Join us
Daily Top 2Weekly Top 5

तूप खाणं सोडलंय? लठ्ठ असाल तरीही रोज खा 'इतके' चमचे तूप; हृदयविकाराचा धोका टळून होईल वेटलॉसही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2026 13:17 IST

can obese people eat ghee : should overweight people avoid ghee : वजन आधीपासूनच जास्त असेल तर साजूक तूप खाण्याची योग्य पद्धत पाहा...

भारतीय स्वयंपाकात साजूक तुपाला विशेष असे महत्व आहे. आपल्याकडे जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण विविध पदार्थांमध्ये आवर्जून तूप घालतो आणि त्याचा आस्वाद घेतो. साजूक तुपाने पदार्थांची चव दुपटीने वाढते, तसेच योग्य प्रमाणांत तूप खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचे असते.  अनेक घरांमध्ये तर साजूक तुपाचा वापर अगदी दररोज केला जातो; तुपाशिवाय त्यांचा आहारच जणू अपूर्ण असतो. मात्र, तुपात फॅटस असते हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. अशा परिस्थितीत, ज्यांचे वजन आधीच जास्त आहे किंवा जे जाड आहेत, त्यांच्या मनात नेहमी एक प्रश्न येतो - "जास्त वजन असलेल्या व्यक्तींनी तूप खाणे सुरक्षित आहे? आणि याचा त्यांच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो?" वजन वाढलं की सर्वप्रथम आपण काय बंद करतो? तर साजूक तूप! अनेकांना वाटतं की तूप खाल्ल्यामुळे चरबी वाढते आणि वजन झपाट्याने वाढतं. त्यामुळे डाएट करताना तूप पूर्णपणे टाळलं जातं. पण खरंच साजूक तूप खाणं वजन वाढवणारं असतं का? की त्यामागे काही गैरसमज आहेत?(should overweight people avoid ghee).

आयुर्वेदात साजूक तूपाला ‘सुपरफूड’ मानलं गेलं आहे. योग्य प्रमाणात तूप खाल्ल्यास पचन सुधारतं, शरीराला आवश्यक फॅट्स मिळतात आणि मेटाबॉलिझमही सुधारू शकतो, असं तज्ज्ञ सांगतात. मग वजन वाढेल या भीतीने तूप पूर्णपणे बंद करणं कितपत योग्य आहे? या विषयावर सविस्तर माहिती घेण्यासाठी 'दिव्या गांधी डाएट अँड न्यूट्रिशन क्लिनिक'च्या डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट 'दिव्या गांधी' यांनी एका संकेतस्थळाला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीनुसार, वजन जास्त (can obese people eat ghee) असताना साजूक तूप खाणं योग्य की अयोग्य, किती प्रमाणात खावं आणि त्याचे शरीरावर नेमके काय परिणाम होतात ते पाहूयात... 

वजन जास्त असेल तर साजूक तूप खाणं योग्य की अयोग्य ? 

साजूक तुपामध्ये, व्हिटॅमिन ई, के आणि ए सारखी अनेक महत्त्वाची पोषक तत्वे भरपूर प्रमाणांत असतात. तज्ज्ञांच्या मते, एक चमचा तुपात सुमारे १२० ते १३० इतक्या कॅलरीज आणि १४ ते १५ ग्रॅम फॅट असते. एका सुदृढ व्यक्तीसाठी तूप हा आहारातील एक उत्तम पर्याय मानला जातो.

डायबिटीसमध्ये भात खा बिंधास्त, 'नो टेन्शन'! 'या' स्मार्ट पद्धतीने भात खाल्ला तर ना शुगर वाढेल ना वजन....

तुम्ही ५ गोष्टी करत नसाल तर कडक डाएट आणि भरमसाठ व्यायाम करुनही नाही होणार वेटलॉस!

डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट 'दिव्या गांधी' यांच्या मते, लठ्ठपणा असलेल्या व्यक्ती देखील तूप खाऊ शकतात, परंतु त्याचे प्रमाण अत्यंत मर्यादित असणे खूप गरजेचे असते. त्यांनी तुपाचा समावेश आपल्या संतुलित आहारामध्ये करावा. अशा व्यक्तींसाठी संपूर्ण दिवसात फक्त १ ते २ चमचे तूप खाणे पुरेसे आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात तूप घेणे आरोग्यासाठी योग्य नाही. यामुळे डेली कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका कायम राहतो.

डायबिटीस होईल किंवा शुगर वाढेल म्हणून उपाशी राहू नका, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ सुपरफूड्स....

NCBI (National Institutes of Health) मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, जर साजूक तूप खाण्याचे प्रमाण आपल्या एकूण कॅलरीजच्या १०% पेक्षा कमी ठेवले, तर त्याचा कोलेस्ट्रॉल पातळीवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. अहवालात असेही नमूद केले आहे की, मर्यादित प्रमाणात साजूक तूप खाल्ल्याने शरीरातील HDL (Good Cholesterol) ची पातळी राखण्यास किंवा ती सुधारण्यास मदत होऊ शकते.

वजन आधीपासूनच जास्त असेल तर साजूक तूप खाण्याची योग्य पद्धत... 

ज्या व्यक्तींचे वजन जास्त आहे किंवा लठ्ठपणा असेल तर, साजूक तूप खाताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. तज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणा असलेल्या लोकांनी दिवसाला फक्त १ ते २ चमचे तूप खावे. जर यापेक्षा जास्त प्रमाणात आणि दीर्घकाळापर्यंत तुपाचा आहारात समावेश केला, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. प्रमाणाबाहेर तूप खाल्ल्याने शरीरातील 'बॅड कोलेस्ट्रॉल' (LDL) ची पातळी वाढू शकते. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे हृदयविकार (Heart Disease) आणि स्ट्रोक (Stroke) सारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो. तूप खाणे बंद करण्याची गरज नाही, मात्र वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

योग्य प्रमाणांत साजूक खाण्याचे फायदे... 

१. चयापचय क्रियेचा वेग वाढतो :- साजूक तुपामध्ये 'मिडीयम-चेन ट्रायग्लिसराइड्स' (MCTs) असतात. हे घटक शरीरातील फॅटचे लगेच ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करतात. याचाच अर्थ असा की, जेव्हा आपण मर्यादित प्रमाणात साजूक तूप खातो, तेव्हा त्याने लठ्ठपणा वाढत नाही, तर उलट आपल्या मेटाबॉलिज्मला बूस्ट मिळतो. यामुळे शरीरातील कॅलरीज जाळण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होते.

२. पचनशक्तीत सुधारणा :- बरेचदा आपल्याला वारंवार बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या तक्रारी सतावतात. याचे मुख्य कारण म्हणजे संतुलित आहाराचा अभाव, ज्यामुळे वजन अधिक वाढते. मात्र, मर्यादित प्रमाणात साजूक तूप खाल्ल्यास पचनाच्या समस्या कमी होतात. तुपामुळे पचनसंस्था सुलभ होते आणि अन्नातील पोषक तत्वे शोषून घेण्याची शरीराची क्षमताही वाढते.

३. कमी ग्लायसेमिक इंडेक्स :- जेव्हा आपण साजूक तूप, चपाती किंवा भात यांसारख्या कर्बोदकांमधे (Carbs) मिसळून खातो, तेव्हा त्या अन्नाचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' नियंत्रणात राहतो. याचा अर्थ असा की, अन्नपदार्थांत तुपाचा समावेश केल्यामुळे आपली ब्लड शुगर एकदम अचानकपणे वाढत नाही. रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहिल्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Eat Ghee Daily for Weight Loss and Heart Health: Expert Advice

Web Summary : Despite being overweight, consuming 1-2 teaspoons of ghee daily can aid weight loss and heart health, says nutritionist Divya Gandhi. Ghee boosts metabolism, improves digestion, and helps control blood sugar levels when eaten in moderation, as it contains beneficial fats and vitamins.
टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स