Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > १ महिन्यात १ तास चालून किती कमी करता येऊ शकतं वजन?, बारीक होण्याचा सोपा फंडा

१ महिन्यात १ तास चालून किती कमी करता येऊ शकतं वजन?, बारीक होण्याचा सोपा फंडा

तुम्ही २४ तासांपैकी १ तास चालण्यासाठी काढला तर ते तुमचं शारीरिक आरोग्य उत्तम राहतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:03 IST2025-01-20T14:00:22+5:302025-01-20T14:03:05+5:30

तुम्ही २४ तासांपैकी १ तास चालण्यासाठी काढला तर ते तुमचं शारीरिक आरोग्य उत्तम राहतं.

how much weight loss in 1 month by walking for 1 hour | १ महिन्यात १ तास चालून किती कमी करता येऊ शकतं वजन?, बारीक होण्याचा सोपा फंडा

१ महिन्यात १ तास चालून किती कमी करता येऊ शकतं वजन?, बारीक होण्याचा सोपा फंडा

जेव्हा जेव्हा फिटनेसबद्दल चर्चा होते तेव्हा आरोग्य तज्ञ किंवा घरातील वडीलधारी मंडळी नक्कीच दररोज सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जाण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही २४ तासांपैकी १ तास चालण्यासाठी काढला तर ते तुमचं शारीरिक आरोग्य उत्तम राहतं. तसेच मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. दररोज एक तास चालल्याने तुमचे स्नायू, हाडं मजबूत होतात आणि हॅपी हार्मोन्स देखील बाहेर पडतात, ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक आणि उत्साही वाटतं.

१ तास चालून १ महिन्यात किती वजन कमी करू शकता?

दररोज तुम्ही १ तास चाललात म्हणजे किमान ६ किलोमीटर चालला आहात. अशा प्रकारे तुम्ही दररोज ३०० ते ४०० कॅलरीज बर्न करता. यानुसार, तुम्ही १ महिन्यात ३ ते ४ किलो वजन सहज कमी करू शकता. पण जर तुम्ही चालण्यासोबतच तुमच्या आहाराकडे लक्ष दिलं तर त्याचा परिणाम अधिक होईल.

दररोज १ तास चालण्याचे फायदे

- चालण्याने तुमचं हृदयाचं आरोग्य सुधारतं. हे रक्ताभिसरण वाढवतं आणि हृदयाच्या स्नायूंना बळकटी देतं, 

- हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक सारख्या आरोग्य समस्यांचा धोका कमी होतो.

- चालण्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य देखील चांगलं राहतं. 

- नियमित चालण्याने तुमची शक्ती वाढते. हे शरीराला अधिक सक्रिय आणि चपळ बनवतं.

- चालण्यामुळे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास देखील मदत होते. 

- हे तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करतं, जे मानसिक आणि शारीरिक संतुलनासाठी खूप महत्त्वाचं आहे.
 

Web Title: how much weight loss in 1 month by walking for 1 hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.