>आहार -विहार > हिवाळ्यात सर्दी खोकल्यावर गुणकारी भाजलेला लसूण! आता रोस्टेड गार्लिक खाण्याचा नवा ट्रेंड

हिवाळ्यात सर्दी खोकल्यावर गुणकारी भाजलेला लसूण! आता रोस्टेड गार्लिक खाण्याचा नवा ट्रेंड

Food: लसणाची फोडणी (garlic tadka) देऊन तळलेला लसूण तर आपण खातोच. पण यापेक्षाही हिवाळ्यात (winter special) थोड्या वेगळ्या पद्धतीने लसूण खाणे अधिक फायद्याचे ठरते. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 07:22 PM2021-12-02T19:22:37+5:302021-12-02T19:32:54+5:30

Food: लसणाची फोडणी (garlic tadka) देऊन तळलेला लसूण तर आपण खातोच. पण यापेक्षाही हिवाळ्यात (winter special) थोड्या वेगळ्या पद्धतीने लसूण खाणे अधिक फायद्याचे ठरते. 

Food trend: Benefits of eating roasted garlic in winter, natural immunity booster | हिवाळ्यात सर्दी खोकल्यावर गुणकारी भाजलेला लसूण! आता रोस्टेड गार्लिक खाण्याचा नवा ट्रेंड

हिवाळ्यात सर्दी खोकल्यावर गुणकारी भाजलेला लसूण! आता रोस्टेड गार्लिक खाण्याचा नवा ट्रेंड

Next
Highlightsहिवाळ्यात तळलेल्या लसूणापेक्षा रोस्टेड गार्लिक म्हणजेच भाजलेला लसूण खाणे चांगले मानले जाते.

हिवाळा (winter food) हा आरोग्यासाठी किंवा शरीर कमविण्यासाठी सगळ्यात चांगला ऋतू मानला जातो. पण असं असलं तरीही सर्दी (cold), खोकला (cough), जुनाट दमा, अस्थमा, सांधेदुखी असे आजार बळावण्याची शक्यताही हिवाळ्यातच जास्त असते. म्हणूनच तर हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक (immunity) शक्ती चांगली असली पाहिजे, जेणेकरून वारंवार उद्भवणाऱ्या संसर्गजन्स आजारांचा त्रास आपल्याला होणार नाही. हा त्रास होऊ नये, वारंवार आजारी पडू नये, यासाठी हिवाळ्यात लसूण खाणे फायदेशीर (benefits of eating garlic) ठरते. कारण लसूणामध्ये कॅल्शिअम, लोह, फायबर्स, कार्बोहायड्रेट आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते. 

 

हिवाळ्यात लसूण खाण्याची योग्य पद्धत
Correct way of eating garlic in winter 

फोडणीमध्ये टाकून तळलेला लसूण तर आपण खातोच. पण हिवाळ्यात तळलेल्या लसूणापेक्षा रोस्टेड गार्लिक म्हणजेच भाजलेला लसूण खाणे चांगले मानले जाते. लसूण भाजण्यासाठी पापड भाजतो ती जाळीदार चाळणी वापरली तरी चालते. गॅस पेटवून ही चाळणी गॅसवर ठेवा. त्यावर लसूणाच्या पाकळ्या मोकळ्या करून पसरवा. असे करताना लसूण सोलू नका. तो सालासकट भाजून घ्या. पाकळ्या चांगल्या भाजल्या गेल्यानंतर त्याचे वरचे टरफल काढा. त्यावर थोडे मीठ किंवा चाट मसाला टाका आणि अशा पाकळ्या दिवसातून दोन वेळा दोन- तीन खा. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात अशा भाजलेल्या लसणाच्या पाकळ्या खाव्या. पापड भाजायची चाळणी नसेल तर तव्यावर लसूण भाजला तरी चालेल. 

 

भाजलेला लसूण खाण्याचे फायदे
Benefits of eating roasted garlic 
१. संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षा 

हिवाळा म्हणजे साथीचे आजार वाढण्याचा काळ. साथीचे आजार किंवा संसर्गजन्य आजार होऊ द्यायचे नसतील, तर आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. त्यामुळेच हिवाळ्यात रोस्टेड गार्लिक म्हणजेच भाजलेला लसूण खावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

२. वाईट कोलेस्टरॉल होते कमी
bad cholesterol decreases

कच्चा लसूण, रोस्टेड लसूण आहारात नियमितपणे घेतल्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होऊन हृदयावर ताण येत नाही. त्यामुळेच हृदयाचे कार्य सुधारण्याबरोबरच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही लसूणाचा उपयोग होतो. 

 

३. वेटलॉससाठी उपयुक्त
Beneficial for weight loss

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सगळ्यांसाठीच रोस्टेड लसूण खाणे हा एक चांगला उपाय आहे. भाजलेला लसूण खाल्ल्यामुळे शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते. लसूण आपली चयापचय क्रिया वेगवान करतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते. अन्न नीट पचल्यामुळे शरीरावर चरबी साचत नाही. त्यामुळे वेटलॉससाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाने रोस्टेड लसूणाच्या पाकळ्या नियमितपणे खाव्या. 

