Fat Burning Curd : हिवाळा संपला की, जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यात वजन कमी करण्याच्या मागे लागलेले असतात. कारण या दिवसातील वातावरण वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतं. लोक जिम, डाएट आणि वेगवेगळे डिटॉक्स ट्रेंड्स फॉलो करू लागतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, उन्हाळ्यात तुम्ही जास्त मेहनत न घेताही वजन कमी करू शकता. यासाठी किचनमधील काही गोष्टी तुमची मदत करतात. दही यात सगळ्यात महत्वाचं ठरतं. जर त्यात काळं मीठ आणि काळी मिरीची पूड (How to eat curd to burn fat) टाकून खाल तर शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट हतं आणि चरबी कमी होण्याची नॅचरल प्रोसेस सुरू होते.
उन्हाळ्यात वजन कमी करण्याचा हा एक जबरदस्त उपाय आहे. महत्वाची बाब म्हणजे या पद्धतीनं दही खाल तर फक्त वजन कमी होतं असं नाही तर पचनक्रिया सुधारते, भूक कंट्रोल होते आणि शरीर आतून स्वच्छ होतं. दह्यामधील प्रोटीन आणि प्रोबायोटिक्ससोबत काळं मीठ आणि काळी मिरी एकत्र होतात. हे एक सुपरफूड कॉम्बिनेशन आहे. याचे काय काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.
भूक कंट्रोल आणि बॉडी डिटॉक्स
दह्यात काळं मीठ आणि काळी मिरीची पूड टाकून खाल्ल्यास शरीर आतून स्वच्छ करण्यास मदत मिळते. म्हणजे शरीरात जमा झालेले विषारी तत्व बाहेर पडतात. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या जसे की, गॅस, अॅसिडिटी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत मिळते.
दह्याचे फायदे
दही एक हाय प्रोटीन आणि प्रोबायोटिक फूड आहे, जे पचन तंत्र सुधारण्यात आणि मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत करतं. दही नियमित खाल्ल्यानं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, ज्यामुळे तुम्ही जास्त अनहेल्दी स्नॅकिंग कमी खाता. तसेच यातील अॅसिडमुळे चरबी बर्न होण्यास मदत मिळते.
काळं मीठ आणि काळी मिरीची कमाल
काळ्या मिठातील मिनरल्स शरीर आतून साफ करण्यास मदत करतात आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य ठेवतात. तसेच काळी मिरीतील पायपरिन तत्व फॅट सेल्स तोडतं आणि त्यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं.
कसं खाल?
शरीरात जमा झालेली चरबी तुम्हाला कमी करायची असेल तर एका वाटीमध्ये ताजं दही घ्या, त्यात चिमुटभर काळं मीठ आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड टाका. हे दही तुम्ही दुपारच्या जेवणाआधी किंवा सकाळी उपाशीपोटी खाऊ शकता. हवं असेल तर यात तुम्ही थोडा लिंबाचा रसही टाकू शकता. ज्यामुळे टेस्टही वाढेल आणि प्रभावही वाढेल.
काय काळजी घ्याल?
काळं मीठ आणि काळी मिरीची पूड टाकलेलं दही खूप जास्त खाऊ नका. यानं पोटात जळजळ होऊ शकते. हाय बीपी किंवा अल्सरच्या रूग्णांनी दही खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.