Join us  

Father's Day 2021:  बाबांना वाढतं वजन अन् डायबिटीसचा त्रास आहे? मग निरोगी राहण्यासाठी 'या' टिप्स वापरायलाच हव्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 12:47 PM

Father's Day 2021: मधुमेहाबरोबर जगणे म्हणजे नियमित शारीरिक व्यायाम करणे आणि वेळोवेळी चाचणी करणं गरजेचं आहे.

ठळक मुद्देएका अभ्यासानुसार, महिलांच्या तुलनेत पुरुषांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांची काळजी घेणे ही मुलांची पहिली जबाबदारी आहे. फळे आणि भाज्या अँटिऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल, जीवनसत्त्वे, खनिजे, कॅरोटीनोइड्स आणि फायबरचे उत्कृष्ट स्रोत आहेत. ते केवळ रोगांना वाढण्यापासून रोखत नाहीत तर आपल्या आरोग्याचीही काळजी घेतात.

तुम्हीसुद्धा आपल्या वडीलांच्या आरोग्याबद्दल काळजीत आहात का? बर्‍याच मुलांसाठी त्यांच्या वडिलांच्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. विशेषत: वडील मधुमेहाचे रुग्ण असल्यास मुलांनी त्यांच्या आरोग्याची चिंता करणे स्वाभाविक आहे. मधुमेह हा एक क्रॉनिक डिसीज आजार आहे, ज्यावर आयुष्यभर लक्ष देणे आवश्यक आहे. मधुमेहाबरोबर जगणे म्हणजे नियमित शारीरिक व्यायाम करणे आणि वेळोवेळी चाचणी करणं गरजेचं आहे.

एका अभ्यासानुसार, महिलांच्या तुलनेत पुरुषांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांची काळजी घेणे ही मुलांची पहिली जबाबदारी आहे. आज, फादर्स डे 2021 च्या निमित्ताने आम्ही आपल्याला काही आरोग्यविषयक टिप्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही वडीलांची काळजी घेऊ शकता. 

फळं आणि भाज्या खायला हव्यात

फळे आणि भाज्या अँटिऑक्सिडंट्स, पॉलीफेनॉल, जीवनसत्त्वे, खनिजे, कॅरोटीनोइड्स आणि फायबरचे उत्कृष्ट स्रोत आहेत. ते केवळ रोगांना वाढण्यापासून रोखत नाहीत तर आपल्या आरोग्याचीही काळजी घेतात. आपण निरोगी असाल तर आपले कुटुंब निरोगी आहे हे लक्षात ठेवा. म्हणून वडीलांना आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला द्या. विशेषत: मेडिटेरेनियन डाइट आपल्यासाठी फायदेशीर आहे.

टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत सुधारणा

एका अभ्यासानुसार असे म्हटले आहे की पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त म्हणजे मधुमेहाचा धोका. तसेच, कधीकधी त्याची कमतरता देखील पुरुषांमध्ये मधुमेहाचे कारण बनते. म्हणून, सामान्य संप्रेरक पातळी राखण्यासाठी व्हिटॅमिन डी आणि झिंकयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि पुरुषांमध्ये फर्टिलिटी वाढवण्यास मदत होते. 

धुम्रपान सोडून द्या

जर आपल्या वडीलांना मधुमेह असेल तर धूम्रपान सोडणे त्यांच्या हिताचे आहे. धूम्रपान आणि उच्च ग्लूकोजच्या पातळीचे संयोजन मधुमेह असलेल्या लोकांमध्ये मृत्यु दर वाढवू शकते. बहुतेक पुरुष धूम्रपान करत असल्याने, त्यांना संक्रमण, अल्सर आणि रेटिनोपॅथीसारख्या गुंतागुंत होण्याची अधिक शक्यता असते. 

ताण कमी घ्यायला  हवा

एक पिता असल्याने साहजिकच आर्थिक, कौटुंबिक आणि स्थिरतेशी संबंधित बर्‍याच गोष्टींचा ताण येतो. एका अभ्यासानुसार ताणतणावामुळे तीव्र हायपरग्लाइसीमिया होऊ शकतो. अनेक हार्मोन्स ताणमुळे मुक्त होतात, ज्यामुळे ग्लूकोजची पातळी वाढते. दरम्यान योगा किंवा व्यायामाद्वारे ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. 

वजन कमी करणं

एका अभ्यासानुसार, बहुतेक मधुमेही लठ्ठपणा किंवा जास्त वजन असलेले असतात जे हृदयाशी संबंधित आजारांसाठीही जबाबदार ठरू शकतात. जर आपल्याला आपल्या वडिलांच्या वाढलेल्या वजनाबद्दल चिंता वाटत असेल तर आपण त्यांना चालणे, धावणे, सायकल चालविणे किंवा बर्‍याच प्रकारचे एरोबिक व्यायाम करणे यासारखे शारीरिक क्रिया करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. मधुमेहाच्या प्रत्येक रुग्णानं हे समजून घेतले पाहिजे की मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्रिय राहणे हाच एक चांगला मार्ग आहे.

कमी तेलातील अन्नपदार्थ खायला हवेत

डायबिटीस असलेल्या लोकांना जास्त  तळलेल्या गोष्टी खाण्यास मनाई आहे. मधुमेह असलेल्या लोकांना जेवणात तेलाचे कमी सेवन करण्याचा सल्लाही तज्ञांनी दिला जातो. कारण यात चरबी आणि कॅलरीज जास्त असतात. म्हणून तळलेल्या पदार्थांपासून लांब राहणं फायद्याचं ठरतं. 

ठरलेल्यावेळी चाचणी करून घ्यायला हवी

तुमच्या वडीलांना मधुमेह  किंवा दुसरा कोणताही आजार असेल तर वेळेवर औषधं देण्यापासून चाचणी करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. वडिलांना आठवण करून देण्याचा प्रयत्न करणे ही मुलांचीही जबाबदारी आहे.मधुमेहाचा सामना करत असलेल्या लोकांनी साखर किंवा त्याच्याशी संबंधित उत्पादनांचा वापर करणे टाळले पाहिजे. एका अभ्यासानुसार गोड पदार्थांमुळे  ग्लूकोजची पातळी वाढते. विशेषत: रिफाईन शुगर असलेले पदार्थ टाळा. साखरेऐवजी गुळाचा समावेश आहारात करू शकता. 

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्समधुमेहजागतिक पितृदिनवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स