सध्या वजन वाढीची समस्या सगळ्यांनाच सतावते आहे. आजकाल बहुतेकजण आपले वाढते वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत असतात. वजन कमी करण्यासाठी सगळेचजण आपापल्या परीने काही ना काही उपाय करत असतात. वजन कमी करण्यासाठी कुणी जिम, योगा, झुंबा यांसारखे अनेक एक्सरसाइजचे प्रकार करतात तर कुणी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट (Drinking cold water leads to weight gain Truth or Myth) फॉलो करतात. वजन कमी करण्याच्या या प्रवासांत आपण एक्सरसाइज, डाएट सोबतच अनेक उपाय देखील फॉलो करतो. जसे की, तेलकट - तूपकट पदार्थ न खाणे, जंकफूड न खाणे, गोड पदार्थ खाणे कमी करणे यांसारख्या अनेक गोष्टींवर आपण स्वतःच निर्बंध लावतो(Drinking cold water leads to weight gain Truth or Myth).
यासारख्या अनेक गोष्टींमध्ये आपण बरेचदा हे देखील ऐकतो की, फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्याने वजन वाढते. यासाठी आपण वजन कमी करताना थंड पाणी पिणे टाळतो. परंतु खरंच थंड पाणी प्यायल्याने वजन वाढतं असेल का ? असा प्रश्न आपल्याला पडतो. इतकेच नाही तर वजन कमी करण्यासाठी नेहमी कोमट किंवा गरम पाणी पिण्याचाच सल्ला दिला जातो. थंड पाणी प्यायल्याने खरंच वजन वाढते की नाही यातील नेमकं काय खरं, खोटं ते पाहूयात. getsetfit या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये फिटनेस कोच प्रियांक मेहता यांनी थंड पाणी खरोखरच तुमचे वजन वाढवते की नाही, याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
१. थंड पाणी प्यायल्याने वजन वाढतं का ?
फिटनेस प्रशिक्षक प्रियांक मेहता यांच्या म्हणण्यानुसार, थर्मोजेनेसिस ही एक महत्त्वाची शारीरिक प्रक्रिया आहे जी आपल्या शरीरात उष्णता निर्माण करते. शरीराचे योग्य तापमान राखणे कायम आवश्यक असते. याशिवाय, जेव्हा आपले शरीर व्यायामादरम्यान शरीरात उष्णता निर्माण करते तेव्हा आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात. तसेच, अन्नपचनासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, ज्यासाठी उष्णता निर्माण करणे आवश्यक असते.
परंतु जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा आपले शरीर, आपल्या शरीराच्या आतील भागाचे तापमान योग्य प्रमाणांत सेट करण्यासाठी या थंड पाण्यातून आलेल्या कॅलरीज बर्न करते. आपले शरीर आतून गरम आणि उबदार रहाण्यासाठी तसेच शरीराचे तपमान योग्य पद्धतीने सेट होण्यासाठी थंड पाण्यातील कॅलरीज बर्न करते. यामुळे असे सिद्ध होते की, थंड पाणी प्यायल्याने वजन वाढत नाही याउलट आपल्या शरीरातील जास्तीच्या कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
डार्क चॉकलेट खाऊन वजन करा झटपट कमी, वेटलॉस करण्याचा गोड उपाय - खा बिंधास्त...
स्वत:ला लावा या ७ सोप्या सवयी, जगणंच बदलून जाईल कायमचं! कमवा भरपूर पैसा आणि आनंद...
२. थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक ?
थंड पाणी पिण्यामुळे आपले वजन वाढत नाही हे सिद्ध झाले असले तरीही, थंड पाणी फार मोठ्या प्रमाणावर पिणे किंवा फक्त थंडच पाणी पिणे यामुळे आपल्याला इतर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जसे की, सर्दी, खोकला, घसा बसणे किंवा खराब होणे, पोटदुखी, डोकेदुखी, ब्लोटिंग यांसारख्या शारीरिक समस्या सतावू शकतात. यासाठीचे थंड पाणी योग्य प्रमाणांत पिणे आवश्यक आहे.