Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > काळे की पांढरे- हिवाळ्यात कोणते तीळ खाणं जास्त फायद्याचं? तीळ खाताना लक्षात घ्या १ महत्त्वाची गोष्ट 

काळे की पांढरे- हिवाळ्यात कोणते तीळ खाणं जास्त फायद्याचं? तीळ खाताना लक्षात घ्या १ महत्त्वाची गोष्ट 

Health Tips About Sesame: काळे तीळ आणि पांढरे तीळ यांच्यापैकी कोणते तीळ खाणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं, याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती...(black sesame or white sesame which one is more healthy?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2026 16:21 IST2026-01-15T16:20:20+5:302026-01-15T16:21:22+5:30

Health Tips About Sesame: काळे तीळ आणि पांढरे तीळ यांच्यापैकी कोणते तीळ खाणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं, याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती...(black sesame or white sesame which one is more healthy?)

black sesame or white sesame which one is more healthy, health benefits of eating black sesame and white sesame  | काळे की पांढरे- हिवाळ्यात कोणते तीळ खाणं जास्त फायद्याचं? तीळ खाताना लक्षात घ्या १ महत्त्वाची गोष्ट 

काळे की पांढरे- हिवाळ्यात कोणते तीळ खाणं जास्त फायद्याचं? तीळ खाताना लक्षात घ्या १ महत्त्वाची गोष्ट 

Highlights तुमच्या शरीराच्या गरजेनुसार तुम्ही कोणते तीळ खायला हवे हे ठरवा आणि ते नियमितपणे खा. 

सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि त्यातही मकर संक्रांतीचा सण नुकताच होऊन गेला आहे. त्यामुळे या दिवसांत सध्या घरोघरी तीळ आहेत. मकर संक्रांत ते रथसप्तमी या काळात घरोघरी तिळाचे लाडू, तिळगुळाच्या वड्या, तिळगुळाच्या पोळ्या केल्या जातात. त्यानंतर मात्र आपण तीळ खाणं पुर्णपणे विसरून जातो. पण खरंतर तीळ आपल्या आहारात नेहमीच असायला हवे. कारण ते खूप जास्त पौष्टिक असतात. त्यांच्यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी तर तीळ हवेतच. पण तिळामध्येही दोन प्रकार असतात. काळे तीळ आणि पांढरे तीळ (health benefits of eating black sesame and white sesame). आता या दोघांपैकी जास्त पौष्टिक नेमकं काय, कोणते तीळ कोणासाठी जास्त फायदेशीर ठरतात, कोणत्या तिळाचे काय लाभ होतात ते एकदा पाहूया..(black sesame or white sesame which one is more healthy?)

 

हिवाळ्यात काळे तीळ खावेत की पांढरे तीळ? 

१. आहारतज्ज्ञ श्वेता पांचाळ यांनी साेशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार काळे तीळ हे त्यांच्या नैसर्गिक स्वरुपात असतात. त्यांच्यावरचे आवरण काढलेले नसते. त्यामुळे त्यांच्यामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स, मिनरल्स जास्त प्रमाणात असतात. याशिवाय पांढऱ्या तिळांच्या तुलनेत काळ्या तिळांमध्ये लोह, मॅग्नेशियम, झिंक हे घटकही भरपूर असतात. 

'या' छोट्याशा बियांचं दूध म्हणजे हाडांसाठी पॉवरफूल टॉनिक! ताकद येऊन हाडं होतील मजबूत
 
२. पांढऱ्या तिळांवर प्रक्रिया झालेली असते. त्यामुळे ते पचायला थोडे सोपे असतात. या तिळांमध्ये कॅल्शियम आणि हेल्दी फॅट जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे ज्यांना हाडांचा त्रास असतो, त्यांच्यासाठी पांढरे तीळ खाणं जास्त फायदेशीर ठरतं. दातांच्या मजबुतीसाठी तसेच त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील पांढरे तीळ जास्त फायदेशीर ठरतात. 

 

३. जर तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवायचं असेल, केसांच्या वेगवेगळ्या तक्रारी कमी करायच्या असती तर काळे तीळ खा. पीसीओएसचा त्रासही काळ्या तिळांमुळे कमी होतो.

शरीरात होणारे 'हे' बदल सांगतात तुम्हाला लवकरच डायबिटीस होणार... दुर्लक्ष कराल तर आयुष्यभर पस्तावाल.. 

शिवाय हे तीळ व्हिटॅमिन बी १२ चं भांडार मानलं जातं. त्यामुळे तुमच्या शरीराच्या गरजेनुसार तुम्ही कोणते तीळ खायला हवे हे ठरवा आणि ते नियमितपणे खा. 
 

Web Title : काले या सफेद तिल: सर्दियों में कौन सा खाना स्वास्थ्यवर्धक है?

Web Summary : काले तिल एंटीऑक्सीडेंट, खनिज, लोहा और मैग्नीशियम से भरपूर होते हैं। सफेद तिल पचने में आसान और हड्डियों और त्वचा के लिए अच्छे होते हैं। अपनी स्वास्थ्य आवश्यकताओं के आधार पर चुनें।

Web Title : Black or white sesame: Which is healthier in winter?

Web Summary : Black sesame seeds are rich in antioxidants, minerals, iron, and magnesium. White sesame seeds are easier to digest and good for bones and skin. Choose based on your health needs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.