Join us
Daily Top 2Weekly Top 5

नको कडवट ग्रीन टी, ना डाएटिंग! नेहमीच्या चहात करा १ छोटासा बदल - वजन घटेल, पोट होईल सपाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2026 13:43 IST

how to make fat burn tea at home : herbal tea for weight loss : वेटलॉस करण्यासाठी चहा सोडण्याचं टेंन्शन सोडा; करा 'हा' छोटा बदल - वजन उतरेल झरझर...

वजन कमी करायचं म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे कडवट 'ग्रीन टी' आणि आवडत्या चहाचा त्याग... चहाप्रेमींसाठी तर दूध आणि साखरेचा चहा सोडणं (tea for weight loss) म्हणजे एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नाही...अनेकदा वजन वाढेल या भीतीने आपण चहा नकोच म्हणतो, वेटलॉस करताना अनेकजण सर्वप्रथम चहा पिणंच बंद करतात, कारण चहा प्यायल्याने वजन वाढेल अशी भीती मनात असते. परंतु वेटलॉस करण्यासाठी आपला आवडता चहा सोडून देण्याची गरज नसते. उलट, आपल्या रोजच्या चहामध्ये काही छोटे आणि स्मार्ट बदल केल्यास तोच चहा हेल्दी बनवून वजन कमी करण्यास मदत करू शकतो(herbal tea for weight loss).

वेटलॉस करण्यासाठी योग्य घटक पदार्थांचा वापर आणि साखर - दूधाचे प्रमाण नियंत्रित ठेवले, तर चहा तुमच्या वेटलॉस प्रवासात अडथळा न ठरता उलट मदत करू शकतो. चहा पिणं सोडून देण्यापेक्षा, तो आरोग्यदायी कसा बनवायचा, हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. साखर, दूध आणि चहा पावडर यांच्या प्रमाणात थोडा (how to make fat burn tea at home) फेरफार करून आणि काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून आपण आपला नेहमीचाच चहा 'फॅट कटर' ड्रिंकसारखा तयार करु शकतो. नेहमीच्या चहाला हेल्दी ट्विस्ट देऊन तो वजन कमी करण्यासाठी कसा (herbal tea for weight loss) उपयोगी करायच्या याच्या काही स्मार्ट ट्रिक्स पाहूयात... 

नेहमीचाच चहा 'फॅट कटर' ड्रिंकसारखा तयार करण्याची सोपी ट्रिक... 

वेटलॉस करण्यासाठी घरच्याघरीच 'फॅट कटर' ड्रिंकसारखा चहा तयार करणं अगदी सहजसोपं आहे. हा वेटलॉस स्पेशल चहा तयार करण्यासाठी बाहेरून काहीही विकत आणण्याची गरज नाही...किचनमधील 'या' २ मसाल्यांच्या मदतीने आपण अगदी झटपट इन्स्टंट वेटलॉस चहा घरच्याघरीच तयार करु शकतो. 

आरशात पाहताच डोळ्यांखालची डार्क सर्कल्सच दिसतात, करा काकडी उपाय-डोळ्यांवरुन हटणार नाही नजर...

थंडगार उसाचा रस की स्लो पॉयझन? 'या' ५ समस्या असतील तर स्त्रियांनी उसाचा रस पिणं फार धोक्याचं...

हा चहा बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या पदार्थांची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या फक्त २ मसाल्यांचा वापर करून तुम्ही हा 'फॅट बर्निंग' चहा तयार करू शकता. हा चहा तयार करण्यासाठी आपल्याला लवंग (Cloves) आणि बडीशेप (Fennel Seeds) या दोन पदार्थांची गरज लागणार आहे. लवंग आणि बडीशेपच्या चहाचा वापर आपल्या आयुर्वेदिक परंपरेत शतकानुशतके केला जात आहे. हे केवळ एक पेय नसून एक औषधी अर्क मानले जाते. दररोज या चहाचा एक कप प्यायल्याने पोटावर साठलेली हट्टी चरबी हळूहळू कमी होण्यास मदत होते. हा चहा तुमच्या पचनसंस्थेला आतून मजबूत बनवतो. पचनक्रिया सुधारल्यामुळे अन्नाचे ऊर्जेत रूपांतर नीट होते आणि चरबी साठण्याचे प्रमाण कमी होते.

