Black pepper for weight loss: वजन कमी करायचं म्हटलं की, जास्तीत जास्त लोक सगळ्यात आधी जिम किंवा डाएटमध्ये बदल करण्याचा विचार करतात. शरीरात वाढलेली चरबी कशी कमी करायची यासाठी उपाय शोधू लागतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आपल्या किचनमध्येच एक असा मसाला असतो ज्यामुळे वाढलेली चरबी कमी करण्यास खूप मदत मिळते. हा मसाला म्हणजे काळी मिरी. छोट्याशा काळी मिरीनं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, शरीर आतून डिटॉक्स होतं आणि वजन लवकर कमी करण्यास मदत मिळते. याचे फायदे कसे मिळतात आणि वापर कसा करावा हे पाहुयात.
चरबी कमी करणारं खास तत्व
काळ्या मिरीमधील पिपेरिन तत्व पचन तंत्र मजबूत होतं. यामुळे शरीरातील कॅलरी अधिक वेगानं बर्न होतात. हेत कारण आहे की, काळी मिरी नियमितपणे खाल्ल्यास पोटावर वाढलेली चरबी वेगानं कमी करण्यास मदत मिळते.
कसा कराल वापर?
सकाळच्या चहामध्ये किंवा ग्रीन टी मध्ये काळी मिरी पूड मिक्स करू शकता. यानं चरबी कमी होण्यास मदत मिळेल.
कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि काळी मिरी पूड टाकून पिणं देखील फायदेशीर ठरतं.
जेवणावेळी खाल्ला जाणारा सलाद किंवा सूपमध्ये काळी मिरी पूड टाकणंही फायदेशीर आहे.
भूक कंट्रोल आणि ओवरईटिंगपासून बचाव
काळी मिरीनं केवळ चरबी कमी होते असं नाही तर भूक कंट्रोल होते आणि ओव्हरईटिंगही टाळलं जातं. जेवणात चिमुटभर काळी मिरी पूड टाकाल तर पोट लवकर भरतं आणि पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छाही कमी होते.
इतरही काही फायदे
डायजेशन चांगलं राहतं
शरीरातील विषारी तत्व बाहेर निघतात
इम्यूनिटी वाढते
मूड चांगला होतो, फोकस वाढतो