Lokmat Sakhi >Social Viral > पाकिस्तानी खवय्यांना वडापावची भुरळ! कराचीमधली तरुणी विकते इंडिअन स्ट्रीट फूड, नेटकरी म्हणाले..

पाकिस्तानी खवय्यांना वडापावची भुरळ! कराचीमधली तरुणी विकते इंडिअन स्ट्रीट फूड, नेटकरी म्हणाले..

‘Pakistan’s Vada Pav Girl’: Karachi food stall by Hindu woman gains popularity for Indian street food : पाकिस्तानी वडापाव गर्लची सगळीकडे चर्चा; पाहा व्हायरल व्हिडिओ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2024 12:30 PM2024-05-13T12:30:55+5:302024-05-13T13:12:39+5:30

‘Pakistan’s Vada Pav Girl’: Karachi food stall by Hindu woman gains popularity for Indian street food : पाकिस्तानी वडापाव गर्लची सगळीकडे चर्चा; पाहा व्हायरल व्हिडिओ..

‘Pakistan’s Vada Pav Girl’: Karachi food stall by Hindu woman gains popularity for Indian street food | पाकिस्तानी खवय्यांना वडापावची भुरळ! कराचीमधली तरुणी विकते इंडिअन स्ट्रीट फूड, नेटकरी म्हणाले..

पाकिस्तानी खवय्यांना वडापावची भुरळ! कराचीमधली तरुणी विकते इंडिअन स्ट्रीट फूड, नेटकरी म्हणाले..

मुंबईकरांची (Mumbai) भूक भागवणारा वडापाव (Vadapav) कायम चर्चेत असतो. देशात अनेक ठिकाणी वडापाव मिळतो. पण आपल्याला ठाऊक आहे का, कराचीमध्ये देखील वडापाव मिळतो? वडापाव खाणारा खवय्यावर्ग सातासमुद्रापार आहे. पण पाकिस्तानामध्ये (Pakistan) देखील वडापावची लोकप्रियता वाढत चालली आहे. हे आपल्याला ठाऊक होतं का?

सध्या एका पाकिस्तानी फूड ब्लॉगरचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये पाकिस्तानातील कराचीमध्ये एक कविता नावाची तरुणी, तिच्या कुटुंबासह फूड स्टॉल चालवते. तिला सर्व प्रेमाने कविता दीदी म्हणतात. या व्हिडिओमध्ये ती आपल्या फूड स्टॉलवर इंडिअन स्ट्रीट फूड विकताना दिसत आहे. शिवाय खवय्यावर्गही आवडीने या पदार्थांचा आस्वाद लुटत आहे, व भारतीय पदार्थांचे कौतुकही करीत आहे(‘Pakistan’s Vada Pav Girl’: Karachi food stall by Hindu woman gains popularity for Indian street food).

पाकिस्तानी लोकांना भारतीय स्ट्रीट फूडची भुरळ

व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानच्या कराचीमधला आहे. पाकिस्तानी फूड ब्लॉगर करामत खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने फूड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये कविताच्या स्टॉलविषयी माहिती सांगितली आहे, व व्हिडिओ शेअर करीत लक्षवेधी कॅप्शन देखील दिलं आहे. त्याने व्हिडिओला कॅप्शन 'कविता दीदी का इंडियन खाना.. हिंदू कुटुंब वडापाव आणि पावभाजी विकतात' असं दिलं आहे.

चमचाभर टूथपेस्टने चमकतील छुमछुम करणारे पैंजण; पाहा वापर कसा करायचा..

पाकिस्तानमध्ये हा फूड स्टॉल अतिशय लोकप्रिय आहे. या फूड स्टॉलचे नाव इट एक्सप्रेस असे आहे. या फूड स्टॉलवर पाव भाजी, वडा पाव आणि समोसा या पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. विशेष म्हणजे या फूड स्टॉलवर हिंदू मुस्लीम एकत्र येऊन खातात. असं फूड ब्लॉगरनं शेअर केलं. कविताच्या स्टॉलवर येणारे लोक तेथील विविध पदार्थांचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये कविता सांगते की, 'मुंबईचा वडापाव खूप लोकप्रिय आहे आणि आता कराचीमध्ये सुद्धा लोकांना वडापाव आवडत आहे.'

नर्स ही आईच असते! परिचारिका अंजली कुलथे सांगतात २६/११चा थरार आणि...

नेटकऱ्यांनी केलं कौतुक

व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडलं असल्याचं दिसून येत आहे. एका युझरने 'ताई,भारतातून खूप सारे प्रेम आणि आदर' अशी कमेण्ट केली आहे. तर, आणखीन एका युझरने 'मी कविता दीदीने तयार केलेले पदार्थ खाल्ले आहे. खूप चविष्ट असतात.' असं म्हटलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, अनेकांनी व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Web Title: ‘Pakistan’s Vada Pav Girl’: Karachi food stall by Hindu woman gains popularity for Indian street food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.