lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > बिनधास्त प्या उसाचा रस फुल ग्लास! नॅचरल एनर्जी ड्रिंक, त्वचा आणि तब्येत करतील ग्लो..

बिनधास्त प्या उसाचा रस फुल ग्लास! नॅचरल एनर्जी ड्रिंक, त्वचा आणि तब्येत करतील ग्लो..

दिवाळीत यथेच्छ केलेल्या फराळावर उतारा हवा असेल, तर उसाचा रस नियमित घेत चला. तब्येत तर सुधारेलच पण त्वचादेखील ग्लो करू लागेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 03:27 PM2021-11-14T15:27:06+5:302021-11-14T15:41:40+5:30

दिवाळीत यथेच्छ केलेल्या फराळावर उतारा हवा असेल, तर उसाचा रस नियमित घेत चला. तब्येत तर सुधारेलच पण त्वचादेखील ग्लो करू लागेल.

Glass of sugarcane juice! Natural energy drink... Will make health and keep your skin glowing | बिनधास्त प्या उसाचा रस फुल ग्लास! नॅचरल एनर्जी ड्रिंक, त्वचा आणि तब्येत करतील ग्लो..

बिनधास्त प्या उसाचा रस फुल ग्लास! नॅचरल एनर्जी ड्रिंक, त्वचा आणि तब्येत करतील ग्लो..

Highlightsआरोग्यासोबतच सौंदर्यही मिळवायचे असेल, तर उसाचा रस घेण्यास विसरू नका.

दिवाळीचा बहर ओसरू लागला की बाजारात उसाचा हंगाम सुरू होतो. उसाच्या रसाची खरी गोडी उन्हाळ्यातच..... असं म्हणून आपण सुरुवातीला या नॅचरल एनर्जी ड्रिंककडे दुर्लक्ष करतो. पण असं करू नका. सध्या बाजारात मिळणारा उस किंवा मग सरळ रसवंतीवर जाऊन उसाचा रस प्या.. कारण दिवाळीत केलेल्या फराळावर उसाचा रस हा एक उत्तम उतारा आहे, असं काही ज्येष्ठ मंडळी सांगतात. 

 

दिवाळीत गोडाधोडाचं जेवण होण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. तेलकट, तुपकट पदार्थही सर्रास खाल्ले जातात. बरं दिवाळीचा फराळ फक्त दिवाळीचे ३ दिवसच चालेल, असं काही नसतं. कारण दिवाळीनंतर चांगलं महिनाभर तरी इकडून- तिकडून फराळाची निमंत्रणं येत असतात. मित्रमंडळी, नातलग यांच्या आग्रहामुळे मग हो- नाही म्हणता- म्हणता खूपच जेवण आणि फराळ होऊन जातो. जेव्हा असं हेवी खाणं होईल किंवा तेलकट- तुपकट खूप जास्त खाल्ल्या जातील तेव्हा त्याच्यानंतर काही वेळाने जरून उसाचा रस प्या. कारण उसाचा रस प्यायला तर ॲसिडीटी, अपचन असा त्रास लगेचच कमी होतो आणि अतिजेवणाचा त्रास होत नाही. त्यामुळेच दिवाळीच्या फराळावर उसाचा रस हा उत्तम उतारा आहे किंवा उत्तम पर्याय आहे असे मानले जाते.

 

उसाचा रस पिण्याचे हे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या...
- उसाच्या रसामध्ये खूप जास्त प्रमाणात ग्लूकोज असते. त्यामुळे उसाचा रस हे नॅचरल एनर्जी ड्रिंक म्हणून ओळखले जाते. कारण उसाचा रस हा मन आणि शरीर या दोन्ही गोष्टी रिफ्रेश करणारा असतो.
- डिहायड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठीउसाचा रस खूप जास्त फायदेशीर ठरतो.
- उसाच्या रसामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे शरीरातील प्रोटीन्सची कमतरता दूर करण्यासाठी उसाचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. 
- उसाच्या रसाकडे नॅचरल ॲण्टीबायोटिक एजंट म्हणून पाहिले जाते. त्यामुळे शरीराला आतून रिकव्हर करण्याचे काम उसाचा रस करते.
- किडनी किंवा मुत्ररोग दूर करण्याची शक्ती उसाच्या रसात आहे.
- काविळ, दमा, खोकला अशा आजारांवर पण उसाचा रस घेणे फायदेशीर ठरते. 
- तोंडातले इन्फेक्शन, दातदुखी यासाठी देखील उसाचा रस घ्यावा. कारण उसामध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. दात मजबूत होण्यासाठी उस दाताने सोलून खाणे, अधिक फायदेशीर ठरते. 

हिरव्यागार चिंचेचा चटकमटक ठेचा! तिखट-आंबटगोड चवीची ही घ्या रसरशीत रेसिपी, तोंडाला पाणीच सुटेल..

 

उसाचा रस प्यायल्याने वाढते सौंदर्य.....
- उसाचा रस हा आरोग्याच्या दृष्टीने जसा महत्त्वाचा आहे, तसाच तो त्वचेसाठीही अतिशय पोषक आहे. त्यामुळे आरोग्यासोबतच सौंदर्यही मिळवायचे असेल, तर उसाचा रस घेण्यास विसरू नका.
- उसामध्ये हायड्रोक्सी ॲसिड आणि ग्लायकोलिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात असते. हे दोन्ही ॲसिड त्वचेसाठी अतिशय पोषक आहेत. या दोन्ही ॲसिडमुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि  पिंपल्सचा त्रास कमी होतो. 
- त्वचेचे डिहायड्रेशन रोखण्यासाठी उसाचा रस अतिशय उपयुक्त ठरतो. हिवाळ्यात त्वचा काेरडी पडण्याचा त्रास बहुतांश लोकांना जाणवतो. इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात पाणीही कमी प्यायले जाते. त्यामुळे त्वचेचे डिहायड्रेशन रोखायचे असेल, तर उसाचा रस आवर्जून घेतला पाहिजे.
- उसाच्या रसात ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेवर येणाऱ्या अकाली सुरकुत्या रोखण्यासाठी सिझन आला की उसाचा रस भरपूर प्रमाणात पिऊन घ्या. 

 

उसाचा रस पिण्यापुर्वी ही काळजी घ्या
- जर तुम्ही उस दाताने तोडून खाणार असाल, तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही उसाचा रस पिणार असाल तर तो रस ताजा आहे की नाही, याची आधी खात्री करा आणि मगच तो प्या.
- उसाचा रस काढल्यावर अर्धा तासात तो प्यायला गेला पाहिजे. नाहीतर त्यातले विषारी गुणधर्म वाढत जातात.
- लिंबासारख्या रंगाचा किंवा पिवळट, पोपटी रंगाचा उसाचा रस ताजा असतो. हिरवट किंवा काळपट पडलेला उसाचा रस खूप शिळा आहे, हे ओळखावे. असा रस पिणे टाळावे. 
- उसाच्या रसात लिंबू पिळून घेतल्यास त्याने आरोग्याला अधिक फायदा होतो. 

 

Web Title: Glass of sugarcane juice! Natural energy drink... Will make health and keep your skin glowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.