सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये PCOD आणि PCOS या समस्या महिलांसाठी फक्त शारीरिक व्याधी न राहता एक मोठी समस्याच झाल्या आहेत. चेहऱ्यावरचे केस, पिंपल्स किंवा अनियमित मासिक पाळी यांसोबतच महिलांना सर्वाधिक सतावणारी गोष्ट म्हणजे 'बेली फॅट' किंवा पोटाचा वाढलेला घेरा. अनेकदा प्रयत्न करूनही हे वजन कमी होत नाही, तेव्हा नैराश्य येणे स्वाभाविक आहे(how to lose belly fat with PCOD naturally).
PCOD आणि PCOS मुळे होणारे हार्मोनल असंतुलन आणि मेटाबॉलिझमचा वेग कमी होणे यांचा थेट परिणाम शरीरावर होऊन, पोटावर मोठ्या प्रमाणावर चरबी साठत जाते. त्यामुळे अनेक महिलांना प्रयत्न करूनही बेली फॅट कमी होत नाही, असा अनुभव येतो. पण लक्षात ठेवा, वजन कमी करणे अशक्य नाही! योग्य आहार, लाईफस्टाईलमधील गरजेचे बदल मदतीने आपण वेटलॉस करुन पुन्हा फिट होऊ शकतो. PCOD आणि PCOS चा त्रास असेल तर, पोटाची ही हट्टी चरबी कमी करण्याचे नेमके घरगुती उपाय (how to flatten stomach with PCOD) काय आहेत याबद्दल इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत डायटिशियन मनप्रीत कालरा यांनी अधिक माहिती दिली आहे.
PCOD आणि PCOS चा त्रास असेल तर बेली फॅट्स का वाढतात ?
१. इन्सुलिन रेझिस्टन्स (Insulin Resistance) :- हे बेली फॅट वाढण्याचे मुख्य कारण आहे. यामुळे शरीरातील साखर ऊर्जेत रूपांतरित न होता चरबीच्या स्वरूपात पोटाच्या भोवती जमा होऊ लागते. तसेच, यामुळे शरीरात 'अँड्रोजन' (Androgen) या पुरुषी हार्मोन्सची निर्मिती वाढते.
२. हार्मोनल इम्बॅलन्स (Hormonal Imbalance) :- जेव्हा शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि अँड्रोजनची पातळी वाढते, तेव्हा पोटावर चरबी साठू लागते. याचा थेट परिणाम ओव्हुलेशनच्या (बीज निर्मिती) प्रक्रियेवर होतो.
नवरा की बायको? भांडणाला आधी सुरुवात कोण करतं... रिसर्च सांगतो 'या' एका कारणामुळे सुरू होतं भांडण...
३. कोर्टिसोलमध्ये वाढ (High Cortisol) :- तणावामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन्सचे प्रमाण वाढते, ज्याला 'स्ट्रेस हार्मोन' असेही म्हणतात. हे हार्मोन पोटाच्या भागातील चरबी वाढवण्यास जबाबदार असते.
४. चयापचय क्रियेचा वेग कमी होणे (Slow Metabolism) :- मेटाबॉलिझम मंदावल्यामुळे शरीर कॅलरीज लवकर बर्न करू शकत नाही. परिणामी, अन्नाचे रूपांतर ऊर्जेऐवजी चरबीत होते आणि ही चरबी प्रामुख्याने पोटाभोवती जमा होते.
PCOD आणि PCOS चा त्रास असेल तर बेली फॅट्स कमी करण्यासाठी काय करावं ?
१. आहारात तृणधान्यांचा समावेश करा :- रोजच्या आहारात नाचणी, ज्वारी, बाजरी आणि ब्राऊन राइस यांसारख्या संपूर्ण तृणधान्यांचा समावेश करा. ही धान्ये रक्तातील साखर एकदम वाढू देत नाहीत आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात.
गुडघ्यापर्यंत लांब केस हवे तर करा 'या' तेलानं करा मसाज, केस इतके वाढतील , की सांभाळणंही कठीण...
२. पालेभाज्या आणि फायबर :- जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खाण्यावर भर द्या. प्रामुख्याने शेवग्याच्या शेंगा, मेथी, कोबी आणि कारले यांसारख्या भाज्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. या भाज्या शरीरातील सूज कमी करण्यासही मदत करतात.
३. प्रोटीनयुक्त पदार्थ :- पनीर आणि विविध प्रकारच्या डाळींचा आहारात नक्की समावेश करा. प्रोटीनमुळे आपले पोट जास्त वेळ भरलेले राहते ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि हार्मोन्स संतुलित राखण्यास मदत होते.
Web Summary : PCOS-related hormonal imbalances often lead to belly fat. Dietician Manpreet Kalra suggests incorporating whole grains, leafy vegetables, and protein-rich foods like paneer and lentils to combat insulin resistance, balance hormones, and boost metabolism for effective weight loss.
Web Summary : पीसीओएस से संबंधित हार्मोनल असंतुलन अक्सर पेट की चर्बी का कारण बनता है। डायटीशियन मनप्रीत कालरा इंसुलिन प्रतिरोध से निपटने, हार्मोन को संतुलित करने और प्रभावी वजन घटाने के लिए मेटाबॉलिज्म को बढ़ावा देने के लिए साबुत अनाज, पत्तेदार सब्जियां और पनीर और दाल जैसे प्रोटीन युक्त खाद्य पदार्थों को शामिल करने का सुझाव देती हैं।