Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोटभर भात खाऊनही वजन, शुगर किंचितही वाढणार नाही! न्यूट्रिशनिस्ट सांगतात भात खाण्याच्या ५ ट्रिक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2025 10:38 IST

how to eat rice for better heart health five healthy ways : healthy ways to eat rice : वजन - शुगर वाढू न देता भात खाण्याच्या आरोग्यपूर्ण पद्धती नेमक्या कोणत्या आहेत ते पाहा...

'भात' हा आपल्या नेहमीच्या आहारातील सर्वात मुख्य पदार्थ. आपल्यापैकी काहीजणांना भात खाल्ल्याशिवाय जेवण जेवल्यासारखे वाटतच नाही. परंतु अनेकदा रोज भात खाल्ल्याने आपले वजन आणि शुगर वाढेल अशी अनेकांना भीती असते. आपल्याकडे भाताला वजन किंवा शुगर वाढवणारा प्रमुख पदार्थ म्हणून चुकीच्या पद्धतीने पाहिले जाते. यामुळे अनेकजण भात खायचेच सोडून देतात(how to eat rice for better heart health five healthy ways).

पण, आहारतज्ज्ञांच्या मते, भाताबद्दलची ही भीती पूर्णपणे काढून टाकून जर भात योग्य प्रमाणात आणि आरोग्यपूर्ण पद्धतीने खाल्ला गेला, तर तो शरीराला आवश्यक ऊर्जा देतो आणि तो हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो. योग्य पद्धतींचा वापर केल्यास, भातातील पोषक तत्वे आपल्याला मिळतात आणि हृदयविकाराचा धोकाही वाढत नाही. न्यूट्रिशनिस्ट ॲट द न्यूट्रीवाईज क्लिनिकच्या डॉक्टर नेहा सिन्हा यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत भात खाण्याच्या योग्य पद्धती बद्दल माहिती दिली आहे. भात खाण्याच्या (healthy ways to eat rice) आरोग्यपूर्ण पद्धती नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूयात. 

भात खाण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती ते पाहूयात... 

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या (National Library of Medicine) एका अभ्यासानुसार, मर्यादित प्रमाणात भात खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढत नाही, म्हणजेच आरोग्यपूर्ण पद्धतीने भात खाणे हृदयासाठी हानिकारक नाही. भातामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स शरीराला ऊर्जा देतात. भात खाण्याच्या पद्धतीमध्ये बदल करून तुम्ही अगदी बिंधास्तपणे भात खाऊ शकता. 

१. भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी करून खा :- ज्यांना भात खाणे खूप आवडते आणि त्यांना तो त्यांच्या आहारात आरोग्यपूर्ण पद्धतीने समाविष्ट करायचा आहे, त्यांच्यासाठी एक सोपी युक्ती आहे, जी फॉलो करून आपण भात हेल्दी पद्धतीने खाऊ शकतात. न्यूट्रिशनिस्ट नेहा सिन्हा यांनी सांगितले की, भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी करून खाल्ल्यास तुम्ही निरोगी राहाल, भात खाऊन तुमचे वजन लवकर वाढणार नाही आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील. शिजवलेला भात रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा आणि सकाळी हा भात गरम करून खा. ब्राऊन राइसमध्येही सफेद भाताप्रमाणे स्टार्च तयार होतो, ज्याला फ्रीजमध्ये ठेवून कमी केले जाऊ शकते. भातामध्ये असलेला स्टार्च सहज पचत नाही, म्हणून तो कमी करणे आवश्यक आहे. फ्रीजमध्ये ठेवल्याने स्टार्चचे रूपांतर 'रेझिस्टंट स्टार्च'मध्ये होते, ज्यामुळे भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो.

लग्नानंतर स्तनांचा आकार वाढतो -बदलतो? समज-गैरसमज बाजूला ठेवा, वाचा खरं ते काय...

३. सफेद भाताऐवजी ब्राऊन राइस खा :- ब्राऊन राइसचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो, जो मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतो. सफेद भाताऐवजी ब्राऊन राइसला आहारात समाविष्ट करा. न्यूट्रिशनिस्ट नेहा सिन्हा यांनी सांगितले की, ब्राऊन राइस आतड्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो. ब्राऊन राइस खाल्ल्याने पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात. ब्राऊन राइसमध्ये मॅग्नेशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर पोषक तत्व मानले जातात. यात असलेल्या फायबरमुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते.

४. भातासोबत फायबरयुक्त भाज्या खाव्यात :- फक्त भात खाण्याऐवजी, जेवणाच्या ताटात फायबरयुक्त ताज्या भाज्यांचा देखील समावेश करावा. यामुळे शरीरातील फायबरची कमतरता दूर होण्यास मदत होईल.

रात्री मुलं सतत लघवीसाठी उठतात-गादी ओली करतात? असू शकतात ५ गंभीर समस्या, पाहा काय करायचं...

५. भातासोबत प्रोटीनचा देखील समावेश करा :- रोजच्या जेवणाच्या ताटात भातासोबतच पुरेशा प्रमाणांत प्रोटीनचा देखील समावेश करा. प्रोटीनसाठी आपण  टोफू किंवा पनीर खाऊ शकता. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. रक्तातील साखर वाढणे कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. 

६. भातासोबत सॅलॅड खा :- भातासोबत तुमच्या ताटात सॅलॅडचा समावेश करा. सॅलॅड खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उत्तम पचनासाठी भातासोबत सॅलॅड   खाणे फायदेशीर ठरते.

व्हजायनल डिस्चार्जचा रंग सांगतो महिलांच्या आरोग्याची स्थिती! गंभीर आजाराची लक्षणं कळतात वेळीच..

English
हिंदी सारांश
Web Title : Eat rice without weight gain: Nutritionist's 5 healthy tricks.

Web Summary : Enjoy rice without weight gain or sugar spikes! Nutritionists recommend strategies like cooling rice overnight to lower its glycemic index, choosing brown rice, and pairing it with fiber, protein, and salads for a balanced meal.
टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्नफिटनेस टिप्स