दिवसेंदिवस वाढत जाणारे वजन कमी व्हावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. वजन कमी होण्यासाठी आपण जिम, डाएट असे सगळे उपाय करतोच. हे सगळं करताना यासोबतच, वजन कमी करण्यासाठी आपण काही साधेसोपे घरगुती उपायही करतो. वेटलॉस करण्यासाठी घरगुती उपाय करताना आपण घरात सहज उपलब्ध होतील अशा पदार्थांचा वापर देखील करतो. स्वयंपाकघरातील (best way to consume black pepper for weight loss) मसाल्यांच्या डब्यांतील असाच एक पदार्थ (how to use black pepper for weight loss) म्हणजे काळीमिरी. काळीमिरी फक्त जेवणाची चवच वाढवत नाही, तर वजन कमी करण्यासाठी देखील खूप मदत करते. काळ्यामिरीमध्ये असलेले खास गुणधर्म शरीरातील चयापचय क्रिया सुधारतात आणि चरबी कमी करण्यास मदत करतात(black pepper home remedies for weight loss).
काळीमिरी मधील पाइपरिन हे घटक शरीरातील अतिरिक्त चरबी वितळवण्यात आणि पचन सुधारण्यात उपयोगी ठरते. त्यामुळे आहारात काळीमिरीचा योग्य पद्धतीने समावेश केल्यास वजन कमी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सहज होते. वजन कमी करण्यासाठी डाएट, व्यायाम याबरोबरच घरगुती उपायही तितकेच फायदेशीर ठरतात. वेटलॉस करण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स किंवा औषधं घेण्यापेक्षा स्वयंपाकघरात सहज मिळणारे पदार्थ वापरणे जास्त चांगले. नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करायचे असेल तर काळीमिरीचा वापर नेमका कसा करायचा ते पाहूयात.
वेटलॉससाठी काळीमिरी आहे बहुगुणी...
१. चयापचय क्रियेचा वेग वाढवते :- पाइपरिन चयापचय क्रियेचा वेग जलद करते, ज्यामुळे कॅलरी अधिक वेगाने बर्न होतात. जेव्हा आपले शरीर जास्त कॅलरी वापरते, तेव्हा वजन कमी होण्यास सुरुवात होते.
२. नवीन फॅट्स तयार होण्यापासून थांबवते :- काही संशोधनांमधून असे दिसून आले आहे की पाइपरिन नवीन चरबीच्या पेशी तयार होण्यापासून रोखू शकते. यामुळे वजन वाढण्यापासून वाचवण्यासाठी हे मदत करू शकते.
महिलांमध्ये छळतोय ब्रेन फॉग! 'ही' आहेत लक्षण, पाहा कोणत्या वयात होतो हा त्रास आणि उपाय...
३. पचन सुधारते :- काळीमिरी पचनक्रिया सुधारणाऱ्या एन्झाईम्सना अॅक्टिव्ह करते, ज्यामुळे पचन चांगले होते. उत्तम पचनामुळे शरीर पोषक तत्त्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेते आणि अनावश्यक पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.
४. भूक नियंत्रित करते :- पाइपरिन भूक कमी करण्यास देखील मदत करू शकते, ज्यामुळे कमी प्रमाणात खाल्ले जाते आणि अनावश्यक कॅलरीज घेतल्या जात नाहीत.
वजन कमी करण्यासाठी काळी मिरीचा कसा वापर करावा ?
१. सकाळचे डिटॉक्स ड्रिंक :- एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा काळीमिरीची पूड आणि एक चमचा मध मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे पेय चयापचय क्रियेचा वेग वाढवेल आणि शरीरातील विषारी पदार्थ (toxins) बाहेर काढण्यास मदत करेल.
२. सॅलॅड आणि सूपमध्ये घाला :- तुमच्या रोजच्या सॅलॅड, सूप किंवा कोणत्याही पदार्थावर थोडीशी काळीमिरीची पूड भुरभुरवून घाला. यामुळे पदार्थांची फक्त चवच वाढणार नाही, तर जेवण अधिक पौष्टिक होईल व वेटलॉस करण्यास मदत होईल.
बहुतेकांना न आवडणारी भाजी करीना कपूर मात्र खाते आवडीने! म्हणून अजूनही आहे मेंटेन्ड...
३. ग्रीन टी सोबत घ्या :- वेटलॉस करण्यासाठी आपण ग्रीन टी पितो. ग्रीन टीमध्ये चिमूटभर काळीमिरीची पूड मिसळा. ग्रीन टी आणि काळीमिरी दोन्ही चयापचय क्रियेचा वेग वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
४. दह्यासोबत खा :- एक वाटी दह्यामध्ये भाजलेले जिरे आणि काळीमिरीपूड मिसळून खा. हे पचनासाठी खूप चांगले असते आणि पोट बराच वेळ भरलेले असल्यासारखे वाटते. यामुळे वारंवार होणारे क्रेविंग्स किंवा सतत लागणारी भूक थांबवणे शक्य होते.
या गोष्टी लक्षात ठेवा...
१. काळीमिरी योग्य प्रमाणातच आहारात समाविष्ट करा. जास्त प्रमाणात काळीमिरी रोजच्या आहारात घेतल्यास पोटात जळजळ किंवा पचनाच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात.
२. नैसर्गिक पद्धतीने वेटलॉस करण्यासाठी काळीमिरीच्या वापरासोबतच, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम खूप आवश्यक आहे.
Web Summary : Black pepper boosts metabolism, burns fat, and aids digestion. Include it in your diet through detox drinks, salads, or with green tea and yogurt. Combine with balanced diet and exercise for best results.
Web Summary : काली मिर्च चयापचय को बढ़ावा देती है, वसा जलाती है और पाचन में सहायता करती है। इसे डिटॉक्स ड्रिंक, सलाद या ग्रीन टी और दही के साथ अपने आहार में शामिल करें। सर्वोत्तम परिणामों के लिए संतुलित आहार और व्यायाम के साथ मिलाएं।