आजकाल धावपळीच्या जीवनात आणि बदललेल्या लाईफस्टाईलमुळे वजन वाढणे ही एक फारच कॉमन समस्या झाली आहे. अनेकांना वजन कमी करायचं असतं, पण नेमकी सुरुवात कुठून करावी हे कळत नाही. काहीवेळा चुकीचे डाएट प्लॅन्स किंवा अयोग्य व्यायाम पद्धती निवडल्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाही (Follow The 30-40-50 Rule To Lose Weight Expert Tells) आणि निराशा येते. पण काळजी करू नका! वजन कमी करणे हे एक मोठे आव्हान असले तरी, योग्य माहिती आणि योग्य रीतीने प्रयत्न केल्यास ते नक्कीच शक्य आहे.
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतोच. कुणी डाएट करतात तर कुणी जिम. वाढलेलं वजन कमी करणं म्हणजे फक्त डाएट किंवा जिममध्ये तासंतास घाम गाळणं एवढंच नाही, तर हा एक लाईफस्टाईलमधील बदल आहे. चुकीच्या आहाराच्या सवयी, तासंतास बसून राहण्याची पद्धत आणि तणाव यामुळे वजन झपाट्याने वाढतं. पण काही सोप्या, घरच्या घरी (Weight Loss Diet Tips) करता येणाऱ्या सवयी आपण स्वतःच स्वतःला लावून घेतल्या तर वजन कमी करणं सहज शक्य होतं. वेटलॉस करण्यासाठीचे नवनवीन फंडे नेहमीच व्हायरल होता असतात, त्यापैकीच एक ३०-४०-५० चा खास रुल. हा रुल फॉलो करून आपण अगदी झटपट वेटलॉस करु शकतो. जयपुरच्या Angelcare-A Nutrition and Wellness Center च्या डाएटिशियन व न्यूट्रिशनिस्ट अर्चना जैन यांनी वेटलॉस साठीचा ३०-४०-५० रूल नेमका काय आहे आणि वेटलॉस करण्यासाठी तो खरचं फायदेशीर (follow the 30-40-50 rule to lose weight) आहे का यांबद्दल अधिक माहिती onlymyhealth.com या संकेतस्थळाला दिली आहे.
काय आहे ३०-४०-५० नियम?
डाएटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट अर्चना जैन यांच्या मते, ३०-४०-५० हा नियम हा लाईफस्टाईलशी संबंधित एक महत्त्वाचा नियम आहे. या नियमामुळे आरोग्य सुधारण्यास, चयापचय क्रिया वाढवून वजन कमी करण्यास, कॅलरीज जाळण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
मॉर्निंग वॉकला तर जाता पण चुकीच्या पद्धतीने चालणं म्हणजे हार्ट ॲटॅकचा धोका, टाळा ७ चुका...
वेटलॉस करण्यासाठी ३०-४०-५० चा नियम म्हणजे नेमकं काय ?
१. सकाळी उठल्यावर ३० मिनिटांत पाणी प्या :- ३०-४०-५० नियमानुसार, सर्वात पहिले म्हणजे सकाळी उठल्याबरोबर ३० मिनिटांच्या आत एक ग्लास पाणी प्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही धणे आणि मेथी दाण्यांसारख्या इतर बियांचे देखील औषधी गुणधर्म असलेले पाणीही पिऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चहा आणि कॉफी पिणं टाळा. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होते, शरीरातील विषारी पदार्थ (toxins) बाहेर पडतात आणि इतर आरोग्याच्या समस्यांपासून देखील बचाव होतो.
२. ४० मिनिटांचा व्यायाम :- ३०-४०-५० नियमातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सकाळी कमीत कमी ४० मिनिटे नियमितपणे व्यायाम करा. यामुळे वजन कमी करण्यास आणि कॅलरीज जाळण्यास मदत होते. याशिवाय, रोज व्यायाम केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, शरीर डिटॉक्स होते, झोप चांगली लागते, स्नायू आणि मज्जासंस्था निरोगी राहते आणि इतर आरोग्य समस्यांपासूनही बचाव होतो. व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत होते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या (National Library of Medicine) एका अभ्यासानुसार, हाय इन्टेंसिटी वर्कआऊट (high-intensity intermittent exercise) हा इतर प्रकारच्या व्यायामांपेक्षा पोटाची आणि त्वचेखालील चरबी कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो, यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
३. ५० टक्के प्लांट बेस्ड आहाराचा समावेश करावा (Plant-based diet) :- ३०-४०-५० नियमानुसार, तुमच्या रोजच्या आहारात ५० टक्के प्लांट बेस्ड पदार्थांचा समावेश करावा. (उदा. फळे, भाज्या, कडधान्ये) यांचा समावेश करा. यामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया (bacteria) निरोगी राहण्यास मदत होते, जे शरीराला ऊर्जा देतात आणि पोषक तत्वे (nutrients) चांगल्या प्रकारे शोषून घेतात. यामुळे पचनक्रियाही सुधारते, परिणामी वजन जलद गतीने कमी करण्यास मदत होते.