Lokmat Sakhi >Social Viral > रात्री झोपताना एसी नेमका कितीवर ठेवला तर वीजबिल कमी येतं? रात्रभर लावा एसी- नो टेंशन!

रात्री झोपताना एसी नेमका कितीवर ठेवला तर वीजबिल कमी येतं? रात्रभर लावा एसी- नो टेंशन!

What temperature do you keep your AC on at night? : तुमचा खिसा आणि आरोग्य सांभाळण्यासाठी एसीचं तापमान किती ठेवावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2024 01:25 PM2024-05-13T13:25:24+5:302024-05-13T13:26:08+5:30

What temperature do you keep your AC on at night? : तुमचा खिसा आणि आरोग्य सांभाळण्यासाठी एसीचं तापमान किती ठेवावं?

What temperature do you keep your AC on at night? | रात्री झोपताना एसी नेमका कितीवर ठेवला तर वीजबिल कमी येतं? रात्रभर लावा एसी- नो टेंशन!

रात्री झोपताना एसी नेमका कितीवर ठेवला तर वीजबिल कमी येतं? रात्रभर लावा एसी- नो टेंशन!

मे महिना म्हणजे उकाड्याचा महिना (Summer Special). अनेक भागात तापमान चाळीशी पार गेला आहे. उकाड्यात आपण स्वतःला कुल करण्यासाठी पंखा किंवा एसीचा वापर करतो. यामुळे लाही लाही झालेल्या जीवाला गारवा मिळतो (AC Temperature). पण एसीचा नेमका कोणता टेम्प्रेचर शरीरासाठी फायदेशीर ठरते? बऱ्याचदा उकाड्यामुळे आपल्याला रात्रीची झोप लागत नाही. म्हणून आपण रात्रभर एसी चालू ठेवून झोपतो. पण रात्रभर एसी चालू ठेवून झोपल्याने वीजबिल जास्त येतं. एसीचं वीजबिल जास्त येऊ नये म्हणून, एसीचं टेम्प्रेचर कोणत्या डिग्रीवर ठेवावं? पाहूयात.

एसीच्या टेम्प्रेचरबद्दल माहिती देताना ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी सांगितलं, 'आरोग्याला कोणतीही हानी होऊ नये असे वाटत असेल तर, रात्रीच्या वेळेस झोपताना एसीचं टेम्प्रेचर २४ वर ठेवणं योग्य ठरू शकते. यामुळे विजेची देखील बचत होते'(What temperature do you keep your AC on at night?).

रात्री एसीचं टेम्प्रेचर २४ वर ठेवण्याचे फायदे

वीजबिलाची होते बचत

बॉडी टेम्प्रेचरसाठी एसीचं तापमान २४ डिग्रीवर ठेवणं योग्य मानले जाते. यामुळे शरीराला गरमी लागत नाही. शिवाय जास्त थंडावाही जाणवत नाही. मुख्य म्हणजे विजेची बचत होते. बऱ्याचदा एसीचा वापर करताना, विजेचा जास्त वापर होतो. पण २४ डिग्रीवर ठेवल्याने विजेचा जास्त वापर होत नाही.

एसीसोबत चालवा पंखा

चमचाभर टूथपेस्टने चमकतील छुमछुम करणारे पैंजण; पाहा वापर कसा करायचा..

एसीसोबत आपण रूममध्ये एक किंवा दोनच्या स्पीडवर पंखा चालू ठेऊ शकता. यामुळे थंड हवा रूममध्ये सर्क्युलेट होत राहील. ज्यामुळे एसीचा वापर कमी होईल, आणि विजेची बचत होईल.

रात्रभर एसी चालू ठेवण्याची गरज नाही

एसी चालू केल्यानंतर टायमर सेट करा. एसी काही तास चालल्यानंतर बंद होईल, आणि पंख्यामुळे एसीची हवा रूममध्ये सर्क्युलेट होत राहील. यामुळे खोली रात्रभर थंड राहील आणि एसीचा जास्त वापरही होणार नाही.

खिडक्या बंद ठेवा

पाकिस्तानी खवय्यांना वडापावची भुरळ! कराचीमधली तरुणी विकते इंडिअन स्ट्रीट फूड, नेटकरी म्हणाले..

एसीचे वीजबिल जास्त येऊ नये असे वाटत असेल तर, एसी चालू केल्यानंतर खिडक्या आणि दारे बंद करा. खोली पूर्णपणे पॅक करा. यामुळे खोली अधिक वेळ थंड राहील. शिवाय बाहेरची गरम हवा आत शिरणार नाही, आणि आतली थंड हवा बाहेर जाणार नाही.

सर्विसिंग करत राहा

एसीची वेळेवर सर्विसिंग करणं गरजेचं आहे. यामुळे एसी अधिक वर्ष आरामात चालेल, आणि कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

Web Title: What temperature do you keep your AC on at night?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.