Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > हात- पाय बारीक पण पोट फार सुटलं? बघा तुळस- दालचिनीचा खास उपाय, सुटलेलं पोट होईल सपाट

हात- पाय बारीक पण पोट फार सुटलं? बघा तुळस- दालचिनीचा खास उपाय, सुटलेलं पोट होईल सपाट

Best Ayurvedic Remedy For Reducing Belly Fat: हात- पाय किंवा इतर शरीर अगदी सुडौल असतं, पण पोटाचा घेर मात्र वाढत जातो, असं तुमच्याही बाबतीत झालं असेल तर आहारतज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय करून पाहा... (fat burner tea for fast weight loss)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2024 01:00 PM2024-05-24T13:00:22+5:302024-05-24T16:50:57+5:30

Best Ayurvedic Remedy For Reducing Belly Fat: हात- पाय किंवा इतर शरीर अगदी सुडौल असतं, पण पोटाचा घेर मात्र वाढत जातो, असं तुमच्याही बाबतीत झालं असेल तर आहारतज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय करून पाहा... (fat burner tea for fast weight loss)

how to lose belly fat, best ayurvedic remedy for reducing belly fat, fat burner tea for fast weight loss | हात- पाय बारीक पण पोट फार सुटलं? बघा तुळस- दालचिनीचा खास उपाय, सुटलेलं पोट होईल सपाट

हात- पाय बारीक पण पोट फार सुटलं? बघा तुळस- दालचिनीचा खास उपाय, सुटलेलं पोट होईल सपाट

Highlightsहा एक काढा दररोज सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्यास ओटी पोटाचा भाग तसेच शरीरावरची अतिरिक्त चरबी झरझर कमी होईल.

बऱ्याच महिलांच्या बाबतीत असं होतं की त्याचं इतर शरीर अगदी व्यवस्थित प्रमाणशीर असतं. परफेक्ट फिगर असं म्हटलं तरी चालेल. पण नेमकी एक गोष्ट मात्र त्यांची फिगर बिघडवून टाकते. ती गोष्ट म्हणजे सुटलेलं ओटी पोट. ओटीपोटाचा भाग खूपच बेढब पद्धतीने वाढलेला असतो. तो कमी करायचा कसा, हा प्रश्न मग अशा महिलांना छळतो. व्यायाम हा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहेच. पण त्यासोबतच हा एक काढा दररोज सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्यास ओटी पोटाचा भाग झरझर कमी होईल (fat burner tea for fast weight loss), असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत. तो काढा कसा करायचा ते पाहा... (best ayurvedic remedy for reducing belly fat)

 

ओटी पोट कमी करण्यासाठी उपाय

सुटलेलं ओटी पोट कशा पद्धतीने कमी करायचं याविषयीचा एक व्हिडिओ dt.ramitakaur या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी एक खास फॅट बर्नर काढा करण्याचा उपाय सांगितला आहे.

कडिपत्ता चांगला वाढतच नाही? ४ सोपे घरगुती उपाय, काही दिवसांतच होईल डेरेदार- हिरवागार...

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची २ ते ३ पाने, दालचिनीचा एक छोटासा तुकडा, एक इंच आल्याचा किस, चिमूटभर हळद असे ४ पदार्थ लागणार आहेत.

 

सगळ्यात आधी एक ते दिड कप पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. त्या पाण्यामध्ये तुळशीची पानं, दालचिनी, आलं, हळद असं सगळं साहित्य टाका आणि हे पाणी १० मिनिटे चांगलं उकळून घ्या.

केस गळणं थांबेना? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात रोज 'ही' पावडर चिमूटभर खा, ८ दिवसांतच केस गळणं कमी  

यानंतर हा काढा सकाळी रिकाम्यापोटी गरमागरम पिऊन घ्या. नियमितपणे हा उपाय केल्यास काही दिवसांतच पोट तसेच शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी होईल. तसेच शरीराला इतरही अनेक फायदे होतील. 

 

Web Title: how to lose belly fat, best ayurvedic remedy for reducing belly fat, fat burner tea for fast weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.