Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सुटलेलं पोट काही दिवसांतच होईल सपाट! 'हे' पाणी प्यायला सुरुवात करा- १ महिन्यात दिसेल फरक

सुटलेलं पोट काही दिवसांतच होईल सपाट! 'हे' पाणी प्यायला सुरुवात करा- १ महिन्यात दिसेल फरक

How To Reduce Belly Fat: सुटलेलं पोट कमी करण्यासाठी काय करावं, असा प्रश्न पडला असेल तर लगेचच हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(amazing home remedy for flat belly)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2025 09:20 IST2025-05-25T09:15:14+5:302025-05-25T09:20:02+5:30

How To Reduce Belly Fat: सुटलेलं पोट कमी करण्यासाठी काय करावं, असा प्रश्न पडला असेल तर लगेचच हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(amazing home remedy for flat belly)

how to reduce belly fat, simple tips and tricks to reduce belly fat, amazing home remedy for flat belly | सुटलेलं पोट काही दिवसांतच होईल सपाट! 'हे' पाणी प्यायला सुरुवात करा- १ महिन्यात दिसेल फरक

सुटलेलं पोट काही दिवसांतच होईल सपाट! 'हे' पाणी प्यायला सुरुवात करा- १ महिन्यात दिसेल फरक

Highlightsसुटलेलं पोट तसेच वाढलेलं वजन कमी होईल. अगदी महिना भरातच खूप चांगला फरक दिसून येईल.  

हल्ली वाढतं वजन ही अनेकांच्या समोरची मोठी चिंता आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जीवनपद्धतीमध्ये झालेला बदल. बहुतांश लोकांना कामामुळे सलग ८ ते १० तास एका जागी बसून राहावं लागतं. व्यायामासाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. शिवाय आहारपद्धतीमध्येही खूप बदल झाला आहे. जंकफूड खाण्याचे प्रमाण लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळ्यांचेच वाढले आहे. याचा परिणाम आपल्या पचनशक्तीवर आणि चयापचय क्रियेवर होतो आणि परिणामी वजन वाढत जातं. पोटाचा घेर सुटत जातो (how to reduce belly fat?). सुटलेल्या पोटामुळे परेशान असाल तर ते कमी करण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून पाहा (simple tips and tricks to reduce belly fat). यामुळे पोट कमी होण्यास निश्चितच मदत होईल.(amazing home remedy for flat belly)

 

सुटलेलं पोट कमी करण्यासाठी काय उपाय करावा?

पोटाचा वाढता घेर कमी करण्यासाठी आपली चयापचय क्रिया आणि पचनक्रिया अधिक चांगली असणे गरजेचे आहे. यासाठी काय उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती डॉ. हंसा योगेंद्र यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

मेहेंदी लावल्याने केस खूप ड्राय होतात? 'या' पद्धतीने मेहेंदी भिजवा, केस होतील सिल्की- मुलायम

त्यासाठी त्यांनी असं सांगितलं आहे की दररोज रात्री झाेपण्यापुर्वी १ चमचा जीरे, अर्धा चमचा बडिशेप आणि अर्धा चमचा मेथी दाणे ३ कप पाणी घेऊन त्यात रात्रभर भिजत घाला. 

 

सकाळी हे पाणी एका पातेल्यामध्ये घ्या. त्यामध्ये दालचिनीचा एक छोटासा तुकडा, ३ ते ४ तुळशीची पाने आणि अर्धा चमचा किसलेलं आलं घाला. हे सगळे पदार्थ घातलेलं पाणी ८ ते १० मिनिटे उकळवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या.

पावसाळ्यात डास वाढण्याआधीच घरात लावा ५ रोपं! डास तुमच्या घराकडे फिरकणारच नाहीत

पाणी कोमट झाल्यावर त्यात लिंबाचा रस घाला आणि रोज सकाळी उपाशी पोटी अशा पद्धतीने तयार केलेलं पाणी प्या. काही दिवसांतच चयापचय आणि पचन क्रियेमध्ये चांगला बदल होईल आणि सुटलेलं पोट तसेच वाढलेलं वजन कमी होईल. अगदी महिना भरातच खूप चांगला फरक दिसून येईल.  
 

Web Title: how to reduce belly fat, simple tips and tricks to reduce belly fat, amazing home remedy for flat belly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.