Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > लिंबू पाणी की मधाचं पाणी...वजन कमी करण्यास काय जास्त फायदेशीर? पाहा फायदे मग ठरवा...

लिंबू पाणी की मधाचं पाणी...वजन कमी करण्यास काय जास्त फायदेशीर? पाहा फायदे मग ठरवा...

Honey water vs Lemon water: या दोन्ही ड्रिंक्सचे अनेक फायदे असले तरी वजन कमी करण्यासाठी यातील कोणतं ड्रिंक्स सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतं याचा कधी विचार केलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:45 IST2025-09-03T13:44:29+5:302025-09-03T13:45:40+5:30

Honey water vs Lemon water: या दोन्ही ड्रिंक्सचे अनेक फायदे असले तरी वजन कमी करण्यासाठी यातील कोणतं ड्रिंक्स सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतं याचा कधी विचार केलाय का?

Honey water Or lemon water which is better for weight loss | लिंबू पाणी की मधाचं पाणी...वजन कमी करण्यास काय जास्त फायदेशीर? पाहा फायदे मग ठरवा...

लिंबू पाणी की मधाचं पाणी...वजन कमी करण्यास काय जास्त फायदेशीर? पाहा फायदे मग ठरवा...

Honey water vs Lemon water: आपण सगळीकडे बघतो की, जास्तीत जास्त वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोक वेगवेगळे हेल्दी ड्रिंक पितात. ज्यात लिंबू पाणी किंवा कोमट पाण्यात मध घालून पिण्याचा ट्रेंड अधिक बघायला मिळतो. वेगवेगळे एक्सपर्टही सांगतात की, लिंबू पाणी आणि मधाचं पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी कमी (Weight Loss Drink) करण्यास मदत मिळते. 

अनेक वर्षांपासून या दोन्ही ड्रिंक्सकडे वजन कमी करण्याचा नॅचरल उपाय म्हणून पाहिलं जातं. या दोन्ही ड्रिंक्सचे अनेक फायदे असले तरी वजन कमी करण्यासाठी यातील कोणतं ड्रिंक्स सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतं याचा कधी विचार केलाय का? बरेच लोक या गोष्टीचा विचार करत नाहीत. तेच आज आपण पाहणार आहोत.

मधाचं पाणी

मध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. कारण यात इतके पोषक गुण असतात, ज्यांची आपण कल्पनाही केली नसते. मधात अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. कोमट पाण्यात मध टाकून प्यायल्यानं शरीराला एक नाही तर अनेक फायदे मिळतात. त्यातील काही खालीलप्रमाणे पाहता येतील. 

- मधानं शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास मदत मिळते. जेव्हा मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, तेव्हा शरीरातील कॅलरी अधिक वेगानं बर्न होतात. ज्यामुळे अर्थातच वजन कमी करण्यास मदत मिळते.

- मधात नॅचरल शुगर असते, ज्यामुळे इंस्टन्ट एनर्जी मिळते. सकाळी मधाचं पाणी प्यायल्यानं दिवसभर फ्रेश वाटतं आणि थकवाही जाणवत नाही.

- मधाचं पाणी पचन चांगलं होण्यासाठीही फायदेशीर असतं. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत मिळते.

लिंबू पाण्याचे फायदे

लिंबू पाणी हे एक खूप हेल्दी ड्रिंक मानलं जातं. कारण याने एनर्जी तर मिळतेच, सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतात. कारण यात व्हिटामिन सी आणि सिट्रिक अॅसिड भरपूर असतं. याचे काय काय फायदे होतात हे पाहुयात.

- नियमितपणे लिंबू पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते. सोबतच यानं लिव्हर आणि किडनीही साफ राहतात.

- लिंबू पाण्याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे यानं भूक कंट्रोल होते. अशात आपल्याला वजन कमी करण्यास मदत मिळते. भूक कंट्रोल झाल्यानं कमी खाल्लं जातं आणि अनावश्यक कॅलरीही टाळल्या जातात.

- लिंबू पाणी प्यायल्यानं शरीराचं हायड्रेशन चांगलं राहतं. कमी झालेल्या पाण्यात संतुलन ठेवण्यास मदत मिळते. ज्यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. असं झालं तर वजन कमी करण्यास मदत मिळते.

काय पिऊन मिळेल जास्त फायदा?

मुळात वजन कमी करण्यात दोन्हीपैकी कोणतंही एक पेय एकटं जादू करू शकत नाही. दोन्ही ड्रिंक्स वजन कमी करण्यास मदत करू शकतात. पण यांचा फायदा आपल्या लाइफस्टाईलवर अवलंबून असतो.

मधाचं पाणी त्या लोकांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं, ज्यांना सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच एनर्जी हवी असते आणि ज्यांचं पचन तंत्र कमजोर असतं. 

लिंबू पाणी अशा लोकांसाठी फायदेशीर असतं, ज्यांना शरीरातील विषारी तत्व बाहेर काढायचे असतात आणि आपली भूक कंट्रोल करायची असते.

असं असलं तरी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून पिणंही फायदेशीर मानलं जातं. या मिश्रणाने एनर्जी सुद्धा मिळते आणि बॉडी डिटॉक्सही होते. सोबतच पचनक्रियाही सुधारते. तसेच मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

Web Title: Honey water Or lemon water which is better for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.