आपल्या रोजच्या जेवणात पोळी, भाजी, वरण, भात असे सगळे पदार्थ असतात. पोळी तर आपण आपल्याला लागेल तेवढी खातो. पण बऱ्याचदा भाजी किती खावी हे लक्षात येत नाही. कारण काही जण खूपच कमी भाजी खातात. तज्ज्ञसुद्धा बऱ्याचदा सांगतात की भाजी पोळीला अगदी लावून लावून खाऊ नका. तर भाजी भरपूर प्रमाणात खा आणि पोळ्यांचे प्रमाण कमी करा. पण अनेकांचं याच्या अगदी उलट असतं (how much vegetable and fruits we should eat every day?). म्हणूनच आता भाज्या भरपूर प्रमाणात म्हणजे नेमक्य किती प्रमाणात खाव्या? त्याविषयीचीच बघा ही खास माहिती...(correct proportion of fruits and vegetable in our daily diet)
आपल्या रोजच्या आहारात भाज्यांचे प्रमाण किती असावे?
एका व्यक्तीने दररोज किती प्रमाणात भाजी खायला हवी, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी amuktamuk या पेजवर शेअर केली आहे. यामध्ये तज्ज्ञ असं सांगत आहेत की एका प्रौढ व्यक्तीने दररोज अर्धा किलो भाजी खायलाच हवी. ही भाजी तुम्ही सूप, सलाड या स्वरूपातही खाऊ शकता.
याशिवाय नेहमीप्रमाणे परतून केलेली भाजी किंवा वरण, आमटी यामध्ये घालून खाल्लेली भाजीही चालेल. पण तुमच्या पोटात दररोज अर्धा किलो भाजी गेली पाहिजे. जर तुमचं वजन जास्त असेल तर आहारातलं भाजीचं प्रमाण आणखी वाढवलं तरी चालेल. कारण त्यामुळे इतर पदार्थ आपोआपच कमी खाल्ले जातात आणि वजनावर नियंत्रण राहते.
एका व्यक्तीने दररोज किती फळं खावी?
काही जण फळांनी भरलेली प्लेट समोर ठेवून त्याचाच नाश्ता करतात, तर काही जण दिवसातून अगदी एखादेच फळ खातात. मग यापैकी नेमकं कोणतं बरोबर आहे ते आता पाहूया.
'या' पद्धतीने सुकामेवा खाल तर पैसे वाया गेलेच म्हणून समजा! बघा योग्य पद्धत कोणती
याविषयी एक्सपर्ट असं सांगतात की एका प्रौढ व्यक्तीने दररोज २०० ग्रॅम फळं खाल्ली पाहिजेत. म्हणजे साधारण मध्यम आकाराची कोणतीही दोन फळं खाणं योग्य आहे. आता हे वरचं फळांचं आणि भाजीचं प्रमाण बघा आणि तुम्ही खाताय ते प्रमाण योग्य की अयोग्य आहे स्वतःच तपासून पाहा..