Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > १ चमचा मध 'या' पद्धतीनं रोज खा, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या कमी करणारा एक उपाय

१ चमचा मध 'या' पद्धतीनं रोज खा, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या कमी करणारा एक उपाय

Honey For Weight Loss : मध हे वजन कमी करण्यासाठी खूपच गुणकारी ठरते. मधाचा सेवन करून वजन कमी करणं एकदम सोपं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:19 IST2026-02-24T14:44:54+5:302026-02-24T16:19:10+5:30

Honey For Weight Loss : मध हे वजन कमी करण्यासाठी खूपच गुणकारी ठरते. मधाचा सेवन करून वजन कमी करणं एकदम सोपं आहे.

Honey For Weight Loss : How To Consume Honey For Weight Loss | १ चमचा मध 'या' पद्धतीनं रोज खा, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या कमी करणारा एक उपाय

१ चमचा मध 'या' पद्धतीनं रोज खा, सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या कमी करणारा एक उपाय

मध हा असा पदार्थ आहे जो प्रत्येकाच्याच स्वंयपाकघरात असतो. मधाच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात. आयुर्वेदात मधाला महाऔषधी मानलं गेलं आहे. याच कारणामुळे लोक रोजच्या आहारात मधाचा समावेश करतात. सर्दी, खोकला किंवा ताप आल्यानंतर लोक मधात लवंग मिसळून आपल्या मुलांना देतात. (How To Consume Honey For Weight Loss) यातील एंटी ऑक्सिडेंट्स आणि फेनोलिक तत्व शरीराला आतून मजबूत बनवण्यास मदत करतात. मध हे वजन कमी करण्यासाठी खूपच गुणकारी ठरते. मधाचा सेवन करून वजन कमी करणं एकदम सोपं आहे. वजन कमी करण्यासाठी मध कोणत्या पद्धतीनं खायला हवं समजून घेऊ. (Honey For Weight Loss)

कोमट पाणी आणि लिंबू

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यासाठी १ ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. त्यात १ चमचा मध घाला. याचे सेवन सकाळी रिकाम्या पोटी करा. यामुळे बेसल मेटाबॉलिक रेट बुस्ट होण्यास मदत होते आणि पचनक्रिया साफ राहण्यास मदत होते  तसंच शरीराला दिवसभर एनर्जी मिळण्यास मदत होते.

दालचिनी आणि मध

दालचिनी शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करते. तर मध मेटाबॉलिझ्म वाढवते. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घालून उकळवून घ्या. पाणी हलकं थंड झाल्यावर त्यात १ चमचा मध मिसळा आणि रात्री झोपण्याआधी  किंवा सकाळी नाश्त्याच्या अर्धा तास आधी याचे सेवन करा.

लसूण आणि मध

 हे कॉम्बिनेशन थोडं वेगळं वाटतं  पण वजन कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल घटवण्यााठी उत्तम ठरते. लसणाची १ पाकळी बारीक  करून १ चमचा मधात मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. मध फायदेशीर ठरते पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरासाठी नुकसानकारकसुद्धा ठरू शकते. उकळत्या  पाण्यात मध कधीच घालू नका. उकळल्या पाण्यात मध मिसळू नका कारण जास्त गरम पाणी घातल्यामुळे मधातील पोषक तत्व नष्ट होतात आणि ते विषारी बनू शकते. म्हणून कोमट पाण्यातचं मध घालून प्या.

Web Title : वजन घटाने के लिए शहद: चर्बी कम करने के लिए इस तरह करें सेवन।

Web Summary : शहद, एक आयुर्वेदिक औषधि, वजन घटाने में सहायक है। इसे गर्म पानी और नींबू, दालचीनी या लहसुन के साथ खाली पेट मिलाकर सेवन करें, जिससे मेटाबॉलिज्म बढ़ता है और चर्बी घटती है। शहद को उबलते पानी में मिलाने से बचें।

Web Title : Honey for weight loss: Consume it this way to burn fat.

Web Summary : Honey, an Ayurvedic staple, aids weight loss. Combine it with warm water and lemon, cinnamon, or garlic on an empty stomach to boost metabolism and burn fat. Avoid mixing honey in boiling water.