lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > बिनधास्त भात खा, केस छान वाढतील; थायरॉईडचं बिघडतं चक्रही सुधारेल! भाताला भीता कशाला.. 

बिनधास्त भात खा, केस छान वाढतील; थायरॉईडचं बिघडतं चक्रही सुधारेल! भाताला भीता कशाला.. 

भाताबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रचंड समज- गैरसमज आहेत. पण ते काही काळ दूर ठेवा आणि बिनधास्त भात खा... कारण भात खाण्याचे अनेक फायदे आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 05:46 PM2021-10-21T17:46:55+5:302021-10-21T17:47:46+5:30

भाताबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रचंड समज- गैरसमज आहेत. पण ते काही काळ दूर ठेवा आणि बिनधास्त भात खा... कारण भात खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Eat rice without hesitation, hair will grow nicely; Deteriorating thyroid cycle will also improve! Why are you afraid of rice .. | बिनधास्त भात खा, केस छान वाढतील; थायरॉईडचं बिघडतं चक्रही सुधारेल! भाताला भीता कशाला.. 

बिनधास्त भात खा, केस छान वाढतील; थायरॉईडचं बिघडतं चक्रही सुधारेल! भाताला भीता कशाला.. 

Highlightsब्राऊन राईसमध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर्स असतात. हे सगळे घटक स्काल्प म्हणजेच डोक्याच्या त्वचेसाठी पोषक असतात.

ज्यांना वजन कमी करायचं असतं, असे लोक सगळ्यात पहिली गदा आणतात ती भातावर. भात जणू काही आरोग्यासाठी अतिशय अपायकारक आहे, भातामुळे आपलं वजन खूपच वाढणार आहे, अशा दृष्टीकोनातून भाताकडे पाहण्यात येतं. भात खाते आहेस, मग वजन कसं कमी होणार... असा प्रश्न तर वजन कमी करण्यासाठी पण भात खाण्याची सवय सोडू न शकणाऱ्या प्रत्येकीला विचारला जातो. आपल्या घरातही जर कुणी डाएटींग करत असेल, तर सगळ्यात आधी त्याला भात न खाण्याचा सल्ला देऊन आपण मोकळे होऊन जातो. पण हे सगळं थांबवा. कारण आरोग्यासाठी भात एवढाही वाईट नाही, जेवढा आपण समजतो. उलट भात खाल्ल्यामुळे तुमच्या त्वचेला ग्लो येतो आणि केसांची वाढ चांगली होते, असं प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर सांगत आहेत.

 

ऋजूता दिवेकर यांनी सांगितलेलं डाएटिंगचा नियम अतिशय सोपा आहे. जे काही पदार्थ तुमच्या आई, आजी, पणजी बनवत होत्या आणि खात होत्या, ते सगळे पदार्थ खा, असं त्या बिनधास्त सांगतात. सोशल मिडियावरदेखील त्या प्रचंड ॲक्टीव्ह असून काय आणि कसं खावं, खाण्याची पथ्ये कशी पाळावीत याविषयी त्या नेहमीच मार्गदर्शन करत असतात. ऋजूता यांनी भाताविषयीची एक पोस्ट नुकतीच सोशल मिडियावर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी भात खाण्याचे अनेक फायदे सांंगितले असून भात खाणे आरोग्यासाठी किती चांगले असते, हे देखील स्पष्ट केले आहे. ज्यांनी जे काही मुद्दे सांगितले आहेत, त्यापैकी महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भात खाल्यामुळे त्वचा चमकदार होते आणि केसांची चांगली वाढ होते.

 

तांदुळामध्ये फॅट्स आणि नॅचरल शुगर या दोन्ही घटकांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे जर रोजच्या जेवणात भात नियमितपणे आणि योग्य प्रमाणात घेतला तर शरीरात इन्सूलिनचा स्त्राव मर्यादित स्वरूपात होत राहतो आणि त्यामुळे तो आरोग्यासाठी हानिकारक नसतो. तसेच तांदूळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते. जेव्हा आपली पचनसंस्था चांगली असते, तेव्हा आपोआपच शरीरावर अतिरिक्त चरबी साचून राहत नाही. त्यामुळे वजन वाढीवर आपोआपच मर्यादा येते. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पचनशक्ती जर चांगली असेल, तर त्वचेचे अनेक विकार दूर होतात. कारण बऱ्याचदा त्वचेच्या अनेक समस्या या पचनाशी संबंधित असतात. 

 

भात खाण्याचे फायदे
ऋजूता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी भात खाण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. त्या म्हणतात की पुर्वग्रह, भीती यामुळे आपण अनेकदा भात खाण्याचे टाळतो. पण भात का खावा, याची काही कारणे त्यांनी नमूद केली आहेत. त्या म्हणतात....
- हाताने मळलेले किंवा सिंगल पॉलिश तांदूळ खीर बनविण्यासाठी चांगले असतात.
- डाळी, दही, कढी, शेंगा, तूप यांच्यासोबत भात खाणे चांगले आहे.


- भात पचायला सोपा असतो. त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांना भात आवश्यक आहे.
- भातामुळे शरीरात हार्मोनल संतूलन चांगल्याप्रकारे राखले जाते. 
- भात त्वचेसाठी उत्तम असतो. 
- थायराॅईडमुळे जर केसांच्या वाढीवर परिणाम झाला असेल, तर अशा वेळी केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी भात खावा.

 

ब्राऊन राईस खाण्याचे हे विशेष फायदे
ब्राऊन राईस हे एक फेनोलिक कम्पाउंड आहे. ब्राऊन राईस नियमितपणे खाल्ला तर त्वचेवर कसल्यातरी ॲलर्जीमुळे येणारा लालसरपणा, खाज कमी होते. शिवाय या तांदूळामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे एजिंग प्रोसेसला मंद करण्यासाठी किंवा काही काळ पुढे ढकलण्यासाठी ब्राऊन राईस खाणे उपयुक्त ठरते. ब्राऊन राईसमध्ये सेलेनियम हा एक घटक असतो. यामुळे त्वचेची इलॅस्टिसीटी नियंत्रित राहते आणि त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. 

 

केसांसाठी ब्राऊन राईस आहे उत्तम
ज्याप्रमाणे त्वचेच्या दृष्टीकोनातून ब्राऊन राईस खाण्याचे अनेक फायदे आहेत, तसेच फायदे केसांसाठीही आहेत. ब्राऊन राईसमध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर्स असतात. हे सगळे घटक स्काल्प म्हणजेच डोक्याच्या त्वचेसाठी पोषक असतात. त्यामुळे जर तुम्हाला वेटलॉस करायचा आहे आणि शिवाय केस आणि त्वचा देखील सुंदर रहावी, असं वाटत असेल, तर बिनधास्त भात खा. पण त्याचे प्रमाण मात्र नियंत्रित ठेवा.  

 

Web Title: Eat rice without hesitation, hair will grow nicely; Deteriorating thyroid cycle will also improve! Why are you afraid of rice ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.