सतत वाढत जाणारे वजन ही आजची खूप मोठी कॉमन समस्या झाली आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज आणि डाएट करतोच. यासोबतच, वजन कमी होण्यासाठी अधिक मदत व्हावी यासाठी काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय देखील करतो. वजन कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपायांमध्ये, आपण बहुतेकदा (How To Consume Cinnamon & Honey To Lose Weight) वेगवेगळ्या बिया आणि घरगुती खडे मसाल्यांचा (honey and cinnamon water mix for weight loss) वापर करतो. झटपट वेटलॉस होण्यासाठी बडीशेप, अळशी, मेथी दाणे, चिया सीड्स यांसारख्या अनेक पदार्थांचा वापर केला जातो. या पदार्थांप्रमाणेच वेटलॉससाठी मध आणि दालचिनी देखील तितकेच फायदेशीर असल्याचे मानले जाते(Honey Cinnamon Drink Weight Loss Recipe).
मध शरीरातील चयापचय प्रक्रिया सुधारते, तर दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून फॅट बर्निंग प्रक्रियेस गती देते. या दोघांचा एकत्रित वापर केल्यास वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत नैसर्गिकरित्या मदत केली जाते. वजन कमी करण्यासाठी मध आणि दालचिनी खाणे फायदेशीर असले तरी, वेटलॉससाठी ते खाण्याची योग्य पद्धत बऱ्याचजणांना माहित नसते. यासाठी, वजन कमी करण्यासाठी मध आणि दालचिनीचा वापर कसा करावा ते पाहूयात.
वजन कमी करण्यासाठी दालचिनी आणि मध कसे फायदेशीर आहे ?
मध आणि दालचिनी यांचे एकत्रित मिश्रण वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. दालचिनी शरीरातील चयापचय क्रियेचा वेग नैसर्गिकरित्या वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे अधिक कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. मधामधील नैसर्गिक गोडवा फूड क्रेविंग्स कमी करते. त्यामुळे वारंवार खाण्याची सवय कमी होते आणि जास्त काळ भूक लागत नाही, ज्यामुळे एकूण कॅलरीचे प्रमाण आपोआप कमी होते. दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत करते, ज्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि अनावश्यक भूक लागून खाण्याची सवय टाळता येते. मध आणि दालचिनी पचनसंस्थेसाठीही अत्यंत लाभदायक आहेत. मध आणि दालचिनी रोज घेतल्याने पोटफुगी, गॅसेस आणि आम्लता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. या समस्या थेट वजनवाढीशी संबंधित असतात, त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळाल्यास वजन कमी करणे सोपे होते.
कोमट पाण्यांत मिसळा 'या' तेलाचे फक्त २ थेंब, बेली फॅट होईल कमी, डॉक्टर सांगतात...
वेटलॉससाठी मेथी दाणे की बडीशेप काय फायदेशीर? डॉक्टर सांगतात, वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावं ?
वजन कमी करण्यासाठी दालचिनी आणि मध कसे खावे ?
वजन कमी करण्यासाठी दालचिनीची पूड आणि मध दोन्ही आपण कोमट पाण्यांत मिसळून पिऊ शकता. यासोबतच, पचनासंबंधित अनेक समस्या सोडवण्यासाठी आपण दालचिनीची पूड आणि मध पाण्यांत मिसळून जेवणानंतर देखील पिऊ शकता. दालचिनी आणि मध कोमट पाण्यातून घेतल्याने फक्त वेटलॉसच नाही तर, घसा खवखवणे, खोकला आणि सर्दी यासारख्या समस्यांपासूनही लवकर आराम मिळतो.
१. सकाळी रिकाम्या पोटी :- १ कप कोमट पाणी घ्या. त्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घाला. पाणी गार झाल्यावर त्यात १ चमचा शुद्ध मध मिसळा(गरम पाण्यात मध घालू नका) हे मिश्रण सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी प्या. या उपायामुळे शरीर डिटॉक्स होतं, चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि दिवसभर भूक नियंत्रणात राहते, परिणामी वजन कमी होण्यास मदत मिळते.
२. रात्री झोपण्यापूर्वी :- रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात दालचिनी पावडर आणि मध मिसळून प्यावे. या उपायामुळे पचन सुधारते आणि झोपही चांगली लागते.
अचानक ब्लड प्रेशर वाढलं तर घाबरू नका! WHO ने सांगितलेले 'हे' उपाय, उच्च रक्तदाब नियंत्रणात...
३. हर्बल टी म्हणून पिऊ शकता :- एक कप पाण्यात दालचिनीचे ३ ते ४ तुकडे किंवा दालचिनी पावडर उकळा. पाणी गार झाल्यावर त्यात मध घालून चहा प्रमाणे प्यावे.
दिवसभरातून फक्त १ ते २ वेळाच आपण हे मध आणि दालचिनीचे मिश्रण पिऊ शकता. जास्त प्रमाणात दालचिनी घेणं टाळा, जास्त प्रमाणात दालचिनी घेतल्यास किडन्यांवर ताण येऊ शकतो. साखर टाळा, मधामध्ये नैसर्गिक गोडवा असल्याने फक्त मधाचाच वापर करावा.