वेटलॉस चहा बनवण्याची सोपी पद्धत...

हा चहा बनवणे अत्यंत सोपे आहे आणि यासाठी लागणारे साहित्य तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. १ कप पाणी, १/२ टेबलस्पून बडीशेप, १ ते २ लवंग काड्या, चवीनुसार मध किंवा लिंबाचा रस इतकं साहित्य लागेल. एका पॅनमध्ये एक कप पाणी घेऊन ते मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. पाण्याला हलकी उकळी आली की, त्यात बडीशेप आणि लवंग टाका. गॅसची आंच मंद करा आणि ५ ते ७ मिनिटे हे पाणी चांगले उकळू द्या. यामुळे बडीशेप आणि लवंगाचा अर्क पाण्यात पूर्णपणे उतरतो. गॅस बंद केल्यानंतर पॅनवर २-३ मिनिटे झाकण ठेवून द्या. यामुळे चहाचा फ्लेवर आणि गुणधर्म टिकून राहतात. आता हा चहा कपमध्ये गाळून घ्या.

चमचाभर बडीशेप करेल केस काळेभोर! स्वस्तात मस्त 'केमिकल-फ्री' हेअरडाय - कमी खर्चात पार्लरसारखा लूक...

चहा थोडा कोमट झाला की, त्यात तुमच्या आवडीनुसार थोडे मध किंवा लिंबाचा रस घालून तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. (लक्षात ठेवा, मध कधीही उकळत्या पाण्यात टाकू नका). असा चहा आपण  सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. तसेच, रात्री झोपायच्या १ तास आधीही तुम्ही चहा पिऊ शकता. दररोज १ ते २ कप इतकंच प्रमाण पुरेसं आहे, जास्त प्रमाणात पिणं टाळा. 

असा चहा पिण्याने वेटलॉस कसा काय होतो ? 

१. बडीशेप :- बडीशेप ही फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. यात 'डिटॉक्सिफायिंग' गुणधर्म असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. बडीशेपमुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही, ज्यामुळे तुम्ही अनावश्यक खाणे टाळता. तसेच, हे पचनसंस्था सुधारून 'ब्लॉटिंग' किंवा पोट फुगण्याची समस्या दूर करते, ज्यामुळे पोट सपाट दिसण्यास मदत होते.

२. लवंग काड्या :- लवंग हे एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे. हे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. लवंग चयापचय क्रिया इतकी वेगवान करते की, शरीरात साठलेली जुनी चरबी उर्जेमध्ये रूपांतरित होऊन जळण्यास सुरुवात होते. हे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवण्यासाठीही उपयुक्त ठरते.

३. मध :- साखरेला सर्वात उत्तम पर्याय म्हणजे मध. मध हे केवळ नैसर्गिक गोडवा देत नाही, तर ते शरीरातील साठलेली चरबी हळूहळू वितळवण्यास मदत करते. झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्यास झोपेतही फॅट बर्निंगची प्रक्रिया सुरू राहते. मधात असलेले अमिनो ॲसिड्स वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात.

४. लिंबाचा रस :- लिंबामध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि सिट्रिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते. हे शरीराचा 'मेटाबॉलिक रेट' वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगवान होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Lose weight easily: Simple tea swap melts fat, flattens stomach.

Web Summary : Ditch the green tea and dieting! Enjoy regular tea with a clove and fennel twist. This spice-infused beverage boosts metabolism, aids digestion, and burns fat. Add honey or lemon for extra benefits.
टॅग्स :वेट लॉस टिप्सहोम रेमेडीफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स