 

४. दमा, खोकला कमी होतो
हिवाळ्यात जुनाट दमा, जुना खोकला असे त्रास उफाळून येतात. हे सगळे त्रास कमी करण्यासाठी रोस्टेड लसूण खाणे उपयुक्त ठरते. लसूण उष्ण असल्याने तो अशा आजारांवर गुणकारी ठरतो. भाजलेला लसूण आणि गुळ असे एकत्रित खाल्ल्यास दमा, खोकला, सर्दी असा त्रास कमी होतो. 

 

Web Title: Food trend: Benefits of eating roasted garlic in winter, natural immunity booster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

आपल्या आवडत्या पाणीपुरीचे 8 नावं आणि 8 प्रकार... प्रत्येक प्रकारची पाणीपुरी चवीच्या बाबतीत नंबर वन - Marathi News | 8 names and 8 types of your favorite Panipuri ... Number one for each type of Panipuri taste | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपल्या आवडत्या पाणीपुरीचे 8 नावं आणि 8 प्रकार... प्रत्येक प्रकारची पाणीपुरी चवीच्या बाबतीत नंबर वन

भारतात कुठेही जा, पाणीपुरी खायला नक्कीच मिळेल. पण प्रत्येक ठिकाणी पाणीपुरीचं नाव वेगळं, चव वेगळी. वाचा एकाच पाणीपुरीच्या आठ तऱ्हा. ...

ऑनलाइन अभ्यासात मुलं झालीये अगदीच ढीली; मुलांच्या आहारात  या 4 गोष्टी हव्याच..  ऑनलाइन अभ्यासातही मुलं होतील तेजतर्रार - Marathi News | Children are too lazy to online study ; These 4 things should be in the diet of children. Even in online study, children will be bright | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑनलाइन अभ्यासात मुलं झालीये अगदीच ढीली; मुलांच्या आहारात  या 4 गोष्टी हव्याच..  ऑनलाइन अभ्यासातही मुलं होतील तेजतर्रार

कम्प्युटरसमोर तासनतास ऑनलाइन अभ्यासाच्या निमित्ताने बसून क्षमता असूनही मुलांचा अभ्यासतला रस, एकाग्रता कमी झाल्याच्या पालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. तज्ज्ञ यासाठी मुलांवर दबाव आणण्यापेक्षा त्यांच्या आहाराकडे लक्ष देण्याचा सल्ला पालकांना देतात. मुलां ...

Homemade energy drink : तिशी-चाळीशीतही पंचविशीसारखे फिट दिसाल; 'हा' घ्या चांगल्या तब्येतीचा जबरदस्त उपाय  - Marathi News | Homemade energy drink for weakness : How to make energy drink to relieve fatigue and weakness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिशी-चाळीशीतही पंचविशीसारखे फिट दिसाल; 'हा' घ्या चांगल्या तब्येतीसाठी जबरदस्त उपाय 

Homemade energy drink for weakness : रोज चांगलं खाऊनही थकवा जाणवतो? तर कधी सर्दी खोकल्याचा त्रास वाढतो? मग हे घरगुती एनर्जी ड्रिंक प्या आणि थकवा, अशक्तपणा कायमचा दूर घालवा. ...

गुळपोळीचं सारण पातळ झालं किंवा घट्ट झालं तर? गुळपोळी बिघडली तर काय करायचं? - Marathi News | Makar sankranti, how to make perfect gulpoli? what to do if Gulpoli went wrong? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुळपोळीचं सारण पातळ झालं किंवा घट्ट झालं तर? गुळपोळी बिघडली तर काय करायचं?

गुळपोळी आवडते फार, मात्र कधीकधी सारणाचं गणित बिघडतं आणि गुळपोळी जमत नाही अशावेळी काय करावे? ...

थंड गारठल्या रात्री जेवणात करा 3 प्रकारचे सूप; भूकही भागेल, मूडही होईल खूश - Marathi News | 3 types of soup for a dinner in cold night; Hunger will go away and mood will be happy with these 3 types of soups | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंड गारठल्या रात्री जेवणात करा 3 प्रकारचे सूप; भूकही भागेल, मूडही होईल खूश

स्वयंपाकाचा कंटाळा आणि लागलेली भूक या दोन्ही गरजा भागवायच्या असतील तर मग सूपसारखा दुसरा चविष्ट, पोटभरीचा आणि पौष्टिक पर्याय नाही. तीन प्रकारचे सूप केवळ एक वाटीभर घेतलं तरी पोट भरतं. जे वेटलाॅससाठी योग्य सूपच्या शोधात असतील त्यांच्यासाठी हे तीन प्रकार ...

कुळथाचं कढण आणि चमचमीत उसळ; सूपरफूड म्हणून चर्चेत असलेल्या कुळथाचे पारंपरिक पौष्टिक पदार्थ - Marathi News | horse gram superfood, horse gram recipes, try traditional Konkan dishes Kulith Kadhan, Kulith Usal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुळथाचं कढण आणि चमचमीत उसळ; सूपरफूड म्हणून चर्चेत असलेल्या कुळथाचे पारंपरिक पौष्टिक पदार्थ

कुळथाचे शेंगोळे देशावर प्रिय तर कोकणात कुळथाचं पिठलं, कढण आणि उसळ. हे सारे पदार्थ सकस पोषण देतात आणि चविष्टही असतात. (horse gram recipes) ...