Join us

प्रचंड मेहनतीने कमी केलेलं वजन पुन्हा वाढू नये म्हणून ७ टिप्स- वजनाचा काटा हलणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2025 14:18 IST

How To Maintain Weight After Losing It : maintain weight after weight loss : weight maintenance tips : how to prevent weight regain : वजन जितक्या वेगाने कमी होते तितक्याच वेगाने पुन्हा वाढते, असे होऊ नये म्हणून डॉक्टर सांगतात ७ ट्रिक्स...

सतत वाढत जाणारे वजन ही सध्या एक फार मोठी कॉमन समस्याच झाली आहे. आजकाल प्रत्येकजण आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय आणि प्रयत्न करत असतो. वजन कमी करणे एक वेळ सोपे आहे, पण कमी केलेला वजनाचा आकडा मेंटेन करणं किंवा वजन पुन्हा वाढू न देणं हे थोडे अवघड (How To Maintain Weight After Losing It) काम आहे. आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत असं होतं की, फार मेहेनत घेऊन वजन कमी (maintain weight after weight loss) केलं परंतु काही दिवसांतच वजन पुन्हा वाढू लागतं. अशा परिस्थितीत, वजन जितक्या वेगाने कमी होते तितक्याच वेगाने ते पुन्हा वाढू लागते. 

वजन कमी करणे सोपे आहे, पण ते टिकवून ठेवण्यासाठी संयमाची आवश्यकता असते. आपल्यापैकी बरेचजण अनेकदा डाएट आणि व्यायामाच्या मदतीने वजन (how to prevent weight regain) कमी करतात, पण नंतर शरीर पुन्हा फॅट्स साठवू लागते. असे यासाठी होते, कारण आपल्याला वाटते की वजन कमी केल्यानंतर ते सहज वाढणार नाही, परंतु वजन कमी केल्यानंतर (weight maintenance tips) जर योग्य काळजी घेतली नाही, तर वजन दुप्पट वेगाने वाढते. अशा परिस्थितीत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, वेगाने कमी केलेले वजन कसे टिकवून ठेवावे? या विषयावर अधिक चांगल्या माहितीसाठी onlymyhealth.com या वेबसाईटवर डॉ. शकीब हसन यांनी काही खास टिप्स व ट्रिक्स सांगितल्या आहेत. 

झटपट वेगाने कमी केलेलं वजन कसं टिकवून ठेवावं यासाठी ट्रिक्स... 

१. डॉ. शकीब हसन यांनी सांगितले की, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रथिनयुक्त आहार घ्या आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगवर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमच्या चयापचय क्रियेचा वेग चांगला वाढेल जे वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर असते. याचबरोबर, हार्मोन्सचा समतोल देखील राखला जाईल. १२ ते १८ महिने सातत्याने हेल्दी रुटीन पाळा. शरीराला नवीन वजनाशी जुळवून घेण्यासाठी इतका वेळ लागतोच.

२. खूप वेळ किंवा तासंतास एकाच जागी बसून राहिल्याने देखील आपले वजन पुन्हा वाढू शकते. यासाठी, दर २ ते ३ तासांनी ३ ते ४ मिनिटे चाला. 

स्तनांचा आकार मोठा असेल, तर ब्रेसियर घेताना करुन नका ६ चुका - 'अशी' ब्रा घालणे ठरेल फायद्याचे...

गुडघेदुखीवर असरदार वडाच्या पानांचा आयुर्वेदिक उपाय! वेदना आणि सूज होते कमी-पाहा करायचे काय...

३. ओव्हरइटिंग टाळण्यासाठी आणि व्यायामानंतर मसल रिकव्हरीसाठी आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. उदा. डाळीचे पाणी किंवा पनीर, टोफू इत्यादी अधिक प्रोटीनयुक्त पदार्थ. 

४. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने २०१५ मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार, हाय प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने वजन कमी होते, चरबी घटते तसेच, हा आहार दीर्घकाळ वजन मेंटेंन ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. 

'व्हिटामिन B - १२' ची कमतरता भरुन काढण्यासाठी रोज वाटीभर खा 'ही' डाळ, B - १२ वाढेल वेगाने - रहाल तंदुरुस्त... 

सणावाराला भरपूर खाणं होत ? ओव्हरइटिंगचा त्रास, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ टिप्स - 'अशी' घ्या तब्येतीची काळजी...

५. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या २०२५ मधील एका अभ्यासानुसार, 'चीट मील्स' घेणे वजन कमी करण्यासोबतच वजन मेंटेंन ठेवण्यासाठी देखील  आवश्यक आहे. यामुळे दीर्घकाळ डाएट करताना भूक नियंत्रित करण्यास आणि समाधान वाढवण्यास मदत करू शकतात. त्याचबरोबर, ते स्नायूंचे आरोग्य  टिकवून ठेवण्यासही मदत करतात. जर तुम्ही पूर्ण आठवडा योग्य प्रमाणात कॅलरी घेत असाल आणि वजन कमी होत असेल, तर स्वतःसाठी एक दिवस 'चीट डे' ठेवा. यात तुमच्या कॅलरीच्या प्रमाणात लवचिकता ठेवा. म्हणजेच, संपूर्ण आठवडा कॅलरीचे प्रमाण नियंत्रणात ठेवा आणि वीकेंडला स्वतःला थोडी सूट द्या. यामुळे डाएट प्लॅन फॉलो करणे कठीण वाटणार नाही आणि खाण्याची तीव्र इच्छा नियंत्रणात राहील. अशा प्रकारे तुम्ही दीर्घकाळ डाएट टिकवून ठेवू शकाल आणि वजन कमी करणे सोपे होईल.

६. जर तुम्हाला दीर्घकाळापर्यंत वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, तर तुमच्या आहारात हाय फायबरयुक्त पदार्थांचा अधिक जास्त समावेश करा. रात्रीच्या जेवणात तुम्ही सॅलड, सूप आणि वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांचा समावेश करू शकता. रात्री फायबरयुक्त पदार्थां खाल्ल्याने पचन हळू होते आणि पोट बराच काळ भरलेले राहते. यामुळे तुम्ही रात्री होणारे फूड क्रेविंग्स टाळू शकता. तसेच, सकाळी पोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

७. जर तुम्हाला वजन कमी केल्यानंतर ते कायम टिकवून ठेवायचे असेल, तर दिवसभरात पुरेसे पाणी प्या. शरीर हायड्रेटेड राहिल्यास पचनक्रिया सुधारेल, फूड क्रेविंग्स कमी होईल आणि पोट भरल्यासारखे वाटेल. यामुळे वजन कमी करण्यास आणि ते टिकवून ठेवण्यास मदत होते. हा वजन कमी करण्याचा सोपा उपाय वाटत असला तरी तो खूप फायदेशीर आहे.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स