Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करण्यासाठी खात राहा ! झटपट वजन उतरवण्याचा अनोखा फंडा, दिसाल स्लिमट्रिम...

वजन कमी करण्यासाठी खात राहा ! झटपट वजन उतरवण्याचा अनोखा फंडा, दिसाल स्लिमट्रिम...

Importance Of Small & Frequent Meals For Weight Loss : Eating Small Frequent Meals Helps with Weight Loss & Health : eating small & frequent meals help lose weight : वजन कमी करण्यासाठी सतत थोडं थोडं खाण्याची सवय कशी फायदेशीर ठरु शकते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2024 18:54 IST2024-12-30T18:47:13+5:302024-12-30T18:54:33+5:30

Importance Of Small & Frequent Meals For Weight Loss : Eating Small Frequent Meals Helps with Weight Loss & Health : eating small & frequent meals help lose weight : वजन कमी करण्यासाठी सतत थोडं थोडं खाण्याची सवय कशी फायदेशीर ठरु शकते...

eating small & frequent meals help lose weight Eating Small Frequent Meals Helps with | वजन कमी करण्यासाठी खात राहा ! झटपट वजन उतरवण्याचा अनोखा फंडा, दिसाल स्लिमट्रिम...

वजन कमी करण्यासाठी खात राहा ! झटपट वजन उतरवण्याचा अनोखा फंडा, दिसाल स्लिमट्रिम...

सतत वाढणारे वजन कमी करण्यासाठी आपण सगळेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रामुख्याने डाएट आणि एक्सरसाइज या दोनच मुख्य गोष्टींवर अधिक भर (Importance Of Small & Frequent Meals For Weight Loss) दिला जातो. यासोबतच, वजन कमी करायचं म्हटलं की कमी खाणं किंवा अमुक काहीसे पदार्थ खाणं बंद करण असा एक समज सर्वसामान्यपणे असतोच. जर कुणाला वजन कमी करायचे असेल तर त्याला कमी खाण्याचा (eating small & frequent meals help lose weight) सल्ला सर्वप्रथम दिला जातोच. वजन कमी करायचं म्हटलं की आपण स्वतःच आपला नेहमीचा आहार थोडाफार कमी करतोच. पण असा आहार कमी करुन किंवा कमी खाऊन वजन खरंच कमी होत का ? (Eating Small Frequent Meals Helps with Weight Loss & Health).

खरंतर, वजन कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञ आणि डाएटिशियनच्या सल्ल्यानुसार, दिवसभरात थोड्या - थोड्या वेळाने थोडं खाल्लंच पाहिजे. अशाप्रकारे जर आपण दिवसभरात अमुक एका ठराविक वेळेनंतर थोडं थोडं खाण्याची स्वतःला सवय लावली तर या सवयीचा वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. एक्सरसाइज फिजिओलॉजिस्ट आणि होलिस्टिक हेल्थ कोच कपिल कनोडिया यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत वजन कमी करण्यासाठी या सवयीचा नेमका फायदा कसा होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. वजन कमी करण्यासाठी थोडं थोडं खाण का गरजेचं आहे ते पाहूयात.

सतत खात राहिल्याने वेटलॉससाठी कशी मदत होते ? 

१. कमी कॅलरीज खाल्ल्या जातात :- जेव्हा आपण दिवसभरात एकाचवेळी भरपूर खातो तेव्हा असे अन्नपदार्थ पचवण्यासाठी आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा खर्च करावी लागते. परंतु याउलट जेव्हा आपण दिवसभरात अमुक एका थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने थोडं थोडं खातो तेव्हा आपण किती कॅलरीजचे पदार्थ खाणार आहोत ते आधीच ठरवू शकतो. यामुळे आपण कमी कॅलरीजचे अन्नपदार्थ अगदी सहजपणे निवडून खाऊ शकतो. 

२. अन्नपदार्थ पचवणं सोपं जात :- जेव्हा आपण दिवसभरात थोडं थोडं खातो तेव्हा ते अन्न लवकर पचते, कारण अशाप्रकारे पोटावर दबाव येत नाही. तसेच अन्नपदार्थ पचवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जा वापरावी लागत नाही. ठराविक वेळाने थोडं थोडं खाल्ल्याने शरीराला अन्नातील सर्व पोषक तत्वे शोषण्यास मदत होते. दिवसभरात थोडं थोडं खाल्ल्याने एकाचवेळी जास्त कॅलरीज आपल्या शरीरात जात नाहीत, यामुळे शरीराला अन्नपदार्थ पचवणे सोपं जात. 

बाळंतपणात वाढलेलं २३ किलो वजन नेहा धुपियाने चटकन केलं कमी! ते कसं, वाचा...

३. सतत खाण्याची इच्छा नियंत्रित होते :- जेव्हा तुम्हाला दिवसभरात वारंवार भूक लागते किंवा सारखं काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर ही पद्धत तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जेव्हा आपण दिवसभरात अनेकवेळा थोडं थोडं खाणं खातो तेव्हा आपली सतत खाण्याची इच्छा नियंत्रित करण्यास अधिक मदत होते. या सवयीमुळे आपल्या शरीराला अन्न पुन्हा पुन्हा मिळते त्यामुळे वारंवार खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवता येते. यामुळे वजन कमी करणे देखील सोपे होते.  

हिवाळ्यात तूप खाल्लं म्हणून खरंच वजन वाढत का ? बघा एक्स्पर्ट सांगतात यामागचं खरं कारण...


वजन कमी करताना चेहऱ्यावरची चमक गायब? ऋजुता दिवेकरांच्या ३ टिप्स- चेहऱ्यावर ग्लो हवा तर...

४. कॅलरीज लवकर बर्न होतात :- जेव्हा आपण दिवसभरात अनेकवेळा थोडं थोडं खाणं खातो आणि वारंवार खातो तेव्हा शरीराला कॅलरीज बर्न करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. या प्रक्रियेमुळे कॅलरीज अधिक जलद बर्न होतात. याला 'थर्मोजेनिक इफेक्ट' देखील म्हणतात.

वजन कमी करण्यासाठी हे सुद्धा लक्षात ठेवा... 

१. तुम्ही दिवसभरात काय खाणार आहात त्याचे प्लॅनिंग आधीच करून ठेवा. यामुळे तुम्ही अतिरिक्त कॅलरीज घेणार नाही.
२. तुमच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा सारख्याच ठेवा. यामुळे तुमचे दैनंदिन वेळापत्रक व्यवस्थित राहील.
३. स्ट्रेस पासून दूर राहा, यामुळे वजन कमी होण्यासही अडथळा येऊ शकतो.
४. जेवताना इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. यामुळे तुम्ही माइंडफुल इटिंग करू शकाल.
५. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएटवर असाल तर आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच तुमच्या दिवसभरातील कॅलरीज निश्चित करा.

Web Title: eating small & frequent meals help lose weight Eating Small Frequent Meals Helps with

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.