Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सकाळी झोपेतून लवकर उठवतच नाही- दिवसभर अंगात आळस? १ उपाय- दिवसभर एनर्जी कमी होणार नाही

सकाळी झोपेतून लवकर उठवतच नाही- दिवसभर अंगात आळस? १ उपाय- दिवसभर एनर्जी कमी होणार नाही

Do You Wake Up Feeling Tired?: सकाळी उठल्यानंतरही फ्रेश वाटत नसेल, संपूर्ण दिवस आळसात जात असेल तर तुमचं नेमकं काय चुकत आहे, याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिलेली ही माहिती...(health tips by Rujuta Divekar to feel energetic in the morning)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2024 15:30 IST2024-11-28T11:56:26+5:302024-11-28T15:30:57+5:30

Do You Wake Up Feeling Tired?: सकाळी उठल्यानंतरही फ्रेश वाटत नसेल, संपूर्ण दिवस आळसात जात असेल तर तुमचं नेमकं काय चुकत आहे, याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिलेली ही माहिती...(health tips by Rujuta Divekar to feel energetic in the morning)

Do you wake up feeling tired? health tips by rujuta divekar to feel energetic in the morning | सकाळी झोपेतून लवकर उठवतच नाही- दिवसभर अंगात आळस? १ उपाय- दिवसभर एनर्जी कमी होणार नाही

सकाळी झोपेतून लवकर उठवतच नाही- दिवसभर अंगात आळस? १ उपाय- दिवसभर एनर्जी कमी होणार नाही

Highlightsऋजुता यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी काही लोकांना कायम आळसावल्यासारखं, थकल्यासारखं का वाटतं याचं एक खास कारण सांगितलं आहे.

आपल्या पाहण्यात काही लोक असे असतात जे दिवसभर खूप ॲक्टीव्ह असतात. सकाळी लवकर उठतात तरीही एकदम फ्रेश असतात. त्यांचा दिवस लवकर सुरू होतो आणि तरीही रात्री बऱ्याच वेळपर्यंत ते खूप उत्साहाने सगळी कामं उरकत असतात. आपल्याला असं का जमत नाही किंवा आपल्याला असा कायम थकवा, आळस का आलेला असतो, असं त्या उत्साही मंडळींकडे पाहून अनेकांना वाटतं. सकाळी उशिरा जाग येऊनही फ्रेश वाटत नाही (Do You Wake Up Feeling Tired?). पुन्हा झोपावं वाटतं, एवढंच नाही तर सगळा दिवसही खूपच आळसात आणि रटाळ जातो. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर तुमचं नेमकं काय चुकत आहे, याविषयी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिलेली ही माहिती एकदा बघाच..(health tips by Rujuta Divekar to feel energetic in the morning)

 

सकाळी उठल्यानंतरही फ्रेश वाटत नाही?

ऋजुता यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी काही लोकांना कायम आळसावल्यासारखं, थकल्यासारखं का वाटतं याचं एक खास कारण सांगितलं आहे.

९० टक्के लोक 'ही' चूक करतात म्हणूनच त्यांना मिळत नाही डाळ-वरणातलं प्रोटीन! डाळी खायच्या तर..

त्या म्हणतात की आपण दिवसभर किती उत्साही, फ्रेश राहू शकतो हे आपल्या रात्रीच्या झोपेवर अवलंबून असतं. जर तुम्ही रात्रीची झोप व्यवस्थित घेत असाल तर तुम्हाला सकाळी फ्रेश जाग येते. पुन्हा झोपावंसं वाटत नाही. पण रात्रीची झोप व्यवस्थित लागणं हे तुम्ही रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ किती प्रमाणात खात आहात यावर अवलंबून असतं.

 

शिवाय रात्रीचं जेवण हे झोपण्याच्या ३ तास आधी होणं गरजेचं आहे. रात्री जेवढी भूक असेल तेवढंच खा. पोटाच्यावर खाणं पुर्णपणे टाळा. शिवाय जे काही खात आहात ते अन्न सकस, पौष्टिक हवं. ऋजुता असंही म्हणतात की तुमचं रात्रीचं जेवण कसं होत आहे,

तुम्ही घेत आहात ते पेरू किडके तर नाही ना? पिकलेले गोड पेरू खरेदी करण्यासाठी ३ टिप्स

हे तुम्ही दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत काय खाता, त्यावरही अवलंबून असतं. बऱ्याच लोकांना दुपारी ४ ते ६ यावेळेत खूप भूक लागते. भुकेच्या नादात मग ते खूप हेवी पदार्थ खातात. त्याचा परिणाम रात्रीच्या जेवणावर होतो. रात्रीचं जेवण व्यवस्थित झालं नाही तर झोप चांगली लागत नाही. आणि साहजिकच झोप चांगली झाली नाही तर सकाळी फ्रेश जाग येत नाही. त्यामुळे सायंकाळचा नाश्ता किंवा स्नॅक्स आणि रात्रीचं जेवण या दोन गोष्टी व्यवस्थित सांभाळा, असं ऋजुता सांगत आहेत. 


 

Web Title: Do you wake up feeling tired? health tips by rujuta divekar to feel energetic in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.