Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वेटलॉससाठी मेथी दाणे की बडीशेप काय फायदेशीर? डॉक्टर सांगतात, वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावं ?

वेटलॉससाठी मेथी दाणे की बडीशेप काय फायदेशीर? डॉक्टर सांगतात, वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावं ?

Fennel Seeds Or Fenugreek Seeds Which Is Better For Weight Lose : Which is better For Weightloss fenugreek or fennel seeds : वजन कमी करण्यासाठी काहीजण बडीशेप खातात तर काही मेथी दाणे, पण वेटलॉससाठी काय फायदेशीर आहे, ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2025 19:03 IST2025-05-23T18:51:11+5:302025-05-23T19:03:01+5:30

Fennel Seeds Or Fenugreek Seeds Which Is Better For Weight Lose : Which is better For Weightloss fenugreek or fennel seeds : वजन कमी करण्यासाठी काहीजण बडीशेप खातात तर काही मेथी दाणे, पण वेटलॉससाठी काय फायदेशीर आहे, ते पाहा...

Fennel Seeds Or Fenugreek Seeds Which Is Better For Weight Lose Which is better For Weightloss fenugreek or fennel seeds | वेटलॉससाठी मेथी दाणे की बडीशेप काय फायदेशीर? डॉक्टर सांगतात, वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावं ?

वेटलॉससाठी मेथी दाणे की बडीशेप काय फायदेशीर? डॉक्टर सांगतात, वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावं ?

स्लिम आणि फिट दिसणं हे फक्त सौंदर्यापुरतेच मर्यादित राहिलेले नसून, आता ते आरोग्यासाठीही आवश्यक बनलं आहे. वाढते वजन ही सध्याची फार कॉमन समस्या झाली आहे. आजकाल प्रत्येकजण आपले वाढते वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसत आहे. वजन कमी करण्यासाठी बरेचजण डाएट, एक्सरसाइज सोबतच (Fennel Seeds Or Fenugreek Seeds Which Is Better For Weight Lose) काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय देखील करुन पाहतात. वेटलॉससाठी नैसर्गिक व घरगुती उपाय करताना आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या पदार्थांमधील बडीशेप आणि मेथी दाण्यांचा (Which is better For Weightloss fenugreek or fennel seeds) वापर फार मोठ्या प्रमाणांत केला जातो. आपल्यापैकी बरेचजण वेटलॉससाठी, मेथी दाणे आणि बडीशेप पाण्यात भिजत ठेवून ते पाणी पितात. एवढंच नाही तर, वजन कमी करण्यासाठी मेथी दाणे आणि बडीशेप यांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो.

 मेथी दाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतात, पचनसंस्थेला गती देतात आणि चरबी कमी करण्यास मदत करतात. तर दुसरीकडे बडीशेप पचनक्रिया सुधारते, शरीरातून विषारी घटक बाहेर टाकते आणि भूक नियंत्रणात ठेवते. खरंतर, हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत, परंतु वजन कमी करण्यासाठी नेमकं यातील काय खावं असा प्रश्न पडतो. वेटलॉससाठी बडीशेप की मेथी दाणे यातील काय अधिक फायदेशीर आहे ते पाहूयात. 

वजन कमी करण्यासाठी काहीजण बडीशेप खातात तर काही मेथी दाणे, पण वेटलॉससाठी या दोघांतील नेमकं काय उत्तम आणि फायदेशीर आहे, हे बऱ्याचजणांना माहित नसते. मुंबईतील केटी क्लिनिकच्या आयुर्वेदिक डॉ. अंजू मनकानी यांनी onlymyhealth.com ला दिलेल्या मुलाखतीनुसार, वजन कमी करण्यासाठी काय आहे फायदेशीर ते पाहूयात.  

सारा तेंडुलकर, केसांसाठी करते तिच्या आईने सांगितलेला पारंपरिक उपाय - पाहा तिचे हेअर केअर सिक्रेट!

  

बडीशेप खाण्याचे फायदे... 

बडीशेप चवीला थोडीशी गोड असते, याचबरोबर वेगवेगळ्या पदार्थामध्ये बडीशेपचा वापर केला जातो. बडीशेप खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते. रोजच्या आहारात याचा समावेश केल्याने गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. याचबरोबर, पोटातील गॅसची समस्या किंवा पोट  फुगी, पोट दुखणे यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो आणि पचनसंस्था देखील निरोगी राहते. रात्री झोपण्यापूर्वी बडीशेप खाल्ल्याने झोपेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे अनेक आजार आणि शारीरिक समस्या कमी करण्यास मदत करतात. बडीशेप पोटाला थंडावा देते आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर करते.

सकाळी रिकाम्या पोटी शिल्पा शेट्टी पिते 'हे' खास ड्रिंक, म्हणून चाळिशी उलटली तरी आहे फिट!

मेथी दाणे खाण्याचे फायदे... 

मेथीचे दाणे खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. मेथी चवीला थोडी कडू असली तरी त्याचे दाणे कडक असतात. मेथीचे दाणे खाल्ल्याने रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित करता येते. जर शरीरात हार्मोनल असंतुलन असेल तर मेथी दाणे रोजच्या डाएटमध्ये समाविष्ट केल्याने हार्मोनल असंतुलनाची समस्या दूर होते. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात मेथीचे दाणे खाल्ले तर त्याचा पचनसंस्थेलाही चांगला फायदा होतो. मेथीच्या बियांमध्ये औषधी गुणधर्म असतात, म्हणूनच ते अनेक औषधे बनवण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. 

लघवीतले ‘हे’ ४ बदल सांगतात किडनीच्या आजाराची लक्षणं, पाहा तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना...

वेटलॉससाठी नेमकं काय जास्त फायदेशीर ? 

वजन कमी करण्यासाठी बडीशेप आणि मेथीचे दाणे दोन्हीही फायदेशीर आहेच. पण, वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे अधिक फायदेशीर मानले जातात. मेथीचे दाणे खाल्ल्याने भूक नियंत्रित होते आणि एकूण कॅलरीजचे प्रमाण कमी होते. कॅलरीजचे प्रमाण कमी केल्याने वजन जलद कमी होते. मेथीचे दाणे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. हे शरीरातील जळजळ नियंत्रित करण्यास मदत करते, जे वजन वाढण्याचे एक कारण आहे. म्हणून, वजन कमी करण्यासाठी बडीशेपपेक्षा मेथीचे दाणे खाणे जास्त फायदेशीर आहेत. जर तुम्ही दररोज मेथीचे दाणे खाल्ले तर ते मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करते, जे वजन वाढण्याचे एक कारण आहे.

Web Title: Fennel Seeds Or Fenugreek Seeds Which Is Better For Weight Lose Which is better For Weightloss fenugreek or fennel seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.