Join us
Daily Top 2Weekly Top 5

डाएट करतानाही बिंधास्त खा पुऱ्या, तमन्ना भाटियाचा फिटनेस कोच सांगतो - पुरी खाण्याचं तंत्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2026 20:30 IST

how to eat puri without gaining weight : diet tips to enjoy puri without weight gain : वेटलॉस करताना तेलकट आणि तळलेली पुरी कशी खावी, जेणेकरून वजन वाढणार नाही आणि फिटनेसही राहील चांगला...

आपण डाएटवर असू आणि समोर गरमागरम टम्म फुगलेली पुरी आली की मनावर ताबा ठेवणं कठीण होतं, नाही का? वजन वाढेल या भीतीने आपण जिभेवर ताबा ठेवतो. यासोबतच, आपण वेटलॉस करताना शक्यतो तेलकट पदार्थ खाणं टाळतोच...वजन कमी करण्यासाठी बहुतेकजण पुरी सारखे तेलकट पदार्थ खाणंच टाळतात. जर गरमागरम, टम्म फुगलेली आणि कुरकुरीत पुरी समोर आली, तर डाएटची ऐशीतैशी होणं स्वाभाविक आहे! पण आता तुम्हाला तुमची आवड मारण्याची गरज नाही. सध्या फिट राहण्याच्या ट्रेंडमध्ये अनेकजण डाएट करताना आवडते पदार्थ पूर्णपणे बंद करतात. विशेषतः तेलकट आणि तळलेले पदार्थ जसे की गरमागरम पुरी, हे तर वजन वाढण्याचं मुख्य कारण मानलं जातं(how to eat puri without gaining weight).

फिटनेस आयकॉन तमन्ना भाटियाचा (Tamannaah Bhatia) फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंग सांगतोय, वजन कमी करणं म्हणजे अन्नाचा त्याग करणं नाही, तर 'स्मार्ट पद्धतीने' खाणं आहे. तमन्नाच्या फिटनेस ट्रेनरने एक असा 'जुगाड' सांगितला आहे, ज्यामुळे तेलकट पुरी खाऊनही वजन वाढणार नाही... योग्य पद्धतीने आणि मर्यादेत खाल्ल्यास तळलेली (weight loss without giving up favorite food) पुरीसुद्धा वजन कमी करताना खाता येते. डाएट करत असतानाही आवडते पदार्थ पूर्णपणे टाळण्याची गरज नसते, फक्त त्यांना खाण्याची पद्धत आणि वेळ महत्त्वाची असते. वजन कमी करताना देखील तेलकट आणि तळलेली टम्म पुरी कशी खावी, जेणेकरून वजन (diet tips to enjoy puri without weight gain) वाढणार नाही आणि फिटनेसही कायम राहील, ते पाहूयात...

तुमची आवडती पुरी खाऊनही फिट कसं राहायचं, त्याचं 'सिक्रेट'... 

१. पोर्शन कंट्रोल :- वेटलॉस जर्नीच्या दरम्यान पूरी खाण्याची वेळ येते तेव्हा सर्वात महत्त्वाचे असते 'पोर्शन कंट्रोल'. सहसा आपण एकाच वेळी ४ ते ५ पुऱ्या खातो, ज्यामुळे कॅलरीज खूप वाढतात. तमन्ना भाटियाचा फिटनेस ट्रेनर सल्ला देतात की, आपल्या प्लेटमध्ये फक्त एकच पूरी ठेवावी. पूरीचा आकार लहान असेल तर तुम्ही दोन पुऱ्या खाऊ शकता. यासोबत थोडेसे छोले आणि दुसरी भाजी देखील घेऊ शकता. अशाप्रकारे तुमची खाण्याची इच्छा देखील पूर्ण होईल आणि तुमचे डाएटही खराब होणार नाही.

२. सोबत फायबरयुक्त पदार्थ आवर्जून खा :- सिद्धार्थ सांगतात की फक्त भाजी-पूरीच खाऊ नका. आपल्या प्लेटमध्ये थोड्या प्रमाणात फायबरयुक्त पदार्थही नक्की समाविष्ट करा. तुम्ही सोबत भरपूर सॅलॅड जसं की काकडी, कांदा, टोमॅटो आणि गाजर खाऊ शकता. याशिवाय घरगुती लोणचंही घेऊ शकता. खरंतर, फायबरयुक्त सॅलॅड खाल्ल्याने पोट लवकर भरतं, त्यामुळे कॅलरीचं प्रमाणही नियंत्रणात राहतं.

३. गोड कमी प्रमाणात खा :- पुरीसोबत अनेकदा खीर किंवा हलवा यांसारखे इतरही गोडाधोडाचे पदार्थ हमखास घरोघरी तयार केले जातात. तुम्ही हे खाऊ शकता, पण त्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण गोड पदार्थांमध्ये कॅलरीचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुमचे  डाएट बिघडू शकतो. फिटनेस कोच सांगतात की तुम्ही एक छोटी वाटी खीर किंवा हलवा घेऊ शकता, पण त्यापेक्षा जास्त खाणं टाळा.

मित्र-नातेवाईक पैसे उसने मागतात आणि परत करत नाहीत? पाहा वाईटपणा न येता ‘नाही’ कसं म्हणायचं...

वेटलॉसमध्ये कशी मदत करू शकते पूरी?

जर आपण अगदी क्वचित किंवा कधीतरी पुरी खात असू, तर ही पुरी तुमचे वेटलॉस करण्यास मदत करू शकते. फिटनेस कोच सांगतात की जर तुम्ही पूरी-भाजी खाणं पूर्णपणे टाळत असाल, तर शेवटी एक दिवस आपला संयम सुटून आपण ते जास्त प्रमाणात जंक फूड खाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुमच्या फिटनेस आणि वेटलॉसवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

तांदूळ धुवून फेकतो ते पाणीच देईल तुम्हाला उर्फी जावेदसारखा 'ग्लो’! पाहा उर्फी नेमकं काय करते...

उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होतेय? शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी खा १० पदार्थ - उन्हाळा होईल सुखकर... 

किती दिवसातून एकदा खाऊ शकता पुरी?

फिटनेस कोच सांगतो की, किती दिवसातून एकदा पुरी खाऊ शकता हे तुमच्या फिटनेस गोलवर अवलंबून असतं. तुम्हाला किती दिवसांनी एकदा पूरी खायची आहे हे त्यावर ठरतं. उदाहरणार्थ, जर तुम्हाला १५ ते २० किलो वजन कमी करायचं असेल, तर २१ दिवसांत एकदा खा. जर १० ते १५ किलो वजन कमी करायचं असेल, तर १४ दिवसांत एकदा खाऊ शकता. आणि जर ५ ते १० किलो वजन कमी करायचं असेल, तर १० दिवसांत एकदा खाणं योग्य ठरेल. ज्यांना फक्त ३ ते ५ किलो वजन कमी करायचं आहे किंवा वजन मेंटेन ठेवायचं आहे, त्यांनी आठवड्यातून एकदा पूरी खाणं योग्य आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Eat Puri guilt-free on a diet: Tamannaah’s fitness coach reveals secret.

Web Summary : Tamannaah Bhatia's fitness coach shares how to enjoy puri while dieting. Portion control, fiber-rich foods, and limited sweets are key. Occasional puri intake can prevent junk food cravings, aiding weight loss. Frequency depends on the weight loss goal.
टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्न