Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ब्रेस्टचा आकार वाढत नाही-बारीक दिसता? ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी करा ५ उपाय, सुडौल दिसाल

ब्रेस्टचा आकार वाढत नाही-बारीक दिसता? ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी करा ५ उपाय, सुडौल दिसाल

How To Increase Breast Size : दररोज ७ ते ८ तास शांत झोप घ्या. पुरेशी झोप न मिळाल्यास हार्मोनल असंतुलन होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 11:32 IST2025-09-14T11:22:39+5:302025-09-14T11:32:25+5:30

How To Increase Breast Size : दररोज ७ ते ८ तास शांत झोप घ्या. पुरेशी झोप न मिळाल्यास हार्मोनल असंतुलन होऊ शकते.

How To Increase Breast Size : Best Natural Ways to Increase Breast Size | ब्रेस्टचा आकार वाढत नाही-बारीक दिसता? ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी करा ५ उपाय, सुडौल दिसाल

ब्रेस्टचा आकार वाढत नाही-बारीक दिसता? ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी करा ५ उपाय, सुडौल दिसाल

आपली फिगर सुंदर, सुडौल दिसावी असं प्रत्येकालचा वाटत असतं. चांगली फिगर मिळवण्यासाठी महिला बरीच मेहनत घेतात.  तुमची पर्सनॅलिटी कशी आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. स्तनांचा आकार खूपच लहान असेल आणि तुम्ही बारीक दिसत असाल तर हळूहळू आत्मविश्वास कमी होऊ लागतो (How To Increase Breast Size).

शरीरात इस्ट्रोजनची कमतरता, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे ब्रेस्टचा आकार व्यवस्थित  वाढत  नाहीत. स्तनांचा आकार वाढवण्यासाठी काही सोपे उपाय तुम्ही घरीच करू शकता. नैसर्गिकरित्या स्तनांचा आकार वाढवण्यासाठी तुम्ही काही उपाय  करू शकता. यासाठी आहार, व्यायाम आणि जीवनशैली यामध्ये सकारात्मक बदल करणे महत्त्वाचे आहे. (Best Natural Ways to Increase Breast Size)

योग्य आहार आणि पोषण

स्तनांमध्ये मुख्यत्वे ॲडिपोज टिश्यू (adipose tissue), म्हणजेच चरबीयुक्त ऊती असतात. त्यामुळे शरीरातील एकूण चरबीच्या प्रमाणाचा स्तनांच्या आकारावर थेट परिणाम होतो.स्तनांच्या वाढीसाठी इस्ट्रोजेन हार्मोनची भूमिका महत्त्वाची असते. सोयाबीन, शेंगदाणे, अळशीचे बीज, तीळ, बडीशेप, बीट आणि गाजर यांसारख्या पदार्थांमध्ये फायटोइस्ट्रोजेन नावाचा नैसर्गिक घटक असतो, जो इस्ट्रोजेनप्रमाणे कार्य करतो (Ref). शरीरातील ऊतींची आणि पेशींची वाढ होण्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत. दूध, अंडी, चिकन, मासे, पनीर, डाळी आणि कडधान्ये यांचा आहारात समावेश करा. स्तनांमध्ये चरबीचे प्रमाण वाढवण्यासाठी निरोगी चरबीयुक्त पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. यासाठी ऑलिव्ह ऑईल, अवाकाडो,बदाम,अक्रोड आणि सुर्यफुलाच्या बियांचा वापर करा.

लाईफस्टाईलमध्ये बदल

दररोज ७ ते ८ तास शांत झोप घ्या. पुरेशी झोप न मिळाल्यास हार्मोनल असंतुलन होऊ शकते. ताण-तणावामुळे कोर्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढते, जे शरीरातील इस्ट्रोजन पातळीवर परिणाम करू शकते. योग, ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करून ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. योग्य मापाची ब्रा वापरल्याने स्तनांना योग्य आधार मिळतो. त्यामुळे स्तनांचा आकार योग्य आणि आकर्षक दिसतो.

नियमित व्यायाम 

स्तनांचा आकार थेट वाढवणारे व्यायाम नसले तरी, छातीच्या स्नायूंना बळकटी देणारे काही व्यायाम केल्याने स्तनांना योग्य आधार मिळतो आणि ते अधिक आकर्षक दिसतात. पुशअप्स छातीचे स्नायू मजबूत बनवतात. सुरुवातीला गुडघ्यांवर टेकून पुश-अप्सचा सराव करू शकता. डम्बल प्रेस या व्यायामासाठी तुम्ही हलक्या वजनाचे डम्बल वापरू शकता. चेस्ट फ्लाय हा व्यायाम छातीच्या स्नायूंना ताण देतो, ज्यामुळे स्तनांना चांगला आकार मिळतो.

Web Title: How To Increase Breast Size : Best Natural Ways to Increase Breast Size

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.