Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > व्यायाम-डाएट करूनही वजन कमी होईना? जेवण करण्याची पाहा योग्य पद्धत; वेट लॉस की गॅरण्टी

व्यायाम-डाएट करूनही वजन कमी होईना? जेवण करण्याची पाहा योग्य पद्धत; वेट लॉस की गॅरण्टी

Does Eating Slowly Help You Lose Weight : प्रत्येक घास किती वेळा चावून खावा? खाण्याचा कोणता नियम फॉलो केल्याने वेट लॉस होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2024 04:20 PM2024-05-13T16:20:17+5:302024-05-14T10:16:43+5:30

Does Eating Slowly Help You Lose Weight : प्रत्येक घास किती वेळा चावून खावा? खाण्याचा कोणता नियम फॉलो केल्याने वेट लॉस होईल?

Does Eating Slowly Help You Lose Weight? | व्यायाम-डाएट करूनही वजन कमी होईना? जेवण करण्याची पाहा योग्य पद्धत; वेट लॉस की गॅरण्टी

व्यायाम-डाएट करूनही वजन कमी होईना? जेवण करण्याची पाहा योग्य पद्धत; वेट लॉस की गॅरण्टी

बऱ्याच लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की अन्न गिळू नका, तर हळू हळू चावून खा (Eating Habits). पण अन्न हळू खा किंवा चावून खा, जाणार तर पोटातच. पण अन्न चावून खाण्याचा थेट संबंध आपल्या पोट आणि आतड्यांशी असतो. पचन प्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया तोंडात अन्न चघळण्यापासून सुरू होते (Weight Loss). अन्न व्यवस्थित चघळून खाल्ल्याने शरीराला अन्नातून मिळणारे पौष्टीक घटक मिळतात. शिवाय अन्न चघळून खाल्ल्याने शरीराला अन्नाची अनुभूती येते, त्यामुळे आपण थोडं कमी जेवतो. आता प्रश्न असा समोर येतो की, अन्न किती वेळा चावून खावे? हळू हळू अन्न चावून खाण्याचे फायदे किती? यामुळे वेट लॉस होते का?

यासंदर्भातली माहिती देताना, न्यूट्रिशन कोच सुशील धनावडे सांगतात, 'जेव्हा आपण भरभर खातो, तेव्हा आपल्या मेंदूला सिग्नल मिळत नाही की आपले पोट भरले आहे की नाही. जेव्हा आपण हळू जेवतो, तेव्हा बॉडी आपल्याला सिग्नल देते, की पोट भरलेले आहे. यामुळे आपल्याकडून कमी कॅलरीज खाल्ल्या जातात. शिवाय पोर्शन कण्ट्रोलमध्ये राखून आपण खातो. ज्यामुळे आपले वेट लॉस होते(Does Eating Slowly Help You Lose Weight?).

रात्री झोपताना एसी नेमका कितीवर ठेवला तर वीजबिल कमी येतं? रात्रभर लावा एसी- नो टेंशन!

हळूहळू चावून अन्न खाण्याचे फायदे

- जेव्हा आपण अन्न चघळतो, तेव्हा त्याचे लहान तुकडे होतात. जेव्हा लाळ या लहान तुकड्यांसोबत मिसळली जाते. तेव्हा पुढील प्रक्रियेसाठी पोटात पाठविली जाते. मुख्य म्हणजे या प्रक्रियेत शरीराला अन्नातून मिळणारे पौष्टीक घटक मिळतात.

- अन्न चावून खाल्ल्यामुळे पाचक प्रणाली अन्न पचवण्यासाठी स्वतः तयार करते. ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचते.

- जास्त काळ अन्न चघळल्याने अधिक पोषक तत्व आणि ऊर्जा शोषण्यास शरीराला मदत मिळते.

पाकिस्तानी खवय्यांना वडापावची भुरळ! कराचीमधली तरुणी विकते इंडिअन स्ट्रीट फूड, नेटकरी म्हणाले..

- अन्न चघळणे आपल्या दातांच्या आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे दातांचा व्यायाम होतो.

- अन्न व्यवस्थित चघळल्याने आतड्यांमध्ये जीवाणू वाढण्याची धोका फारच कमी होतो.

- जर आपण वेट लॉस प्रक्रियेतून जात असाल तर, जेवल्यानंतर अवश्य शतपावली करण्यास जा. यामुळे पचनक्रिया सुधारेल.

Web Title: Does Eating Slowly Help You Lose Weight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.