Join us

हरितालिका: उपवासाच्या दिवशी ॲसिडीटी वाढून डोकं दुखतं? ६ नियम, उपवासाचा त्रास होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2025 18:17 IST

6 Rules for Haritalika Fast: हरितालिकेच्या दिवशी उपवास करणार असाल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टींची काळजी घ्यायला विसरू नका.(how to avoid acidity and indigestion while on haritalika fast?)

ठळक मुद्दे उपवासाचा थकवा अजिबात येणार नाही. शिवाय दुसऱ्या दिवशी गणपती बसविण्यासाठी तुम्ही अगदी उत्साहात सज्ज असाल.

गणपती बसण्याच्या आदल्यादिवशी हरितालिकेचं व्रत असतं (Haritalika 2025). बहुसंख्य महिला हे व्रत अगदी हौशीने करतात. शंकर पार्वतीची उपासना करून मनोभावे उपवास करतात. सकाळी उत्साहाच्या भरात काही वाटत नाही. पण नंतर मात्र ॲसिडीटी वाढल्यासारखं वाटतं. गळून गेल्यासारखं होतं. संध्याकाळच्या वेळी तर प्रचंड थकवा येतो. असं तुमच्या बाबतीत होऊ द्यायचं नसेल तर हरितालिकेचा उपवास करताना ६ गोष्टी लक्षात ठेवा (6 Rules for Haritalika Fast). यामुळे उपवासाचा थकवा अजिबात येणार नाही. शिवाय दुसऱ्या दिवशी गणपती बसविण्यासाठी तुम्ही अगदी उत्साहात सज्ज असाल.(how to avoid acidity and indigestion while on haritalika fast?)

हरितालिकेच्या उपवासामुळे ॲसिडीटी, अपचन होऊ नये म्हणून...

 

१. उपवासाच्या दिवशी तळलेले, तुपकट पदार्थ किंवा जड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. त्यामुळे अपचन, ॲसिडीटीचा त्रास होतो. तो टाळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शरीर व्यवस्थित हायड्रेटेड राहील याची काळजी घ्या. त्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या.

डायबिटीस: कारल्याचा, भोपळ्याचा ज्यूस पिऊन कंटाळलात? ५ चवदार भाज्या खा, शुगर राहील कंट्रोलमध्ये..

२. उपवासाच्या दिवशी फळं भरपूर खा. पण उपाशीपोटी फळं खाणं टाळा. त्यामुळे ॲसिडीटी वाढते.

३. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे किंवा तळलेले पदार्थ जास्त खाणं झाले तर ताक प्या. दही खा.

 

४. उपवासाच्या दिवशी भाजणीचे खमंग थालिपीठ खाणे जास्त चांगले. साबुदाण्याचे पदार्थ किंवा मग तेलकट, तुपकट पदार्थांपेक्षा उपवास भाजणीचे थालिपीठ करून खा. ते पोटाला दमदार राहाते. अपचन, ॲसिडीटी, बद्धकोष्ठता असे त्रास त्यामुळे होत नाहीत.

दूध गरम होताना उजव्या बाजुने ढवळावं की डाव्या बाजुने? वाचा चरक संहितामधली रंजक माहिती 

५. उपवासाच्या दिवशी गळून जाऊ नये म्हणून ड्रायफ्रुट शेक, मखाना खीर असे पातळ पदार्थही तुम्ही घेऊ शकता. ते पचायला सोपे आणि पोटासाठी दमदार असतात.

६. हरितालिकेच्या उपवासाच्या दिवशी रताळ्याच्या फोडी, रताळ्याचा किस असे पदार्थही खा. रताळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने ॲसिडीटी, अपचन होत नाही.  

टॅग्स :नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४अन्नआरोग्यहेल्थ टिप्सपाणीफळे