Join us
Daily Top 2Weekly Top 5

जाडजूड मांड्या-पोटाचा घेर कमी करतो शेवग्याच्या पानांचा उपाय, वेटलॉससाठी शेवगा असरदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2026 10:05 IST

how to use moringa powder for weight loss : moringa powder benefits for weight loss : वेटलॉससाठी शेवग्याच्या पानांचे पाणी असरदार, करून पहावा असा साधासोपा घरगुती उपाय...

वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट आजकाल अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरतो. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, बैठे काम, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे वजन झपाट्याने वाढताना दिसतं. वजन कमी करण्यासाठी अनेकजण जिम, डाएट आणि महागडी प्रॉडक्ट्स वापरतात, पण तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. अशावेळी काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरू शकतात. आयुर्वेदात शेवग्याच्या पानांना विशेष महत्त्व दिलं जातं. पोषक घटकांनी युक्त अशी शेवग्याच्या पानांची पावडर शरीरातील मेटाबॉलिझम सुधारण्यास, पचनक्रिया चांगली ठेवण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. विशेष म्हणजे, योग्य पद्धतीने या पावडरचा वापर केल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासही मदत मिळू शकते(how to use moringa powder for weight loss).

औषधी गुणधर्म असणारी शेवग्याची पाने (Moringa Leaves) वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. या पानांच्या पावडरमध्ये असे काही खास गुणधर्म आहेत, जे शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने जाळण्यास मदत करतात. या छोट्याशा पानात अशी जादुई ताकद आहे ज्यामुळे मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा याच्या प्रेमात (how to drink moringa water) पडले आहेत. नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करायचं असेल, तर शेवग्याच्या पानांच्या पावडरचा योग्य वापर कसा करायचा हे जाणून घेणं नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. वेटलॉससाठी शेवग्याच्या पानांची पावडर कशी वापरायची आणि तिचे (best way to use moringa powder for weight loss) फायदे काय आहेत ते पाहूयात. 

शेवग्याच्या पानांची पावडर करेल झटपट वेटलॉस... 

आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांच्या मते, शेवग्याची पावडर शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. शेवगा हे एक असे सुपरफूड आहे ज्याच्या पानांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल आणि अनेक बायो ॲक्टिव्ह कंपाउंड्स असतात जे मेटाबॉलिझम वाढवतात आणि फॅट बर्निंग प्रक्रियेला मदत करतात. वैज्ञानिक संशोधनानुसार, शेवग्यामधील घटक शरीरात चरबी साठण्याची प्रक्रिया मंद करू शकतात आणि फॅट ब्रेकडाउनला प्रोत्साहन देऊ शकतात. 'जर्नल ऑफ फंक्शनल फूड्स' मध्ये प्रकाशित एका सिस्टिमॅटिक रिव्ह्यूमध्ये असे दिसून आले आहे की, शेवगा   वजन कमी करण्यास, लिपिड प्रोफाइल सुधारण्यास आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी अधिक चांगली करण्यास मदत करू शकते.

जपानी लोकांच्या ५ सवयी वाढवतात आयुष्य-हार्ट ॲटॅकही टळतो, ठरवलं तर आपल्यालाही जमेल सहज...

शहाळ्याची मलई खाल्ल्याने खरंच कोलेस्टेरॉल वाढतं का ? डाएटिशियन सांगतात, दिवसाला किती आणि कशी खावी मलई... 

संशोधनात असेही समोर आले आहे की, शेवगा भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर, जसे की लेप्टिन (Leptin) आणि घ्रेलिन (Ghrelin) वर परिणाम करू शकतो, ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होऊ शकते. याशिवाय, यातील फायबर पोट जास्त वेळ भरलेले ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे ओव्हरईटिंग कमी होऊ शकते. संशोधकांनुसार शेवग्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे मेटाबॉलिक आरोग्य सुधारण्यात भूमिका बजावू शकतात. यासोबतच शेवग्याचे पाणी प्यायल्याने वेगाने वजन कमी होण्यास मदत होते.  संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी लाईफस्टाईल देखील वेटलॉससाठी अत्यंत आवश्यक आहे.

वेटलॉससाठी शेवग्याचे पाणी कसे तयार करायचे ? 

१ ग्लास कोमट पाण्यात १ चमचा शेवग्याची पावडर मिसळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात लिंबाचा रस आणि मध देखील टाकून पिऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. 

दात पांढरेशुभ्र आणि हिरड्या मजबूत करणारं दंतमंजन, खिशाला परवडणारा घरगुती सुरक्षित उपाय...

वेटलॉस करण्यासाठी शेवग्याच्या पानांचे पाणी पिण्याचे फायदे... 

शेवग्याच्या पानांमध्ये असलेले पोषक घटक शरीराचा मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे शरीरातील कॅलरी आणि अतिरिक्त चरबी वेगाने बर्न होण्यास मदत मिळू शकते. शेवग्याच्या पाण्यात फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होऊ शकते. यामुळे ओव्हरईटिंग टाळण्यास मदत होते. नियमितपणे शेवग्याचे पाणी पिल्यास शरीरातील अतिरिक्त फॅट कमी होण्यास मदत मिळू शकते. विशेषतः पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी हा उपाय फायदेशीर मानला जातो. शेवग्यामधील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होऊ शकतात. वजन कमी करताना अनेकदा थकवा जाणवतो. पण शेवग्यामधील आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स शरीराला आवश्यक ऊर्जा देण्यास मदत करतात. शेवग्याचे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करू शकते. यामुळे शरीर अधिक हलके आणि फ्रेश वाटू लागते.

English
हिंदी सारांश
Web Title : Moringa leaves: Natural way to reduce belly fat and weight.

Web Summary : Moringa leaf powder boosts metabolism and aids digestion, helping control weight. It burns fat, reduces appetite, and improves metabolic health. Drinking moringa water on an empty stomach can accelerate weight loss when combined with a balanced diet and exercise.
टॅग्स :वेट लॉस टिप्सहोम रेमेडीफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स