Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रोज खाते वरणभात तरी तमन्ना भाटियाची फिगर कमाल, पाहा वरणभात खाण्याची तिची पद्धत आणि प्रमाण...

रोज खाते वरणभात तरी तमन्ना भाटियाची फिगर कमाल, पाहा वरणभात खाण्याची तिची पद्धत आणि प्रमाण...

how to eat dal chawal to lose weight fast : tamannaah bhatia fitness trainer reveals dal chawal diet tips : वेटलॉस करण्यासाठी डाळ - भात खाण्याचं योग्य प्रमाण किती असावं ? तमन्ना भाटियाचा ट्रेनर सांगतो सिक्रेट टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2026 14:13 IST2026-04-08T13:59:20+5:302026-04-08T14:13:31+5:30

how to eat dal chawal to lose weight fast : tamannaah bhatia fitness trainer reveals dal chawal diet tips : वेटलॉस करण्यासाठी डाळ - भात खाण्याचं योग्य प्रमाण किती असावं ? तमन्ना भाटियाचा ट्रेनर सांगतो सिक्रेट टिप्स...

how to eat dal chawal to lose weight fast tamannaah bhatia fitness trainer reveals dal chawal diet tips | रोज खाते वरणभात तरी तमन्ना भाटियाची फिगर कमाल, पाहा वरणभात खाण्याची तिची पद्धत आणि प्रमाण...

रोज खाते वरणभात तरी तमन्ना भाटियाची फिगर कमाल, पाहा वरणभात खाण्याची तिची पद्धत आणि प्रमाण...

वाढलेलं वजन कमी करायचं म्हटलं की, सर्वातआधी आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे 'डाएट'... आणि डाएट म्हणजे म्हटलं की आपले आवडते पदार्थ न खाणं ओघाने आलंच...वेटलॉस करताना सगळ्यात आधी आपण भात खाणंच सोडून देतो. भात खाल्ल्याने पोट सुटतं किंवा भातामुळे वजन वाढतं हा समज आपल्या मनात इतका घट्ट बसला आहे की, आपण मन मारुन भात खाण्याची सवय मोडतो. पण साऊथ आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाचा फिटनेस ट्रेनर काहीतरी वेगळंच सांगतोय...अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या फिटनेस ट्रेनरच्या मते, वजन कमी करण्यासाठी आवडते पदार्थ खाणच सोडून देण्याचा त्याग करण्याची गरज नाही. उलट योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास साधा डाळ - भातसुद्धा वजन कमी करण्यास मदत करू शकतो(how to eat dal chawal to lose weight fast).

आपण अनेकदा डाळ-भात खाणं (how to eat dal chawal for weight loss correctly) पूर्णपणे बंद करतो किंवा तो चुकीच्या पद्धतीने खातो, ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी आरोग्याच्या इतर तक्रारी सुरू होतात. पण, जर तुम्हाला भात (best way to eat dal chawal for fat loss and fitness) खाण्याची 'योग्य पद्धत' आणि 'योग्य वेळ' माहीत असेल, तर तुम्ही तुमचं आवडीचं जेवण एन्जॉय करूनही फिट राहू शकता. डाळ - भात खाऊनही वजन कसं कमी करता येतं, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात (tamannaah bhatia fitness trainer reveals dal chawal diet tips) आणि योग्य पद्धत काय आहे हे समजून घेणं देखील गरजेचं आहे. नेमक्या कोणत्या ट्रिक्स वापरून तुम्ही डाळ - भात खाऊनही वजन वेगाने कमी करू शकता ते पाहा... 

वेटलॉस करण्यासाठी डाळ - भात कसा खावा ? 

तमन्ना भाटियाचा फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंहने सांगितले की, साध्या डाळ - भातामध्ये प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) भरपूर प्रमाणात असतात, परंतु त्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण खूप कमी असते. यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते आणि तितक्याच वेगाने खाली येते, परिणामी आपल्याला पुन्हा लवकर भूक लागते. अशा परिस्थितीत, आपण गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेतो आणि वारंवार खातो. जर आपण 'पोर्शन कंट्रोल' वर योग्य लक्ष दिले नाही, तर  यामुळे वजन वाढू शकते किंवा शरीरात चरबी साचू शकते. 

