Join us  

पोट, दंडांची चरबी लटकते-शरीर बेढब झालंय? ५ सवयी बदला-आपोआप स्लिम व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 4:35 PM

Habits That Can Help To Lose Wright Fast : काही अशा सवयी आहेत ज्या तुमचं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी वेट मेंटेन ठेवणं गरजेचं असतं.  आपलं वजन बीएमआय इंडेक्सनुसार असायला हवं. चुकीची लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्यातील चुकांमुळे वजन वाढू लागतं.  ज्यामुळे आपल्या लुक्सवरही परिणाम होतो इतकंच नाही तर गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.  (Weight Loss Tips) वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात तर काहीजण वर्कआऊट करतात तरी देखिल  काहीजणांचे वजन  कमी होत नाही. काही अशा सवयी आहेत ज्या तुमचं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (Habits That Can Help To Lose Wright Fast According To Ayurveda)

इटिंग वेलच्या रिपोर्टनुसार खाण्याच्या तुलनेत जास्तीत जास्त व्यायाम करा. एकाचवेळी जास्त न खाता थोड्या थोड्या वेळाने खा किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने  फास्टींग करा, कॅलरीज काऊंट किती घेताय ते लक्षात घ्या.  झोपेकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही जे काही खाता त्याचा वजनावर परिणाम होतो म्हणून वजनाकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही किती खाताय त्याकडेही लक्ष द्या. (Ayurvedic Tips For Weight Loss)

१) हलका आहार घ्या

आयुर्वेदानुसार हलका आहार घेतल्याने तब्येतीच्या समस्या उद्भवत नाहीत.  अन्न लवकर पचत आणि वजनही वाढत नाही. याशिवाय शरीरात कफ आणि पित्त दोष उद्भवत नाही.

सकाळ-संध्याकाळ चालता पण पोट जसंच्या तसंच? किती, कसं चालायचं योग्य पद्धत पाहा-स्लिम व्हा

२) कोमट पाण्याचे सेवन करा

दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. कोमट पाण्याचे सेवन सकाळी उठल्यानंतर करा ज्यामुळे मेटाबॉलिझ्म स्ट्राँग होण्यास  मदत होते आणि कॅलरीजही बर्न होतात. याशिवाय पचनतंत्र चांगले राहते. 

३) व्यायाम आणि योगा करा

तुमचं शेड्यूल कितीही व्यस्त असेल  तर व्यायाम करायची सवय ठेवा. यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होईल आणि वजन कमी होण्यास मदत होईल. व्यायम केल्याने मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते आणि शरीर एक्टिव्ह राहते.

चष्मा नको पण चष्म्याशिवाय दिसत नाही? दूधात ३ पदार्थ मिसळून प्या-चष्म्याचा नंबर होईल कमी

४) रात्री उशीरा जेऊ नका

अनेकांना सवय असते की ते लोक रात्री उशीरा जेवतात.  ज्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो आणि पचनक्रिया संथ होते. अशा स्थितीत खाण्यापिण्यासाठी व्यवस्थित वेळ मिळत नाही ज्यामुळे वजन वाढतं. झोपण्याच्या ३ ते ४ तास आधी जेवण करायला हवं जेणेकरून खाल्लेलं अन्न पचायला चांगला वेळ मिळेल.  

टॅग्स :हेल्थ टिप्सलाइफस्टाइलआरोग्य