Belly Fat : वजन कमी करण्यासाठी किंवा पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. त्यातीलच उपाय म्हणजे डिटॉक्स वॉटर (Detox Water). डिटॉक्स वॉटरच्या मदतीनं शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात आणि वाढलेली चरबी सुद्धा कमी होते. वजन कमी करण्याचा आणि फिट राहण्याचा हा एक नॅचरल आणि सोपा उपाय मानला जातो. तुम्ही सुद्धा वाढलेल्या चरबीमुळे चिंतेत असाल आणि सोपा उपाय शोधत असाल तर आम्ही तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी एका खास डिटॉक्स वॉटरबाबत सांगणार आहोत. हे खास डिटॉक्स वॉटर म्हणजे आल्याचं पाणी. आपलं हा केवळ एक मसाला नसून यात अनेक औषधी गुणही आहेत. ज्याचा वापर अनेक आजारांच्या उपचारात केला जातो.
रोज सकाळी जर तुम्ही चहाऐवजी आल्याचं पाणी प्याल तर तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक फायदे मिळू शकतात. अशात आल्याचं पाणी चरबी कमी करून वजन कमी करण्यास कसं फायदेशीर ठरतं आणि ते कसं प्यावं.
वजन कमी करतं आल्याचं पाणी
वेगवेगळे उपाय करूनही तुमच्या पोटावर वाढलेली चरबी कमी झाली नसेल तर तुम्ही आल्याचं पाणी प्यायला सुरूवात करू शकता. कारण यानं पोटावर वाढलेली चरबी लवकर कमी होईल. आल्याच्या पाण्याचे इतके फायदे आहेत की, अनेक बॉलिवूड अभिनेत्री रोज आपल्याचं पाणी पितात.
रिसर्चमधूनही खुलासा
बऱ्याच शोधातून समोर आलं आहे की, आल्याचं पाणी प्यायल्यानं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, ज्यामुळे तुम्ही जास्तीचं काही खाणं टाळू शकता. याचा फायदा वजन कमी करण्यास मिळतो. आल्याचं पाणी नियमित प्यायल्यानं शरीराचं वजन आणि कंबरेवरील चरबी कमी होते.
कशी कमी होते चरबी?
आल्याचं पाणी वजन, बॉडी मास इंडेक्स, चरबी कमी करण्यास मदत करतं. कारण यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, भूक कमी लागते आणि पचन तंत्र अधिक मजबूत होतं. या गोष्टी वजन कमी करण्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात. त्याशिवाय जर पोटात ब्लोटिंग होत असेल तर ही समस्याही दूर होते.
बॉडी डिटॉक्स
बरेच लोक आल्याचं पाणी यातील नॅचरल डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस वाढण्याच्या क्षमतेमुळे पिणं पसंत करतात. खासकरून लिव्हर, आतड्यांची आतून सफाई करण्याचं काम आल्याचं पाणी करतं. तसेच शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडतात.
आल्याचं पाणी पिण्याची योग्य वेळ
आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांच्यानुसार, आल्याचं पाणी तुम्ही दिवसभर पिऊ शकता. डॉक्टर म्हणाल्या की, दिवसभर आल्याचं पाणी प्यायल्यानं सूज कमी होते आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. अशात चरबी कमी होण्याची प्रोसेस अधिक वेगानं होते.
आल्याचं पाणी पिण्याची पद्धत
आल्याचं पाणी सहजपणे तुम्ही घरीच तयार करू शकता. यासाठी 1 लीटर पणी घ्या आणि त्यात अर्धा चमचा सूंठ(वाळलेलं आलं) पावडर टाका आणि पाणी 750 मिलीलीटर होईपर्यंत उकडू द्या. पाणी नॉर्मल झाल्यावर थोडं थोडं पिऊ शकता.