lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रात्रीचं जेवण ‘सातच्या आत!’ अनुष्का शर्मा -अक्षयकुमार-मनोज वाजपेयी सायंकाळी लवकर जेवतात कारण..

रात्रीचं जेवण ‘सातच्या आत!’ अनुष्का शर्मा -अक्षयकुमार-मनोज वाजपेयी सायंकाळी लवकर जेवतात कारण..

Fitness Secret Of Celebrities Like Anushka Sharma, Akshay Kumar: रात्रीचं जेवण सायंकाळी ७ वाजता किंवा त्या ही आधी होणं का गरजेचं आहे, याविषयी बघा सेलिब्रिटी काय सांगत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2024 04:32 PM2024-01-24T16:32:38+5:302024-01-24T16:48:13+5:30

Fitness Secret Of Celebrities Like Anushka Sharma, Akshay Kumar: रात्रीचं जेवण सायंकाळी ७ वाजता किंवा त्या ही आधी होणं का गरजेचं आहे, याविषयी बघा सेलिब्रिटी काय सांगत आहेत.

Fitness secret of celebrities like Anushka Sharma, Akshay Kumar, Why it is important to take dinner before 7 pm? | रात्रीचं जेवण ‘सातच्या आत!’ अनुष्का शर्मा -अक्षयकुमार-मनोज वाजपेयी सायंकाळी लवकर जेवतात कारण..

रात्रीचं जेवण ‘सातच्या आत!’ अनुष्का शर्मा -अक्षयकुमार-मनोज वाजपेयी सायंकाळी लवकर जेवतात कारण..

Highlightsआरोग्यासाठी रात्रीचं जेवण सायंकाळी ७ च्या आधी होणं गरजेचं आहे. अनुष्का शर्मा, अक्षय कुमार यांच्यासारखे सेलिब्रिटी ते तंतोतंत पाळतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला नेमके कोणते फायदे झाले आहेत, ते पाहा..

सर्वसामान्य भारतीय घरांमध्ये असं चित्र असतं की सायंकाळी साधारण ६: ३० ते ७: ३० या दरम्यान नोकरदार माणसं त्यांचं दिवसभराचं काम संपवून घरी येत असतात. मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना किंवा जे व्यावसायिक आहेत त्यांना घरी यायला तर यापेक्षा जास्त वेळ होतो. यानंतर मग साधारण ९- १० वाजेच्या दरम्यान अनेक लोक रात्रीचं जेवण करतात. आणि खरी आरोग्याची समस्या इथूनच सुरू होते, असं अनेक आहारतज्ज्ञ सांगतात (Fitness Secret Of Celebrities Like Anushka Sharma, Akshay Kumar). आरोग्यासाठी रात्रीचं जेवण सायंकाळी ७ च्या आधी होणं गरजेचं आहे. अनुष्का शर्मा, अक्षय कुमार यांच्यासारखे सेलिब्रिटी ते तंतोतंत पाळतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला नेमके कोणते फायदे झाले आहेत, ते पाहा..(Why it is important to take dinner before 7 pm?)

 

dr.pal.manickam या इन्स्टाग्राम पेजवरून अनुष्का शर्माच्या मुलाखतीचा काही भाग व्हायरल करण्यात आला आहे.

खूप थकवा आला- डोकंही ठणकतंय? फक्त २ ठिकाणी हेड मसाज करा- चटकन फ्रेश वाटेल

यामध्ये अनुष्का सांगते की ती तिचं रात्रीचं जेवण ५: ३० ते ६ या दरम्यान घेते. ही वेळ सर्वसाधारणपणे आपल्यासाठी चहा आणि स्नॅक्स घेण्याची असते, त्यावेळी मात्र तिचं रात्रीचं जेवण उरकलेलं असतं. ती म्हणते की जेव्हापासून तिने रात्रीच्या जेवणाचा वेळ असा संध्याकाळचा केला आहे, तेव्हापासून तिच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर झाल्या असून तिला झोपही खूप चांगली आणि शांत येते. शिवाय रोज सकाळी अगदी फ्रेश जाग येते आणि कितीही काम असलं तरी दिवसभर खूप एनर्जेटिक वाटतं.

weareakkians_ या इन्स्टाग्राम पेजवरून अक्षय कुमारच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये तो तब्येत सांभाळण्यासाठी आहाराची कशी पथ्ये पाळतो, हे त्याने सांगितलं आहे.

मुलांना मातीत, गवतामध्ये अनवाणी चालू द्या आणि तुम्हीही चाला, कारण..... वाचा ५ जबरदस्त फायदे

अक्षयच्या फिटनेसचं एक सोपं आणि सुटसुटीत रहस्य म्हणजे तो संध्याकाळी साडे सहानंतर सहसा काही खात नाही. कधी एखाद्या दिवशी खूपच भूक लागली तर सॅलेड किंवा सूप असा हलका आहार घेतो. दिवसभर तुमच्या आवडीचे पदार्थ खा, गोड खा, पण सायंकाळी साडे सहानंतर मात्र काहीही खाणं टाळा, हा अक्षय कुमारने सांगितलेला त्याचा फिटनेस फंडा आहे. 

 

Web Title: Fitness secret of celebrities like Anushka Sharma, Akshay Kumar, Why it is important to take dinner before 7 pm?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.