Join us
Daily Top 2Weekly Top 5

रात्री जेवणानंतर फळं खाल्ल्यानं वजन वाढतं का? वजन कंट्रोलमध्ये हवं तर फळं कधी-किती खावीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 23:47 IST

काहीजणांच्या मते फळांचे सेवन केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. फळं खाल्ल्यानं शरीरावर काय परिणाम होतो समजून घेऊ.

आजकाल वजन कमी  (Weight Loss) करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. काहीजण डाएट प्लॅन फॉलो करतात तर काहीजण जीममध्ये घाम गाळतात. अशा स्थितीत रोज रात्री फळं खाणं चांगलं ठरतं का असा प्रश्न उपस्थित होतो. काहीजणांच्या मते फळांचे सेवन केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. फळं खाल्ल्यानं शरीरावर काय परिणाम होतो समजून घेऊ. (Does eating fruit after dinner make you gain weight)

 रात्री फळं खाल्ल्यानं वजन वाढतं का?

फळांमध्ये नॅच्युरल शुगर म्हणजे फ्रक्टोज, फायबर्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. यात कॅलरीज कमी असतात आणि पोषण जास्त असते.  फळ खाल्ल्यानं वजन वाढण्यास मदत होते. पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त फळं खाल्ली तर तब्येतीचं नुकसान होऊ शकतं. खासकरून गोड फळं जसं की आंबा, चिकू, द्राक्ष यांसारख्या फळांमुळे शरीरात एक्स्ट्रा कॅलरीज जमा होतात. जर या  कॅलरीज वापरल्या  गेल्या नाहीत तर हळूहळू वजन वाढण्याचा धोका असतो.

रात्री गोड खाल्ल्यास शरीर कसे काम करते?

 रात्री आपल्या शरीराचे मेटाबॉलिझ्म दिवसाच्या तुलनेत थोडं संथ होते कारण शरीर आरामाच्या स्थितीत असते. अशा स्थितीत जास्त गोड पदार्थ खाल्ल्यानं पचनावर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही झोपण्याआधी फळांचे सेवन केले तर पोटात जड वाटणं, गॅस होणं, शुगर लेव्हल अचानक वाढणं अशा समस्या उद्भवतात तर झोपेच्या गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो.

पूर्वीची लोक १०० वर्ष कशी जगायची? ठणठणीत राहण्याचं आणि नितळ त्वचेचं गुपित काय- पाहा

रात्री फळं खाणं चुकीचं नाही पण तुम्ही कोणती फळं खाता आणि किती प्रमाणात खाता यावर ते अवलंबून असते. जर तुम्ही रात्री हलका आहार घेतला असेल तर एक छोटी वाटी पपई, पेरू यांसारखे फायबर्सयुक्त फळं खाऊ शकता. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि कॅलरीजही जास्त घेतल्या जात नाहीत. फळं पोट भरतात पण कमी कॅलरीज देतात, फायबर्समुळे बराचवेळ भूक लागत नाही.

झटपट साजूक तूप करण्याची खास ट्रिक! रविने न घुसळता-मिक्सरही न वापरता तूप करण्याची युक्ती

जर रात्री तुम्हाला गोड खावंसं वाटत असेल तर चॉकलेट ऐवजी इतर फळं चांगला पर्याय आहेत. झोपण्याच्या कमीत कमी १ ते २ तास आधी फळं खा, जास्त गोड फळं खाऊ नका. जर तुम्हाला डायबिटीस किंवा पचनाच्या समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. फळं मुख्य अन्न नाही तर स्नॅक्सच्या स्वरूपात खा.

English
हिंदी सारांश
Web Title : Eating fruits after dinner: Does it cause weight gain?

Web Summary : Eating fruits at night can affect weight. While fruits offer nutrients and fiber, excessive consumption, especially of sweet varieties, may lead to weight gain if calories aren't burned. It's best to eat fruits 1-2 hours before bed in moderation.
टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स