Weight Loss Tips : आज जास्ती जास्तीत लोक वाढलेल्या लठ्ठपणामुळे चिंतेत आहेत. ही समस्या केवळ भारतातच नाही तर जगभरात वाढली आहे. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, चुकीची लाइफस्टाईल आणि आनुवांशिकता या कारणांमुळे लोकांमध्ये आजकाल लोकांचं वजन अधिक वाढत आहे. पुढे लठ्ठपणामुळे डायबिटीस, हृदयरोग, बीपी, थायरॉइड आणि पीसीओएससारख्या समस्यांचा धोका वाढतो. याच कारणानं डॉक्टर नेहमीच वजन कमी करण्यास आणि हेल्दी वेट मेंटेन ठेवण्यास सांगतात.
रात्री लवकर जेवल्यास वजन कमी होतं का?
वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोक एक्सरसाईज करतात आणि डाएट फॉलो करतात. तसेच रोज जेवणाची एकच वेळ फिक्स करण्याचा सल्ला दिला जातो. बरेच फिटनेस एक्सपर्ट्सही सायंकाळी लवकर जेवण करण्याचा सल्ला देत असतात. पण खरंच रात्रीचं जेवण लवकर केय्सानं वजन कमी होतं का? हे जाणून घेऊ.
खरंतर रात्री लवकर जेवण केल्यान पचन तंत्राला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. लवकर जेवण केल्यानं मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं, जे वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतं. तसेच झोप न येण्याची समस्याही कमी होते.
इन्सुलिन सेन्सिटिविटी वाढते
रात्री उशीरा जेवण करण्याची सवय डायबिटीसच्या रूग्णांसाठी नुकसानकारक ठरते. पण रात्री लवकर जेवण केल्यानं डायबिटीसमध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. अशाप्रकारे डायजेस्टिव सिस्टीमशी संबंधित समस्या कमी होतात.
कसं असावं रात्रीचं जेवण?
रात्रीचं जेवण हे हलकं असावं. तुम्ही जेवणासोबत सूप किंवा डाळीचं पाणीही पिऊ शकता. त्यानंतर भाज्या, डाळ-भात आणि चपाती खाऊ शकता. महत्वाची बाब म्हणजे झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी जेवण करावं. जेणेकरून पचनास पुरेसा वेळ मिळेल. जेवण जर व्यवस्थित पचन झालं तर वजन कमी होतं किंवा कंट्रोलमध्ये राहतं.