Join us

PCOS मुळे काही केल्या घटत नाही वजन? ५ टिप्स, वजन तर कमी होईलच, हार्मोनल संतुलन कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 18:33 IST

Weight Loss In PCOS : महिला आपल्या वाढत्या वजनामुळे चिंतेत असतात. पण जर PCOS मध्ये वजन कमी करायचं असेल तर यासाठी तुम्हाला लाइफस्टाईलमध्ये बदल करणं महत्वाचं ठरतं.

Weight Loss In PCOS :पॉलीसिस्टीक ओवरी सिंड्रोम(PCOS) एक कॉमन हार्मोनल डिसऑर्डर आहे. जो जगभरातील महिलांना प्रभावित करत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, असं मानलं जातं की, ही समस्या ६ ते १३ टक्के महिलांना प्रभावित करते, ७० टक्के केसेसमध्ये यावर उपचार घेतले जात नाहीत. PCOS समस्या अनेकदा हार्मोनल इम्बॅलन्स आणि अनियमित मासिक पाळीमुळे होते. या समस्येमुळे महिलांचं वजन वेगानं वाढतं. अशात त्यांना वजन कमी करणं देखील अवघड होतं.

अशात महिला आपल्या वाढत्या वजनामुळे चिंतेत असतात. पण जर PCOS मध्ये वजन कमी करायचं असेल तर यासाठी तुम्हाला लाइफस्टाईलमध्ये बदल करणं महत्वाचं ठरतं. काही नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर वजन नक्कीच कमी होऊ शकतं.

नियमित व्यायाम

PCOS ने पीडित महिलांनी नियमितपणे व्यायाम करणं फार गरजेचं असतं. वयस्क महिलांनी रोज कमीत कमी ३० मिनिटं व्यायाम केला पाहिजे. फिजिकल अॅक्टिविटी एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. ज्यात वजन कंट्रोल करणं याचाही समावेश आहे. वजन कमी होण्याची प्रोसेस हळूहळू होऊ शकते. त्यामुळे निराश होऊन व्यायाम बंद करू नका.

हेल्दी फॅटचं इनटेक वाढवा

महिलांनी त्यांच्या डाएटमध्ये वेगवेगळ्या हेल्दी फॅटचा समावेश करावा. यामुळे पोट भरलेलं राहतं. ज्यामुळे तुमचं ओव्हरईटिंग थांबतं. यासाठी आहारात अॅवोकाडो, ऑलिव्ह ऑइल, खोबऱ्याचं तेल आणि नट बटर या गोष्टींचा समावेश करावा.

कार्ब्स कमी करा

कमी कार्बोहायड्रेट खाल्ल्यानं PCOS च्या रूग्णांना वजन कमी करण्यास आणि मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास मदत मिळते. पण याचा अर्थ असा नाही की, आहारात कार्ब्स पूर्णपणे काढून टाका. डाएटमध्ये प्रोटीन आणि भाज्यांचा समावेश करण्यासोबतच फायबर आणि मिनरल्स जास्त घ्या.

प्रोसेस्ड फूड टाळा

प्रोसेस्ड फूड आणि एक्स्ट्रा साखर असलेल्या उत्पादनांमुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते आणि वजनही अधिक वाढू शकतं. अशात केक, पेस्ट्री, मिठाई, फास्ट फूड टाळावे.

स्ट्रेस कंट्रोल करा

स्ट्रेसमुळे वजन अधिक वाढतं. स्ट्रेसमुळे शरीरात कार्टिसोल नावाचे हार्मोन वाढतात. जे अॅड्रेनल ग्लॅंड बनवतात. जर कार्टिसोल जास्त वेळ शरीरात राहिले तर यामुळे वजन वाढतं आणि शरीरात इन्सुलिन योग्यपणे काम करत नाही. ज्याला इन्सुलिन रेजिस्टेंस म्हटलं जातं. रोज काही वेळ मेडिटेशन आणि योगा केल्यास कार्टिसोल लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत मिळू शकते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स