समंथा प्रभू सांगते २१ दिवसांत वजन कमी करण्याचं  सिक्रेट, पोट होते कमी आणि दिसता एकदम फिट...

कायम खुश राहणाऱ्या लोकांच्या ७ सवयी! नेहमी आनंदी राहण्यासाठी असं वेगळं काय करतात - पाहा सोपं गणित... 

वजन कमी करण्यासाठी डाळ - भाताचं योग्य प्रमाण किती असावं ? 

तमन्ना भाटियाचा फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सांगतो, तमन्ना स्वतः तिच्या दुपारच्या जेवणात डाळ, भात, भाजी खाते. तुम्हीही डाळ - भात खाऊ शकता, पण तो खाण्याची एक विशिष्ट आणि योग्य पद्धत आहे. नेहमी लक्षात ठेवा की डाळ-भात खाताना ताटात भाताचे प्रमाण खूप कमी असावे. भातामध्ये कार्बोहायड्रेट्स (Carbs) जास्त असतात, जे शरीरात साखर आणि चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे भात फक्त नावापुरता किंवा चवीपुरता घ्यावा. भाताच्या तुलनेत डाळीचे प्रमाण जास्त असावे. डाळ हा प्रोटीन्सचा उत्तम स्रोत आहे. जेवताना भाताऐवजी डाळ अधिक जास्त प्रमाणात खावी. डाळीमध्ये मसूर, मूग, तूर, राजमा किंवा छोले अशा विविध प्रकारच्या डाळींचा समावेश करावा. जास्त प्रमाणात डाळ खाल्यामुळे शरीरातील स्नायूंची झीज भरून निघते तसेच, प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही आणि तुम्ही अतिरिक्त कॅलरी खाण्यापासून वाचता.

फक्त हार्ट ॲटॅकच नाही, तर हार्ट व्हॉल्व्ह खराब झाल्याची 'ही' आहेत लक्षणं, दुर्लक्ष करणं पडेल महागात... 

फायबरचा समावेश नक्की करा... 

नुसता डाळ-भात खाण्याऐवजी तुमच्या ताटात भरपूर भाज्या किंवा कोशिंबिरीचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शरीराला आवश्यक असलेले फायबर मिळते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. सहाजिकच, यामुळे तुम्ही अवेळी आणि जास्त खाणे टाळता. सिद्धार्थ सिंह पुढे सांगतो, दररोज तोच तोच पांढरा भात आणि डाळ खाण्यापेक्षा आहारात विविधता ठेवा. कधी पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस तर कधी ज्वारी, बाजरी किंवा नाचणी यांसारख्या तृणधान्यांचा समावेश आहारात करा. क्विनोआ हा देखील भाताला एक उत्तम आणि हेल्दी पर्याय आहे. जर वजन कमी करायचे असेल   तर रात्रीच्या जेवणात भाताचे प्रमाण अत्यंत कमी ठेवा. रात्रीच्या वेळी आहारात कार्बोहायड्रेट्स कमी आणि प्रोटीन (डाळ, पनीर, सोयाबीन इ.) जास्त असावे, जेणेकरून झोपेतही तुमचे मेटाबॉलिजम व्यवस्थित काम करेल.

Web Title : तमन्ना भाटिया का फिटनेस मंत्र: सही तरीके से दाल-चावल खाना!

Web Summary : वजन कम करना चाहते हैं? तमन्ना भाटिया के ट्रेनर का खुलासा: दाल-चावल खा सकते हैं! भाग नियंत्रित करें, चावल (कार्बोहाइड्रेट) से ज़्यादा दाल (प्रोटीन) को प्राथमिकता दें, फाइबर (सब्जियां) मिलाएं और अनाज बदलें। अपना पसंदीदा भोजन खाएं और फिट रहें।

Web Title : Tamannaah Bhatia's fitness secret: Eating dal-rice the right way!

Web Summary : Want to lose weight? Tamannaah Bhatia's trainer reveals you can eat dal-rice! Control portions, prioritize dal (protein) over rice (carbs), add fiber (vegetables), and vary grains. Enjoy your favorite meal and stay fit.