॉल सिंड्रोम यांचा समावेश आहे. 

काय आहेत लक्षणं?

पुन्हा पुन्हा भूक लागणं, ओव्हरईटिंग, वजन वाढणं, कोलेस्टेरॉल आणि फॅट्समध्ये असंतुलन, फॅटी लिव्हर, सतत बॅक्टेरिअल इन्फेक्शन, शरीरात जास्त इन्सुलिन तयार होणं, सेक्स हार्मोन्स कमी होणं ही लेप्टिन हार्मोन वाढल्याची लक्षणं सांगितली जातात.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य