Join us

रात्री भात खाल्ल्यानं वजन वाढतं का? पाहा काय सांगतात एक्सपर्ट, त्यानुसार टायमिंग ठरवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:25 IST

Best time to eat rice: अनेक हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, भात जर दिवसा खाल्ला तर तो चांगल्या पद्धतीनं पचन होतो आणि ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोल राहते.

Best time to eat rice: बरेच लोक असे असतात, ज्यांना वाटतं की भात खाल्ल्यानं त्यांचा लठ्ठपणा वाढतो आणि शुगर लेव्हलही बिघडते. पण मुळात भात काही आपला वैरी नसतो. फक्त तो खाण्याची योग्य वेळ आपल्याला माहीत असली पाहिजे. भात खाण्याची योग्य वेळच आपल्या वजनावर आणि आरोग्यावर प्रभाव करते. अनेक हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, भात जर दिवसा खाल्ला तर तो चांगल्या पद्धतीनं पचन होतो आणि ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोल राहते.

दुपारी भात खाण्याचे फायदे

आपल्या शरीराचं मेटाबॉलिज्म आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी दिवसा सगळ्यात चांगली आणि जास्त सक्रिय राहते. दुपारी भात खाल्ला तर त्याला शरीर एनर्जीमध्ये बदलतो. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढत नाही आणि वजन कंट्रोल करण्यासही मदत मिळते.

रात्री भात खाण्याचे नुकसान

सायंकाळी किंवा रात्री शरीराचं मेटाबॉलिज्म स्लो होतं. अशात भातासारखे कार्बोहायड्रेट-रिच फूड खाल्ल्याने ब्लड शुगर वेगानं वाढते आणि फॅट स्टोरेजही जास्त होतं. याच कारणानं रात्री भात खाल्ल्यानं वजन वाढू शकतं आणि पचनासंबंधी समस्याही होऊ शकतात.

डायबिटीसच्या रूग्णांनी कसा खावा भात?

जर आपल्याला डायबिटीस असेल तर भाताची निवड महत्वाची ठरते. आपण  ब्राउन, रेड, ब्लॅक किंवा बासमती भाताची निवड करा.

भात शिजवून थंडा करा आणि नंतर गरम करा. यानं रेजिस्टेंट स्टार्च वाढतो. ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळते.

भात डाळी, भाज्यांसोबत खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हल स्पाइक्स कमी होते.

फायबरमुळे ब्लड शुगर कंट्रोल राहते आणि पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. अशात भाज्या आधी खाव्यात.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स