उन्हाळ्याच्या दिवसांत वातावरणातील तापमानात वाढ होते. अशावेळी शरीराला थंड ठेवण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करावा ज्यामुळे शरीराला आतून गारवा मिळतो. किचनमधील २ सुपर ड्रिंक असे आहेत जे उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वच लोक आवडीनं पितात. बऱ्याच लोकांना उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त प्रमाणात घाम येतो. (Buttermilk Vs Lassi What Is Best For Health)
घामामुळे शरीरातील आवश्यक मिनरल्स कमी होऊ लागतात. घामाद्वारे निघणारे इलेक्ट्रोलाईट्स पुन्हा शरीरात येण्यासाठी काही पदार्थांचा समावेश आवर्जून करावा. उन्हाळ्याच्या दिवसांत ताक प्यावं की लस्सी असा प्रश्न अनेकांना पडतो. या दोन्हींच्या फायद्यांमधला फरक समजून घेऊ. (Buttermilk Or Lassi What Is Healthier For Body In Summer)
ताक की लस्सी काय जास्त फायदेशीर (Buttermilk Or Lassi What Is Healthier For Body In Summer)
ताक
ताक उन्हाळ्यासाठी एक हलकं आणि रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. ताक दह्यापासून तयार होतं पण यात पाणी मिसळून पातळ केलं जातं. जेणेकरून ते सहज पचू शकेल. ताकात बरेच प्रोबायोटीक्स असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त तुम्ही यात मीठ, जीरं, पुदिना मिसळू शकता ज्यामुळे शरीराला कुलिंग इफेक्ट मिळतो. ताक शरीराला गारवा देते, ताकामुळे डिहाड्रेशनपासून बचाव होतो, उन्हाळ्याच्या दिवसांत ताक प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते. ताक लोक कॅलरीयुक्त असल्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.
लस्सी
लस्सी दह्यापासून तयार केला जाणारा आहे घट्ट आणि क्रिमी पदार्थ आहे. जो उत्तर भारतात खूप लोकप्रिय आहे. गोड आणि खारट अशा दोन्ही प्रकारच्या लस्सी उन्हाळ्यात प्यायल्या जातात. यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसंच लस्सी शरीराला ताकद आणि एनर्जी देण्यास मदत करते. लस्सी शरीराला इंस्टट एनर्जी देते. लस्सी उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला गारव देते. लस्सी हे एक हेवी ड्रिंक आहे जे दीर्घकाळ भूक लागू देत नाही.
ताक की लस्सी काय उत्तम ठरतं?
जर तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांत पचनासाठी उत्तम ड्रिंक हवं असेल तर तुम्ही ताक पिऊ शकता. जर तुम्हाला लवकर एनर्जी हवी असेल तर तुम्ही लस्सी पिऊ शकता. ज्यामुळे डायजेशन चांगले राहते तसंच हायड्रेशनसाठी ताक उत्तम ठरतं. एनर्जी आणि चवीसाठी लस्सी उत्तम ठरते. उन्हाळ्याच्या दिवसांत फिट,फ्रेश राहण्यासाठी ताक आणि लस्सी दोन्ही उत्तम पर्याय आहेत. तुमच्या शरीराच्या गरजेनुसार तुम्ही ताक किंवा लस्सीची निवड करू शकता.
Web Summary : Buttermilk and lassi are refreshing summer drinks. Buttermilk aids digestion and hydration with fewer calories. Lassi provides instant energy and satiety. Choose based on your needs.
Web Summary : छाछ और लस्सी गर्मियों के ताज़ा पेय हैं। छाछ पाचन और जलयोजन में मदद करता है और इसमें कम कैलोरी होती है। लस्सी तुरंत ऊर्जा और तृप्ति प्रदान करती है। अपनी आवश्यकताओं के अनुसार चुनें।