Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सब्जा की चिया सीड्स? वेटलॉस आणि तब्येतीसाठी फायद्याचं काय, खिशाला परवडतं काय?

सब्जा की चिया सीड्स? वेटलॉस आणि तब्येतीसाठी फायद्याचं काय, खिशाला परवडतं काय?

chia seeds & sabja seeds which is better for weight loss : chia seeds or sabja which is better for weight loss : चिया सीड्स की सब्जा... वेटलॉससाठी नेमकं काय जास्त फायदेशीर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2026 16:48 IST2026-04-13T16:26:38+5:302026-04-13T16:48:06+5:30

chia seeds & sabja seeds which is better for weight loss : chia seeds or sabja which is better for weight loss : चिया सीड्स की सब्जा... वेटलॉससाठी नेमकं काय जास्त फायदेशीर ?

chia seeds or sabja which is better for weight loss chia seeds & sabja seeds which is better for weight loss | सब्जा की चिया सीड्स? वेटलॉस आणि तब्येतीसाठी फायद्याचं काय, खिशाला परवडतं काय?

सब्जा की चिया सीड्स? वेटलॉस आणि तब्येतीसाठी फायद्याचं काय, खिशाला परवडतं काय?

वाढतं वजन ही आजकाल अनेकांची खूप मोठी समस्या बनली आहे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण वेगवेगळे डाएट ट्रेंड्स फॉलो करतो. वेटलॉस करून फिटनेस उत्तम आणि कायम मेंटेन्ड ठेवण्यासाठी 'सुपरफूड्स' खूप महत्वाचे असतात. अशातच, विशेषतः 'सुपरफूड' म्हणून प्रसिद्ध असलेले चिया सीड्स आणि सब्जा हे दोन पदार्थ अतिशय महत्वाचे मानले जातात. वजन कमी करण्यासाठी कुणी चिया सीड्स खातात तर कुणी सब्जाचं बी...दोन्हीही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जात असले तरी नेमकं कोणतं जास्त परिणामकारक आहे, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतोच...(chia seeds & sabja seeds which is better for weight loss).

चिया सीड्स (Chia Seeds) आणि सब्जा (Sabja Seeds) दिसायला हे दोन्ही दाणे जवळपास सारखेच असतात. परंतु दोन्ही दिसायला जरी सारखेच असले, तरी त्यांचे गुणधर्म, खाण्याची पद्धत आणि शरीरावर (chia seeds or sabja which is better for weight loss) होणारे परिणाम पूर्णपणे वेगळे असतात. वजन कमी करण्यासाठी, चिया सीड्स आणि सब्जाचं बी या दोघांपैकी नेमकं  कोणामध्ये 'फॅट बर्न' करण्याची ताकद जास्त आहे...'वेटलॉस' करण्यासाठी नेमकं काय खाणं जास्त फायदेशीर ठरेल? चिया सीड्स की सब्जा...या दोन्ही सुपरफूड्समधील फरक, त्यांचे फायदे आणि वजन कमी करण्यासाठी कोणतं बीज सर्वात जास्त फायदेशीर आहे ते पाहूयात. 

वजन कमी करण्यासाठी सब्जा खाण्याचे फायदे... 

१. भरपूर फायबर :- सब्जामध्ये सॉल्युबल फायबर मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वेळी - अवेळी होणारी खाण्याची इच्छा / क्रेविंग्सचे प्रमाण कमी होते.

२. पचनसंस्थेत सुधारणा :- सब्जा पोटाला थंडावा देतो आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतो. जर पचनक्रिया सुरळीत असेल, तर वजन कमी करण्यास मोठी मदत मिळते.

३. शरीरातील उष्णता कमी करणे :- वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अनेकदा शरीरातील उष्णता वाढते. सब्जा ही उष्णता नैसर्गिकरित्या कमी करून शरीराला शांत ठेवण्यास मदत करतो.

दीपिका पादूकोण ते आलिया भट-रोज सकाळी उपाशी पोटी ‘हे’ काय खास पितात पाहा, चेहऱ्यावरच्या ग्लोचं सिक्रेट...

वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स खाण्याचे फायदे... 

१. फायबरचा उत्तम स्रोत :- चिया सीड्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.

२. ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स :- चिया सीड्समध्ये मुबलक प्रमाणात ओमेगा-३ असते, जे मेटाबॉलिजम वेगवान करण्यास आणि शरीरातील चरबी जाळण्याच्या  प्रक्रियेला गती देण्यास मदत करते.

३. प्रोटीनचा खजिना :- यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात, जी स्नायूंच्या बांधणीसाठी उपयुक्त ठरतात आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी अत्यंत परिणामकारक असतात.

४. एनर्जी बूस्टर :- चिया सीड्स शरीराला हळूहळू ऊर्जा पुरवतात, ज्यामुळे वर्कआउट किंवा व्यायामादरम्यान तुम्हाला अधिक उत्साही आणि ॲक्टिव्ह वाटते.

कापसापेक्षाही मऊ - लुसलुशीत दहीवडे! पिठात कालवा १ पदार्थ - पाहुणेही विचारतील रेसिपी... 

चिया सीड्स की सब्जा...नक्की जास्त फायदेशीर काय?

सब्जा आणि चिया सीड्स हे दोन्ही वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. जर तुमचे मुख्य उद्दिष्ट पोट भरलेले असणे आणि शरीराला थंडावा देणे हे असेल, तर सब्जाचं बी अत्यंत फायदेशीर ठरते मात्र, जर तुम्ही नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करत असाल आणि स्नायूंना पोषण देऊन वजन कमी करायचे असेल, तर चिया सीड्स हा एक उत्तम पर्याय आहे. सर्वात चांगला मार्ग म्हणजे तुमच्या शरीराची गरज आणि ऋतूंनुसार या दोन्ही बियांचा योग्य पद्धतीने तुमच्या आहारात समावेश करणे.

चिया सीड्स, सब्जाचं बी नेमकं कसं खावं ? 

१. सब्जा :- एक चमचा सब्जा एक ग्लास पाण्यात भिजत घाला आणि १५ मिनिटांनंतर तो व्यवस्थित फुलून आल्यावरच खा. यामध्ये लिंबू आणि मध मिसळून तुम्ही एक उत्तम 'डिटॉक्स ड्रिंक' तयार करू शकता.

२. चिया सीड्स :- चिया सीड्सचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी स्मूदी, दही किंवा ओट्समध्ये मिक्स करून खाऊ शकता.

३. दिवसभरात १ ते २ चमचे चिया सीड्स किंवा सब्जाचं बी खाणं शरीरासाठी पुरेसं असतं. हे खाताना दिवसभर भरपूर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ते शरीरातील पाणी शोषून घेतात.

Web Title : चिया या सब्जा: वजन घटाने के लिए क्या है बेहतर?

Web Summary : चिया और सब्जा बीज वजन घटाने के लिए अलग-अलग फायदे प्रदान करते हैं। सब्जा शरीर को ठंडा करता है और पाचन में मदद करता है, जबकि चिया चयापचय और मांसपेशियों के निर्माण को बढ़ावा देता है। अपनी आवश्यकताओं के अनुसार चुनें और बेहतर परिणाम के लिए आहार में शामिल करें।

Web Title : Chia or Sabja Seeds: Which is better for weight loss?

Web Summary : Chia and sabja seeds offer unique weight loss benefits. Sabja cools the body and aids digestion, while chia boosts metabolism and muscle building. Choose based on your needs and workout routine, incorporating either into your diet for optimal results.