वाढलेल्या वजनामुळे आजकाल बरेच लोक त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी महागडी उत्पादनं न वापरता तु्म्ही स्वंयपाकघरात उपलब्ध असलेले २-३ पदार्थ वापरू शकता (Weight Loss Tips). जीरं फक्त खाण्यापिण्याच्या पदार्थांतच नाही तर अनेक पदार्थ बनवण्यासाठी वापरलं जातं. जिऱ्यातील पोषक तत्व तुमचे आरोग्य सुधारण्यासही मदत करतात. जर तुम्हाला कमी वेळेत वजन कमी करायचं असेल तर तुम्ही जिऱ्याचं पाणी पिऊ शकता. जिऱ्यात बरेच औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. औषधी गुणांनी परिपूर्ण असलेलं जीरं तब्येतीसाठी खूपच गुणकारी ठरतं. (How To Make Jeera Water To Lose Weight)
वेट लॉससाठी जिऱ्याचं ड्रिंक कसं तयार करायचं?.
जिऱ्याचं पाणी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी १ ग्लास पाण्यात १ ते २ चमचे जीरं भिजवून ठेवा. जर तुम्ही रात्रभरासाठी जीरं भिजवून ठेवलं असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी जिऱ्याचं पाणी जवळपास ५ मिनिटं उकळवून घ्या. जेव्हा तुम्ही जिऱ्याचं पाणी कोमट करून घ्याल तेव्हा ते पिऊ शकता. जिऱ्याचं पाणी चवदार होण्यासाठी तुम्ही यात लिंबू किंवा मध घालू शकता.
हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार जिऱ्याचं पाणी शरीराचं मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत करते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पोटाची चरबी कमी करण्यापासून ते एसिडीटीच्या समस्येवर आराम मिळवण्यासाठी हे ड्रिंक खूपच फायदेशीर ठरते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करायला हवे. (Ref)
जिऱ्याचं पाणी पिण्याचे फायदे
जर तुम्ही नियमित जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केले तर ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तु्म्ही जिऱ्यांचं पाणी पिऊ शकता. जर तुम्ही नियमित जिऱ्याचं पाणी प्यायलात तर इम्युनिटी चांगली राहण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रणात राहते. पण नेहमी योग्य प्रमाणातच जिऱ्याचं पाणी प्या. अन्यथा तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय रोज व्यायाम किंवा योगा प्रकार करणं खूपच गरजेचं आहे. तसंच तुम्ही रोजच्या जेवणात किती खाता, काय खाता याकडे लक्ष द्यायला हवं. कॅलरीज कंट्रोल केले तर तुमचे वजन नक्कीच कमी होईल.
Web Summary : Struggling with weight? Cumin water can help! It boosts metabolism, aids digestion, and helps control blood sugar. Drink it on an empty stomach for best results alongside diet and exercise.
Web Summary : वजन से परेशान हैं? जीरे का पानी मदद कर सकता है! यह मेटाबॉलिज्म को बढ़ाता है, पाचन में सहायता करता है और ब्लड शुगर को नियंत्रित करने में मदद करता है। सर्वोत्तम परिणामों के लिए इसे खाली पेट पिएं, साथ ही आहार और व्यायाम भी करें।